Alphamarathi.com

Super Fast Marathi News
बसमध्ये एक हि’जडा सगळ्या प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे घेत असताना एका लहान मुलाने त्या हि’जड्यासोबत असे..

नमस्कार मित्रांनो..

बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि निघण्याच्या तयारीत होती. प्रत्येक जण आपापल्या वस्तू ठेवण्यात आणि बसण्याच्या तयारीत व्यस्त होता. त्याच गर्दीत एक जोडपे आपल्या पाच वर्षाच्या पोरासोबत बसले होते. पोराने दोन रुपयाचं नाणं हातात घट्ट पकडलं होतं. पोराच्या आईने त्या पोराकडून ते नाणे मागितले असता पोराने ते देण्यास नकार दिला.

त्याची आई रागाने म्हणाली, “तू कुठेतरी टाकशील. इकडे आण ते पैसे.” पण पोराने आईकडे लक्ष दिले नाही आणि तो त्या नाण्याकडे व बस मधील गर्दीकडे पाहत बसला. तेवढ्यात त्या बस मध्ये एक तरून देखणा असा हि’जडा चढला. त्याने चमकदार लाल रंगाची साडी घातली होती आणि त्याच्या ओठांवर लाल गडद रंगाची लिपस्टिक लावलेली होती.

बसमध्ये चढताच त्याने काही तरुणांकडे हातवारे करून टाळ्या वाजवल्या आणि त्यांची छेड काढली. त्या तरुणांनीही त्याला दहा रुपयांची नोट हसतमुखाने दिली. तो परत टाळ्या वाजवत बस मध्ये पुढे जात पैसे मागू लागला त्या जोडप्याचे ते पाच वर्षाचे पोर त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. त्या पोराच्या आई-वडिलांसोबतच इतर अनेक प्रवाशांनाही,

हि’जड्याच्या या वागण्याचा वैताग येत होता. बसमध्ये काही प्रवासी असे होते ज्यांना तो हिजडा मनोरंजनाचे साधन वाटत होता. अशा लोकांच्या करमणुकीसाठी तो देखील काही मा’दक हावभाव करीत गाणी म्हणत होता. तो हि’जडा बसच्या मागच्या दिशेने निघाला होता व काही लोकांकडून पैसे घेत होता. तेवढ्यात त्या पाच वर्षाच्या पोराने,

मोठ्याने त्याला आई म्हणून हाक मारली. त्या हि’जड्याने लक्ष दिले नाही. पोराने पुन्हा एकदा आई म्हणून हाक मारली. यावेळी त्याने आई हा शब्द ऐकला पण त्याने लक्ष न देता बाजूला पाहिलं. त्याच्या आईने त्या पोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पोराने पुन्हा पूर्ण ताकदीने आवाज दिला, “ओ, टाळी वाजवणारी आई.” यावेळी त्या हि’जड्याने लगबगीने मागे वळून पाहिले.

तेव्हा एका व्यक्तीने त्याला देण्यासाठी एक नोट काढली होती व त्या हि’जड्याने ती नोट ही पकडली होती. पण त्याने ती नोट सोडून दिली. हि’जड्याने पोराकडे पाहताच पोराला थांबवणारी त्या पोराची आई थोडी घाबरली. हि’जड्याचे भाव बदलले होते. त्याच्या तोंडून फक्त “बोल माझ्या लेकरा” असे शब्द बाहेर पडले. ते नाणे हि’जड्याला दाखवत ते पोर म्हणाले, “आई, हे पण घे.”

हे शब्द ऐकून हि’जड्याचे डोळे भरून आले होते. आता त्याच्या गालावरून पाणी खाली ओघळत होतं. जे हि’जडे आजवर केवळ लोकांच्या मनोरंजनाचे साधन वाटत होते किंवा काही लोकांना वैताग, त्रास वाटत होते. आज तो हि’जडा सर्व काही विसरला होता. तो तसाच पुढे गेला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले त्याने थांबून एका प्रवाशाकडून घेतलेले पैसे परत केले.

प्रवासी निःशब्द होऊन त्याच्याकडे पाहत होता. तेवढ्यात त्या पोराचा परत आवाज आला, “आई, ये ना.” तो भावूक झालेला हि’जडा रडवेलेल्या आवाजात म्हणाला, “आले रे माझ्या लेकरा.” त्या हि’जड्याने त्या पोराच्या पुढच्या बाजूला जाऊन ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते पैसे देऊन परत त्या पोराकडे माघारी येऊन त्याला एकटक पाहू लागला.

त्याने पोराच्या हातातून ते नाणे घेतले आणि त्याचे चुं-बन घेतले, कपाळावर लावले आणि डोके वर केले आणि देवाचे आभार मानले. हे दृश्य पाहून बसमधील सर्वजण आवाक् झाले. त्या दोन रुपयांच्या नाण्यामध्ये काय होते ज्याच्यासाठी त्यांनी बसमधून जमा केलेले सर्व पैसे परत केले. त्याच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

काही वेळापूर्वी मा’दक असलेले त्याचे डोळे आता प्रेमाने भरून आले होते. त्याने पोराच्या डोक्याचे चुं-बन घेतले. त्याने त्याला मनापासून आशीर्वाद दिला. त्याने त्याच्या पिशवीतून शंभर रुपये काढून पोराच्या हातावर ठेवले. पोराच्या आईने त्याला थांबवले आणि म्हणाली, “काय करताय तुम्ही हे? त्याने त्याच्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसला आणि म्हणाला,

“ताय, आज पासून माझं सार आयुष्य ह्याला लाभू दे आणि ह्याचं सारं दुःख माझ्या पदरी येऊ दे. ताय, तुमचा पोरगा व तुम्हाला देव सुखात ठेवो.” त्याने रडून भिजलेला चेहरा पुन्हा एकदा साडीच्या पदराने पुसला. पोराच्या चेहऱ्याचे चुं-बन घेतले आणि म्हणाला, “ताय, माझ्या आईनेही मी ज’न्माला येताच नाते तो’डले. हि’जड्याचा जन्मच असतो असा.

ताय, आज आयुष्यात पहिल्यांदाच या पोरांना आय म्हणून हाक मारली आणि वाटलं, होय मी पण एक माणूस आहे. ताय, या पोरांनं मला काय दिले आहे तुला समजणार नाही. त्याने ते नाणे छातीस घट्ट धरून तो बसमधून उतरला. आता जाता जाता वाटेत तो फक्त प्रार्थना करत त्या पोराला आशीर्वाद देत होता. पोराने आपल्या वडिलांना ती नोट दाखवली तेव्हा वडिलांनी ती नोट कपाळावर लावली आणि पत्नीला म्हणाले, “जपून ठेव. हा आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पोराला.”

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

 

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.