मुलांच्या परीक्षेच्या वेळी पालकांनी हे कार्य करू नये.. कारण यामुळे बघा काय घडते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, परीक्षेच्या काळामध्ये आपल्या मुलाचे अभ्यासामध्ये लक्ष का लागत नाही आणि त्याची काय कारणे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये आपल्या मुलांशी पालकांनी कसे वागावे हे देखील पाहणार आहोत. मुलांना अभ्यास करत असताना आणि परीक्षेच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अशावेळी पालकांनी त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
आजकालचे पालक आपल्या कामांमध्ये फार व्यस्त असतात तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी देखील तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या खास करून त्यांच्या परीक्षेच्या काळात त्यांच्यासोबत राहा. आपल्या मुलासोबत नेहमी खुश आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करा जेणेकरून अभ्यासामध्ये त्यांचे मन लागेल.
मुलांवर प्रत्येक वेळी चांगले गुण मिळवण्याचा दबाव टाकू नका कारण प्रत्येक मूल हे वेगळे असते. प्रत्येकाची क्षमता वेग-वेगळी असते. त्यावेळी आपल्या मुलाला प्रोत्साहित करा. चांगल्या अभ्यासासाठी मुलांचे मन एकाग्र होणे फार महत्त्वाचे असते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र आणि बुध यांचा आपल्या एकाग्रतेवर खास परिणाम होत असतो.
चंद्र मनाला प्रभावित करतो आणि बुध मेंदूला. त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला तर या दोन ग्रहांना याचे कारण मानले जाते. बुध ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये सर्वात सुंदर ग्रह मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला युवराज ग्रह देखील म्हटले जाते. बुध ग्रह हा कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. जन्म कुंडली मध्ये बुध ग्रह आठव्या सहाव्या आणि,
बाराव्या स्थानांमध्ये असतो त्यावेळी यावर ब्रुहस्पतीची नजर पडेल तर अभ्यासामध्ये फार संकटे येतात यामुळे अभ्यासामध्ये मुले मागे राहतात.
ज्योतिष शास्त्रानुसार मुले अभ्यासामध्ये कमी असते तर त्यांचा बुध ग्रह शक्तिशाली करून त्यांची एकाग्रता वाढवली जाऊ शकते त्यासाठी आपल्या मुलाच्या बोटामध्ये पन्ना रत्न असलेली अंगठी घालावी.
बुधवारच्या दिवशी पालकांनी उपवास करावा आणि बुध देवाच्या मंत्र्यांचा जप करावा याशिवाय जर तुमची इच्छा असेल तर बुधवारच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र दान करू शकता. यासोबतच मुलांना योग्य तो आहार द्यावा. ज्योतिष शास्त्रामध्ये मुलांच्या अभ्यासासाठी चंद्राचा काय प्रभाव आहे ते देखील सांगितले आहे. जर कोणाच्या कुंडली मध्ये चंद्रमा असेल तर अशा मुलाला अभ्यासाविषयी संघर्ष करावा लागतो.
ज्योतिष शास्त्रामध्ये या समस्यांवर उपाय देखील सांगितले गेले आहेत. सर्वप्रथम तुमची मुले ज्या ठिकाणी बसून अभ्यास करतात ती जागा स्वच्छ असली पाहिजे. मुलांचे अभ्यासाचे टेबल कधीही उत्तर पश्चिम दिशेमध्ये असू नये या टेबलचे तोंड नेहमी पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे असले पाहिजे. मुलांच्या खोलीचा दरवाजा कधीही जीना किंवा बाथरूमच्या समोर असता नये.
जर तुमच्या मुलांचे कशामध्ये मन लागत नसेल तर बुधवारच्या दिवशी विष्णू मंदिरात जावे आणि त्या ठिकाणी पेन व धार्मिक पुस्तके दान करावीत यासोबत यांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुपाचा दिवा लावा. केळ्याच्या झाडाखाली पाणी घालून त्या मातीने मुलाच्या पुस्तकावर टिळक काढा. ज्योतिष शास्त्रानुसार मुलांच्या अभ्यासाच्या टेबल वर माता लक्ष्मीचा फोटो ठेवा.
तुमच्या मुलाला पूर्व दिशेकडे बसून अभ्यास करण्याची सवय लावा. अभ्यासामध्ये मन लागत नसल्यास तुमच्या मुलाच्या खिशामध्ये तुरटीचा तुकडा ठेवा शिवाय केसर चा तीलक लावणे देखील फार लाभदायी असते. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांना सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर ओम चा जप करायला सांगावा ज्याने एकाग्रता वाढेल.
टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्व सामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.