Alphamarathi.com

Super Fast Marathi News
नवीन लग्न झालेल्या नवऱ्याला समजते, बायकोला पहिली मुलगी आहे, पण नंतर पुढे जे घडते ते पाहून धक्का बसेल..

नमस्कार मित्रांनो..

नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो, हाय, गुड मॉर्निंग डियर. मेसेज फ्रॉम बेबी. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते, विचारात पडते. ही बेबी कोण आता? नवरा बाथरूम मधून आल्यावर बायको त्याला कुण्या बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो. हाय बेबी, हाऊ आर यू?

आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात. कोण असेल ही बेबी? संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते, “ही बेबी कोण आहे हो?” नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो. असेच एक दोन दिवस जातात. पुन्हा एके सकाळी मेसेज येतो, हाय,

आज तरी भेटणार का? खूप आठवण येते तुझी. मेसेज फ्रॉम बेबी. हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे. नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते.

दोघात कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात अडी बसलेली, त्यात भांडण पेटलेले. त्या रागाच्या भरात बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते. मी घर सोडून माहेरी जात आहे कायमची. नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो. पंधरा दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाजते.

बायकोच दार उघडते. दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी. ती विचारते, “अमुकच्या मिसेस तुम्हीच ना?” बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू लागते. प्रिय सखी, ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस तीच ही बेबी आहे. जिने आता तुला हे पत्र दिले आहे.

अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस की, ही बेबी कोण आहे? तेव्हा मुद्दाम सांगितले नाही. म्हटलं पाहूया जरा गंमत करूया. मात्र तुझा बेबी संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो.

पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस आणि हो अजून एक ही जी बेबी तुझ्या समोर उभी आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच. आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षा आधीची घटना. तू कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथले एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीच औ-षध दिलेल,

आणि नंतर नको ते कृत्य केलेल. तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही अबो-र्शन घडले नाही. इज्जतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं. तुझे वडीलच डॉ’क्टर असल्याने फारसा बोभाटा न होता नको ते बाळ ज’न्मलं. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमातच सोडून दिलेलं.

तेच बाळ म्हणजे ही बेबी. वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे. जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असशील किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे. बायको पटकन त्या मुली जवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले पण पत्र अजून बाकी असत. ती पुढे वाचायला सुरुवात करते.

आता हे सगळं मला कसं माहित तर तुझ्या वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असं सुचवलं. तरीही मी तुला स्वीकारलं कारण झाल्या प्रकारात तुझी चूकच काही नव्हती आणि आपले लग्न झाले. पण मी अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो तिच्या सहवासात छान वाटायचे. लळा लावला होता पोरीने. बास, माझे सांगून संपलय सगळं. आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच गॅलरीत ये.

सदैव तुझाच. बायको ताडकन धावत धावत गॅलरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणि इकडे तिच्या डोळ्यात अश्रूचा महापौर. कारण कोणतेही असो दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका. शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा. कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औ-षध निघालेले नाही. त्यावर औ-षध एकच नात्यात वाद नको, संवाद हवा.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.