Alphamarathi.com

Super Fast Marathi News
प्रेम विवाह केला आणि आई – वडीलांपासून दूर राहू लागले.. पण पुढे जे घडले ते पाहून.. घरी कोणी नसताना ते दोघे..

नमस्कार मित्रांनो..

अनुजा आणि भरत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, पण त्यापूर्वी बऱ्याच वर्षांपासून ते चांगले मित्र होते. मग दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या लग्नाला अनेकांचा विरोध होता. कारण, दोघांची जा-त वेगळी होती. सांस्कृतिक वातावरण वेगळे. आर्थिक स्थिती वेगळी. मात्र, मुख्य म्हणजे हे लग्न टिकणार नाही, अशी अगदी खात्रीच बहुतेकांना होती. यांनी लग्नाच्या फंदात पडूच नये,

असे वाटणारेही काही लोक होते. तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल. पण, होय ! यांनी कशाला लग्न करून संसार थाटावा, असं वाटणारे कमी नव्हते. याच कारणही तसच होत, प्रेम विवाह म्हणजे नेहमी सारखा कॉलेजच्या अल्लड मैत्रीतून होणारा प्रेम विवाह असा गैरसमज आपल्या सर्वाचाच होणे साहजिक आहे. कारण त्यापलीकडे प्रेम विवाहाची व्याप्ती असू शकते असे आपल्याला वाटत नाही.

यांची केस जरा निराळीच होती. कारण हे दोघ कॉलेजच्या अल्लड मैत्रीतून फुलणाऱ्या अल्लड प्रेमाची शि’कार होऊन लग्न करायला तयार नव्हते, तर हे दोघे असामान्य होते. हो, दोघेही आंधळे. ‘व्हिज्यु अली चॅलेन्ज्ड’ वगैरेपेक्षा स्वतःला थेट अंध म्हणवून घेताना या दोघांना काही वाटत नाही. जे आहे, ते आहे. आपल्या डोळ्यांना दिसत नाही.

आपण अंध आहोत, हे दोघांनीही स्वीकारले होते. आपण माणसं आहोत. आपण विचार करतो. आपण भावनाशील आहोत. आपण कलेचा आस्वाद घेऊ शकतो. एवढं सगळं छान असताना, हे अंधत्व किती सामान्य! अनेकांना प्रेमच करता येत नाही. कित्येकांचं मन दगड झालेलं असतं. कितीतरी लोक अविचारी आणि विखारी असतात. खूपजण हिं’सक असतात.

आपण मात्र छान ‘माणूस’ आहोत, हेच मुळात किती भारी आहे! कोणाकडे काही असते. कोणाकडे नाही नसते. तसे, आपल्याकडे सगळे काही आहे, पण आपल्याला दिसत नाही. हे न दिसणे त्यांनी अगदी नीटपणे पाहिले. आणि, ते स्वीकारले. आपल्यापाशी जे नाही, ते मान्य केले की जे आहे ते वाढवणे शक्य असते. त्यांना ते समजले होते. मात्र, इतर डोळसांना ते दिसत नव्हते.

या दोघांच्या मनात अंधत्व हीच आपली जात आहे, हा विचार पक्का होता. तो त्यांनी घरच्यांच्या गळी उतरवला. लग्न म्हणजे दोन कुटुंबं एकत्र येतात. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक ठेवणी भिन्न असल्या तरी हे दोघेही अंधत्वामुळे वसतिगृहात राहून वाढले. त्यामुळे घरच्यांपेक्षा शाळेतल्या लोकांचा, पर्यायाने शिक्षकांचा ठसा अधिक खोल होता. ती लग्न करून आली, तेव्हा तिला थोडंफार बनवता यायचं.

पण, सासूबाई किचनमध्ये येऊच देत नसत. तिला तेव्हा नोकरी नव्हती. मग वेळ घालवायला काहीच उरत नसे. तिला दिसत नाही म्हणून सासूबाईंना किचनमध्ये ती नको असायची. हळूहळू प्रयत्न करत होती ती सार जुळवून घेण्याचा आणि समजावून देण्याचा. पण, दोन वर्षांनी तिलाच गॅसजवळ जाण्याची भिती वाटायला लागली. तसं पाहिलं तर तिला सगळा स्वयपाक येत असे.

