Alphamarathi.com

Super Fast Marathi News
७/१२ उताऱ्यावर वारसांची नोंद कशी करावी ? घर बसल्या काही क्षणात करू शकता तलाठ्याकडे जाण्याची गरज सुद्धा नाही.. जाणून घ्या काय आहे साधी सोपी प्रक्रिया..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि माणूस पैसे कमावू लागला की इनवेस्टमेंट करण्यास सुरुवात करतो. अन इन्वेस्टमेंटच सगळ्या खात्रीशीर क्षेत्र म्हणजे जमीन जुमला. पण जमिन जुमला म्हटलं की सात-बारा नावाचा कागद डोळ्यापुढे नाचतो. बरेच लोकांना हा कागद समजत नाही. अन अनेकाची त्यात फसवणूक देखील होते व कष्टाचे पैसे अडकून पडतात किंवा कायमचे बुडतात.

त्यासाठी सात बाराचं जुजबी नॉलेज असणं आवश्यक असतं. तर आज आपण सातबारा नेमका काय असतो ते जाणून घेणार आहोत. देशाचे एकूण क्षेत्रफळ :- तर आपल्या देशाचे एकूण क्षेत्रफळ आहे ३२ कोटी ८७ लाख हेक्टर. म्हणजे ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमिटर. आता हेक्टर म्हणजे किती हा घोळ होतोच. तर त्याला सोपं करुन सांगतो. १० मिटर x १० मिटर = १०० चौ. मिटर (म्हणजे १ आर).

१०० मिटर x १०० मिटर = १०,००० चौ. मिटर (म्हणजेच १ हेक्टर) तर ही आहे आताची नविन पध्दती. जुनं कॅलक्यूलेशन हे गुंठा व एकर याच्यात होतं. ते कसं होतं ते पण बघू या. ३ x ३ चौ. फूट = ९ चौ. फूट. (याला १ चौ. वार म्हणायचे) ११ x ११ वार = १२१ चौ. वार(म्हणजे १ गुंठा म्हणजे १०८९ चौ. फूट) अन ४० गुंठे म्हणजे १ एकर. हे असं जुनं कॅलकुलेशन होतं.

पण आता मात्र आर. व हेक्टर मध्येच जमिनीचं मोजमाप व हिशेब होतो. जमीन मोजणीचं तंत्र ब्रिटीशांनी आपल्याला दिलं. वारस नोंदी कशा कराव्यात :- कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे. ती म’यत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते. वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते.

म’यत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम या रजिस्टर मध्ये नोंदवून वारसाची चौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. व नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना,

त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते. वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी :- एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते. अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस म’यत झाला आहे. त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व म’यत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते.

अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे. नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो ध’र्म आहे त्या का यद्यानुसार होतात. हिं-दू व्यक्ती बाबत हिं दू तर मु-स्लिम व्यक्तीच्या बाबत मु-स्लिम वारस का’यद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया/कार्यपद्धती :- सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृ त्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यूनंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा. वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टर मध्ये घेतली जाते व नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच, पो’लिस पाटील व प्रतिष्ठीत नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते.

नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. नंतर किमान १५ दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत का’यदेशीर रित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते. वारस नोंदीतील महत्वाच्या बाबी :- १) व्यक्तीने स्वतः कष्ट करून मिळविलेल्या जमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो.

स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीत म’यत व्यक्तीच्या वडिलांना कोणताही हक्क मिळत नाही. २) वडिलांच्या आगोदर मुलगा म’यत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना मिळून एक वाटा मिळतो. ३) जर म’यत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाही. परंतु त्यांना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.

४) वारसांची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तह्शीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय नोंदवहीत रकाना ७ मध्ये लिहिलेला असतो. वारसाचे प्रमाणपत्र :- आपण म’यत व्यक्तीच्या नात्यातील आहोत व त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपतीवर अथवा स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे. हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखविता येते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :- १. विहित नमुन्यातील कोट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र २. मृ त्यू प्रमाणपत्र ३. तलाठी अहवाल / मंडळ अहवाल. ४. शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा. ५. मयत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची झेंरोकस.

६. शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड / कुपणाची झेंरोक्स प्रत. ७. ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा ज’न्म मृ त्यूचा नोंद वहीतील उतारा. ८. सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा. ९. वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी. १०. वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगेळे असतात. ११. बँक, विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर,

सं’बधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते. १२. विमा पॉ लिसी धारकाने आ त्मह त्या केल्यास विमा क्ले म रक्कम हि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही. १३. वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती सं’बंध असलेल्या. व्यक्तीच्या व सं’बंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट, इ. बाबींसाठी महत्वाचे असते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.