Alphamarathi.com

Super Fast Marathi News
ऐन तारुण्यात नवरा वारला अन् दिराने असे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल.. दोन्ही दिरांनी मिळून तिच्यासोबत अशाप्रकारे.. पहा एक हृदयस्पर्शी कहाणी..

नमस्कार मित्रांनो..

नऊवारी साडीतील मृणाली खूप सुंदर हिरॉईनसारखीच दिसत होती. त्याकाळी कुणी शिक्षणाचा इतका विचार करीत नसत, पण मृणाली मात्र लिहायला वाचायला येईल इतक शिकलेली होती. वयात आली तशी आई-वडिलांनी स्थळ शोधायला सुरुवात केली. पण मृणाली जशी दिसायला सुंदर तशीच कमालीची हट्टी पण होती. तिला साडीवर मॅचिंग ब्ला’उज हवा होता आणि तो काही मिळेना.

त्याकाळात खूप श्रीमंत बायकाच मॅचिंग ब्ला’उज वैगरे वापरत असत. पण हिचा हट्ट पुरवला नाही तर ही लग्नालाच उभी राहणार नाही. हे दोघांनाही माहित होत. म्हणून त्यांनी एका शेजारच्या बाईचा ब्ला’ऊज मागून आणला आणि हिला तो बसला. झालं मग ह्या बाईसाहेब दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार झाल्या. तस म्हटलं तर मृणाली काही एकुलती एक मुलगी नव्हती तिला बहिण-भावंडही होती.

पण ही जरा हट्टी म्हणून सर्वांची खास होती. कामात आतिशय तरबेज आणी हुशार होती. स्वयंपाकघरात आणि अगदी रानातून चुलीसाठी लाकूडफाटा आणण्यासाठी सुद्धा. तर मग अशा मृणालीला स्थळ आल होत ते अगदी ता’ले’वा’र होत. म्हणजेच खूप श्रीमंत आणि गावात मान मरतब असणार. ही पसंत पडली तिच्या सासुबाईंना आणि लग्न झालं.

सासरी पाचवारी गोल साडी नेसायची पद्धत, हिला काही सवय नव्हती. ते पण ही शिकली. त्या घरंदाज घराण्याला शोभेल अशीच मृणाली होती. नवराही गोरपान राजबिंडा. दोघांच लग्न होवून संसार सुरु झाला. नवरा दिवसरात्र आपल्या व्यवसायात गढून गेलेला. मृणाली मात्र घरी सासू आणि नणंदाच्या ता’ब्यात. सासू खूप खाष्ट होती, त्यात मृणाली गरीब घराण्यातली होती.

सासुबाईंकडे खूप दागदागिने होते, सणासुदीला मृणालीला सुद्धा घालयला दिले जायचे पण नंतर आणि परत सासुबाईंच्या ता’ब्यात द्यायचे. नंदा मात्र ते दागिने घालून मिरवायच्या पण तशी मुभा मृणालीला नव्हती. या सगळ्या सासुरवासात तिचा हट्टी स्वभाव जरा वरमला होता. हळूहळू नंदांची आणि दिरांची लग्न झाली. त्यांनी घरातील त्या सगळया सोन्या नाण्याचा खूप मुद्देमाल आपल्या सोबत नेला.

हिचा नवरा घरातला मोठा मुलगा होता पण कुणालाही काहीही बोलला नाही. तो खूप समाधानी माणूस होता. या सगळ्या राम रगाड्यात मृणालीला लागोपाठ तीन मुली झाल्या. नवरा आणि सासुबाई नाराज होत्या कारण त्यांना घराण्याला वारस हवा होता. त्यातच काही वर्षानी सासुबाईंना अ’टॅक आला त्यातच त्या गेल्या. त्यावेळी तर नंदांनी कहरच केला. आई जाण्याच दुःख राहील बाजूलाच, यांनी आधी आईच्या दागिन्याची आणि साड्यांची वाटणी करुन घेतली. मग मात्र मृणालीने परत एकदा चान्स घेतला आणि,

तिला मुलगा झाला पण तो ज’न्म झाल्या झाल्याच गेला. ती खूप खचून गेली होती या दुःखाने. एकतर सासुने केलेला जा’च, दीर आणि नणंदांची पैशासाठी हपापलेली नजर. हिला मुलगा नाही तर घराण्याला ही वंश देवू शकत नाही ही बोचणी. या सगळया वातावरणामुळे ती थोडी निगरगट्ट बनत गेली. फा’टकं माहेर, या अशा प्रकारच सासर. माहेराहून भावंडाची साथ होतीच पण कुणीही एवढं आर्थिक दृष्टया सधन नव्हत. याची तिला कल्पना होतीच. पण त्यांची साथ होती हेच पुष्कळ होत तिच्यासाठी.

