10 वर्षानंतर शाळेतील गेट टुगेदर मध्ये “ती” भेटली.. आणी जुन्या आठवणी पुन्हा.. पण पुढे जे घडले ते पाहून..
नमस्कार मित्रांनो..
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलाने इयत्ता १० मध्ये असताना शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुलामुलींचा ग्रुप फोटो फेसबुक वर टाकला आणी आवाहन केल की, यामध्ये जे जे कोणी आहेत त्यांनी संपर्क करा. एका महिन्यात सुमारे ३० ते ३५ मित्र मैत्रीणी १५ वर्षाने पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हाटसअप ग्रुप तयार झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किनकीनायला लागले किंवा,
खणखणायला लागले. मग हा कुठे आहे ती कुठे असते अशी शोधा-शोध पण होत राहिली. हळू-हळू बालपणीचा वर्ग स्मार्ट फोनवर भरायला लागला. नंतर त्याचं १ गेट टुगेदर पण झालं. बालपणीच्या वर्गमैत्रिणी नव्या रुपात भेटल्या आणी आता पुढेही भेटत राहतील या आशेने मुले खूप उत्साही होती. एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारले हल्ली मीनाक्षी कोठे असते ?
दुसऱ्या दिवशी रिप्लाय आला – मीनाक्षी तिच्या घरीच बेड रेस्ट वर आहे. पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झट’क्यामुळे विकल होऊन पडली आहे तीला चालता पण येत नाही, नवरा आणी तिची दोन मुले हेच तिचे सर्व काही करत आहेत. हे ऐकून ग्रुप वर सगळ्यांना ध’क्काच बसला. मग ४-५ मित्र मैत्रिणींची पर्सनल मेसेजची देवाण-घेवाण झाली.
ग्रुप वर मेसेज आला की आपण मीनाक्षीला भेटायला जाऊया. सगळ्यांना जाण शक्य नव्हते म्हणून मग मिनाक्षीशी फोनवर वेळ ठरवून १०-१२ मित्र मैत्रीणी तीला भेटायला गेले. तिच्या त्या छोट्याश्या घरात गेल्यावर आपली ही बालमैत्रीण अशी अंथरुणाला खिळलेली पाहून बराच वेळ सगळेजण निशब्द होते. पण हीच कोंडी फोडायची होती.
एकेकानी तिच्याशी संवाद सुरु केला, तिची चौकशी केली अंथरुणावर पडून राहिलीली मीनाक्षी भरभरून बोलत होती. तिचा चेहरा, तिचे डोळे सगळच बोलत होते. मैत्रिणींनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मिनाक्षीचा बांध फुटला, ते आनंद अश्रू होते का तीला उठून बसता येत नाहीय याच दु:ख होत हे काहीच कळत नव्हत. सगळ्यांचेच डोळे भरून आले.
या मित्र-मैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू तिच्या नवऱ्याने आणी मुलांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटणे आणी गहिवरून येण हे एकदमच झाल. कोणी मदतीला नसताना कसे करत असतील हे सगळे इतकी वर्षे. आणी मीनाक्षीच काय हे भाव हे सर्वजण लपवायचा प्रयत्न करत होते. मित्र-मैत्रिणी परत जाताना मीनाक्षीला सांगून गेले की,
यातून तीला बाहेर पडायला हवं. त्यापैकी कोणी ना कोणीतरी दर आठवड्याला येऊन भेटून जातील तिच्या बोलतील आणी तीला अंथरून मुक्त व्हायला मदत करतील. त्या दिवसानंतरची बदललेली मीनाक्षी ही नवऱ्याने आणी मुलांन ५ वर्षांनंतर पहील्यांदाच पाहिले होती. तिच्या मनाने आता उभारी घ्यायला सुरुवात केली. आता यातून बाहेर पडायला पाहिजे अस तीला आतून वाटायला लागलं होत.
यात तीला साथ देण्यासाठी तिचे मित्र मैत्रिणी होतेच. दिलेला शब्द जागवून मित्र मैत्रिणी दर आठवड्याला तीला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला, २ महिने झालेत ती आता घरातल्या घरात चालायला लागली आहे. १५ दिवसांपूर्वी मीनाक्षीने स्वतः हूनच एका मैत्रिणीला फोन करून सांगितल की तुझ्या नवीन गाडीतून मला एक चक्कर मारून आन.
मीनाक्षीच्या सोबतीला गाडीतून कोणी ना कोणीतरी जायचं. यावरून ग्रुप वर प्रेमळ भांडण सुरु झाली आहेत. अशा मैत्रीमुळे मिनाचा आत्मविश्वास वाढला आणी तिच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला. तर मित्रांनो आपणही एखाद्याचा गमावलेला आत्मविश्वास अशा पद्धतीने देवू शकलो तर एक चांगले काम केल्याचे समाधान मिळेल. असे मला वाटते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.