घर बांधताना किंवा खरेदी करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.. वास्तुशास्त्रानुसार घर नसेल तर काय घडते पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार जर तुमचे घर बनलेले नसेल तर तुमच्या घरामध्ये संकटे येऊ शकतात त्यामुळे घर बनवत असताना किंवा घर खरेदी करत असताना वास्तुशास्त्रांच्या नियमांकडे विशेष लक्ष द्या जेणेकरून वास्तू तुम्हाला सफलता देऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असले पाहिजे हे आता आपण पाहू.
१) घराचे प्रवेशद्वार कुठल्या दिशेला असावे ? घराचे प्रवेशद्वार नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असले पाहिजे. घराच्या प्रवेशद्वाराला सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश असे मानले जाते. एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले आहे की प्रवेशद्वारासाठी लागणारे लाकूड हे उच्च प्रतीचे असले पाहिजे. घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर कुठल्याही प्रकारची सजावट करू नये किंवा चप्पल व कचरा यासारख्या गोष्टी ठेवू नये.
घराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीचा रंग काळा असू नये. २) मुख्य खोली कशी असावी ? प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर जी खोली लागते ती घरातील महत्त्वपूर्ण खोली असते त्यामुळे ही खोली नेहमी नीट नेटकी ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार ही खोली पूर्व,उत्तर किंवा उत्तरपूर्व या दिशेला असावी. येथील लाकडी वस्तू पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावेत जेणेकरून वास्तुदोष निर्माण होणार नाही.
३) शयन कक्ष :- चांगले आरोग्य आणि समृद्धी साठी शयन कक्ष नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला असावे. वस्तू शास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशा ही आरोग्याच्या समस्येचे कारण बनते आणि दक्षिण पूर्व दिशा पती-पत्नीच्या भांडणाचे कारण बनते. त्यामुळे शयन कक्षातील पलंग दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावा. शयन कक्षामध्ये देवघर असू नये.
४) स्वयंपाक घर :- वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घर हे दक्षिण पूर्व दिशेला असावे. घर बांधत असताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. अन्न शिजवण्यासाठी लागणारा अग्नी हा देखील दक्षिण पूर्व दिशेला असावा. ५) लहान मुलांची खोली :- वास्तुशास्त्रानुसार घर बांधत असताना लहान मुलांची खोली दक्षिण पश्चिम दिशेला असावी. लहान मुलांनी दक्षिण किंवा पूर्वेकडे डोके करून झोपावे.
वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांनी असे केल्यास सौभाग्य आणि मनाची शांती लाभते असे म्हटले आहे. ६) ध्यान करण्याचे ठिकाण :- प्रत्येक घरामध्ये असे एक ठिकाण असले पाहिजे त्या ठिकाणी घरातील प्रत्येक सदस्य थोड्या वेळासाठी का होईना पण ध्यान करून स्वतःचे आत्मनिरीक्षण करू शकतील. असे मानले जाते की कुठलाही मनुष्य ज्यावेळी ध्यान करतो त्यावेळी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
वास्तुशास्त्रानुसार घराची पूर्व आणि उत्तर पूर्व दिशा ध्यान करण्यासाठी योग्य दिशा आहे. ७) खोल्यांचा आकार :- वास्तुशास्त्रानुसार घरातील खोल्या सरळ रेषेत, चौकोनी किंवा आयताकार असाव्यात कारण गोलाकार खोलीला वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. यासोबतच घरातील प्रत्येक खोलीमध्ये रोज सूर्यप्रकाश यायला हवा ज्यामुळे ऊर्जेच्या प्रवाहाला मदत मिळते आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढते.
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी असे वाटत असेल तर घराला पांढरा, पिवळा, गुलाबी, हिरवा, नारंगी किंवा निळ्या रंगाने रंगविले जावे. घरामध्ये तु’टलेल्या वस्तू ठेवू नये. तु’टलेल्या वस्तू घरामध्ये ठेवल्यास घरा मधील लोकांच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे भांडणे आणि स्वास्थ्य बिघडण्याचे कारण बनते. वास्तुशास्त्रामध्ये असे देखील सांगितले आहे की,
सुकलेली झाडे किंवा सुकलेली फुले देखील घरामध्ये दुःखाचे कारण बनू शकतात त्यामुळे सुकलेली फुले किंवा सुकलेली झाडे आपल्या घरात दिसतात त्यांना बाहेर काढा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.