प्रत्येकवेळी फक्त नशिबाची चक्र उलटीच फिरत होती तिच्यासाठी. श्रीमंत सासर दिल पण तशी मनाने श्रीमंत माणस नाही दिली. समाजाला दाखवण्यासाठी आणि वंशाला दिवा दिला तो ही हिसकावून घेतला. हे सर्व कमी होत की काय त्यात तिच्या नवऱ्याला कॅ’न्सरने ग्रासल. तिन्ही मुलींची साथ होती मात्र तिला. अशा असहाय्य दु’खण्यामुळे त्यांच व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. त्यामूळे व्यवसायात तो’टा सहन करावा लागला. मृणाली पूर्वी पासूनच काटकसरीने संसार करीत होती. त्यामूळे तिने तिच्याजवळचा पैसा सुरक्षित ठेवला होता.

पण या आ’जार’पणाला खूप पैसा लागणार होता. त्याच ऑ’परे’शन करायच होत. पण एकाही दिराने किंवा नणंदेने काहीही मदत केली नाही. जेव्हा दादाकडे पैसा होता त्यावेळी त्या येत होत्या पण आता दादाच्या गरजेच्या वेळी कुणी ढुंकूनही बघितल नाही. त्यावेळी ह्या सद्गृहस्थाचे डोळे उघडले. आपण तर काहीच कमावलं नाही आणि जे कमावलं ते ह्यांना वाटून टाकल. ऑ’परे’शन झाले त्यांचे. मुली तेव्हा खूप लहान होत्या पण त्यांना जमेल तशी त्यांनी व्यवसायाची मदार पेलली.

या सगळ्या खटाटोपात सगळे प्रयत्न उपचार करुनही फक्त पुढील दोन वर्षेच काढली त्यांनी. संसार असा अर्ध्यावर सोडून गेले ते. एकाही मुलीच शिक्षण पूर्ण नाही, लग्न नाही. सगळ होत्याच नव्हत झाल. पूर्वी अशी सयुक्त कुटुंब नव्हती त्यामुळे बाराव्याच्या दिवशी अशा कुटुंबाची जबाबदारी घरातली जबाबदार व्यक्ति पेलवत असते. पण इथे तर दीर आणि नणंदा जागा जमिनीच्या वाटणिसाठी जमलेले. आता मात्र मृणालीची खरी ल’ढाई होती. अजुनपर्यंत फक्त भोगल होत आता एक्शनची वेळ होती.

तिन्ही मुलीच्या पाठीमागे ती भक्कमपणे उभी राहिली. तिने ह्या वाटण्या बाराव्याला होवुच दिल्या नाहीत. तिने वाटणीसाठी को’र्ट गाठल. इतक्या वर्षात तिने कधी घराची पायरी ओलांडली नव्हती पण आता तिच्या हक्कासाठी तिला हे करावच लागलं. प्रत्येकवेळी विश्वासघाता वर कोलमडून पडलेली ती आता सावरली होती. छोट्या को’र्टापासून अगदी हाय को’र्टापर्यंत गेली ती. एकटीच ल’ढत होती. कधी स्व्तःशी तर कधी इतरांशी. मुंबई हायकोर्टात येण हा तिच्यासाठी सोपा प्रवास कधीच नव्हता.

मुंबईत नविन आलेला, शिकला सवरलेला माणूस बावचळून जातो. हिने एकटीने मुंबई गाठली. खूप वर्ष ती ही ल’ढाई लढत होती. अखेर तीने आपला न्या’य मिळवूनच दाखवला. तिच्या वाट्याची जागा जामिन तिला मिळाली. नाहीतर दीर तिला मुली असल्यामूळे काहीच द्यायला तयार नव्हते. आता दिरांनीही बघितल की ती जिंकली होती. तिच्या मनावर खोलवर कुठेतरी खूप मोठे आघा’त होत होते, त्यातून ती तावुनसलाखून बाहेर पडली होती. पण विश्वास नावाची जी काही गोष्ट असते ती मात्र ती विसरून गेली होती.

म्हणजे तिला विसरावीच लागली, अशी परिस्थिति तिच्यावर आली होती आणि वेळोवेळी येत होती. आता ती पुर्णपणे ल’ढाई जिंकली आहे. पण ती आता कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.