सासूबाई घरी नसताना ती त्याला डब्बा बनवून देत असे. पण दोन वर्षे अजिबातच काही न केल्याने तिला आता सगळ्याची भीती वाटू लागली. तेंव्हा तिने आपली भीती घालवायच ठरवल. सगळी परिस्थिती आपल्या नवऱ्याला सांगितली, आपण आता एकत्र कुटुंबात नाही राहू शकत हे कारण सांगून अंतिम निर्णय त्याच्यावर सोपवला. त्यानेही तिचा निर्णय मान्य केला.

प्रत्येकवेळी नवे पती-पत्नी एकत्र कुटुंबातून वेगळे होऊन स्वतंत्र राहू लागतात, तेव्हा ‘इंदुरीकर महाराज’ छापाची कारणं असतातच, असं नाही. आई-वडिलांना सोडून राजा-राणी स्वतंत्र होत असतात, असंच नाही. त्यांचंही जगण्याचं काही एक स्वप्न असतं. धारणा असतात. नव्या पिढीला हवं तसं जगू द्यायला हवं, हे जुनेही अनेकदा विसरतात. काही वेळा, वेगळं राहाणं हा उपायही असू शकतो.

असो.. तर, त्याआधीच ते स्वइच्छेने एका मुलाचे आई-बाबा झाले होते. आई-वडिलांपासून वेगळं होणं सोपं नव्हतं. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त दहा महिन्यांचा होता. गॅस लावण्यापासून सारं तिला एकहाती करावं लागणार होतं. पण, त्याची साथ या प्रवासात खूपच महत्त्वाची होती. तो पूर्ण वेळ मुलाला एकटा सांभाळायचा. सकाळी ऑफिसला जाताना पाळणाघरात सोडून जायचं.

येताना जो आधी येईल तो बाळाला घेऊन येई. दुसरा आला की, मग बाळ बाबांकडे अन ती स्वयपाकघरात त्या दिवसांत स्वयंपाक अंगवळणी पडेपर्यंत सर्वांनी रोज खिचडी खाल्ली. तीही एकाच चवीची, त्यावेळी मदतनीस ठेवण्याइतकी आर्थिक परिस्थिती नीट नव्हती. पण, हळूहळू नवा संसार स्थिरावला. पोरालाही आपले आईबाबा अंध आहेत, या गोष्टीची सवय झाली. त्याला आई-बाबा लिहायला शिकवू शकणार नव्हते.

मग, शिकवणी लावली. पण, वाचन मात्र या दोघांनीच घेतलं. इंग्रजी आणि मराठी लाकडी अक्षरं आणली. मुळाक्षरांचे चार्ट्स आणले. त्यावरच्या चित्रांचं वर्णन ओजस सांगायचा आणि मग ते ओळखून शब्द सांगायचे. नोकरी आणि मग शक्य तितका वेळ मुलांसोबत घालवणं हा या जोडीचा दिनक्रम झाला. बाळाला बर नसताना तो काही तिला सोडत नसे. अशात, त्याने देखील गॅस लावायला, खिचडी,

चहा-कॉफी, मॅगी बनवायला शिकून घेतलंय. आता तीला कंटाळा आला की, तो छान खिचडी टाकतो, वाढतो आणि ताट हातात आणून देतो. अडचणी आहेत, हे दोघंही नाकारत नाहीत. पण, हे आयुष्य ‘असामान्य’ आहे आणि दोघं एकत्र असल्याचा आनंद खूपच जास्त आहे! दोघेही आता बॅंकेत मोठे अधिकारी आहेत. विरारमध्ये राहतात. त्या दोघांसोबत मुलंही वाढत आहेत. आयुष्यात अडचणी खूप आल्या पण त्यावर मा त करून पुन्हा नव्याने उभ राहाण त्यांना छान जमलय..

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.