Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मांस खाल्यानंतर मनुष्याचे मन का बदलते.? बघा यावर श्रीकृष्ण काय म्हणतात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या पौराणिक ग्रंथ व सनातन ध’र्मानुसार नेहमीच जीव ह’त्या हे पाप मानले गेले आहे. मनुष्य आपले पोट भरण्यासाठी एखाद्या जीवाची ह’त्या करत असेल तर तो पापाला भागीदार तर होतोच शिवाय तुम्हाला हे माहित आहे का की मांसाहार केल्याने मनुष्याच्या मनावर देखील परिणाम होतो. वर्तमान काळात मांसाहार करण्याचे प्रमाण फारच वाढले आहे.

मनुष्य आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शिवाय आपल्या शरीराला पोषण देण्याच्या नावावर कुठलाही विचार न करता एखाद्या जीवाची ह’त्या करतो. हिं’दू ध’र्मानुसार जिवंत प्राण्याची ह’त्या करणारे लोक पापी लोकांच्या श्रेणीमध्ये येतात आणि मृ-त्यूनंतर त्यांना त्यांनी केलेल्या या पापाची शिक्षा भोगावी लागते. मांसाहारी भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर देखील याचा परिणाम होतो,

असे पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितले आहे. ऋग्वेद ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की, जो व्यक्ती अश्व, नर किंवा अन्य पशु ची ह’त्या करून मांसाहार करत असेल तसेच जो व्यक्ती गोमातेची ह’त्या करून बाकी लोकांना दुधापासून वंचित ठेवत असेल आणि फार समजावून देखील समजत नसेल तर अशा व्यक्तीचे शीर धडापासून वेगळे करण्यासाठी जरा पण संकोच करू नये.

भगवद्गीते नुसार भोजन तीन प्रकारचे असते. सात्विक, राजसी आणि तामसिक. सात्विक भोजनामध्ये दूध, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा वापर केला जातो. भगवद्गीते नुसार सात्विक भोजन करणारे व्यक्ती चिरायू होतात, शा-रीरिक व मानसिक रूपाने स्वस्थ असतात तसेच अशा व्यक्तींच्या मनामध्ये क्रोध, काम आणि मद नसतो. असे व्यक्ती शांत आणि दयाळू स्वभावाचे असतात.

भगवान श्रीकृष्ण यांनी सात्विक भोजनाला सर्वोत्तम भोजन सांगितले आहे. राजश्री भोजन हे शाकाहारीच असते परंतु गरम, मीठ व मसाले घालून बनविले जाते. हे भोजन सात्विक तर वाटते परंतु याच्यामध्ये वापरले जाणारे मसाल्यांमुळे त्याची सात्विकता कमी होते. सामासिक भूषण त्या भोजनाला म्हटले जाते जे अर्धे कच्चे शिजलेले असते, ज्या अन्नातून दुर्गंधी येते शिवाय हे अन्न अपवित्र असते.

या भोजनामध्ये मांसाहार आणि म’दीरा समाविष्ट केले आहे. या अन्नाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर देखील याचे नकारात्मक परिणाम होतात. मांस खाणाऱ्या व्यक्तीचे मन अशांत असते. मांसाहार करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये क्रोध, काम, विलासिता हे भाव उत्पन्न होतात. अशा व्यक्तींच्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रेम भाव किंवा दया राहत नाही.

मांसाहार करण्यासं’बंधी गरुड पुराणांमध्ये एक कथा सांगितली आहे ती अशी. एका राज्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे धान्याचे उत्पादन कमी झाले. परिस्थिती एवढी भयानक झाली होती की त्या राज्याच्या राजाने विचार केला की या परिस्थितीवर उपाय शोधला नाही तर हळूहळू करून राज्यातील सर्व धान्याची कोठारे रिकामी होतील आणि लोक भुकेने मरून जातील.

या वर मार्ग काढण्यासाठी राजाने तात्काळ सभा बोलविली, सभेमध्ये सर्व मंत्री उपस्थित होऊन आपापले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली त्यावेळी एका मंत्र्यांनी असे सुचवले की कमी वेळात शेती करून धान्य पिकवणे शक्य नाही अशावेळी राज्यामध्ये मांसाहार सुरू केला तर या समस्येपासून निवारण होऊ शकते, या बोलण्यावर सर्वांनी संमती दर्शविली परंतु तेथे उपस्थित असलेले प्रधानमंत्री शांत होते,

राजाने त्यांना त्यांचे म्हणणे विचारले असता त्यांनी सांगितले की मांसाहार करणे मला पटत नाही, मला उद्यापर्यंतचा वेळ द्या. प्रधानमंत्री त्याच रात्री मांसाहार खाण्यास सुचवणाऱ्या मंत्रीच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की राजाची तब्येत खराब आहे वैद्यांना बोलविले असता त्यांनी सांगितले की राजाला जर पुरुष राजाच्या मर्जीतला आहे आणि देहाने शक्तिशाली आहे अशा पुरुषाचे दोन तोळा मांस मिळाले तर,

महाराज लगेच बरे होतील. प्रधानमंत्री मी त्या मंत्र्यांना सांगितले की तुम्ही एकमेव राजाच्या वरची मधले माणूस आहात शिवाय देहाने देखील शक्तिशाली आहात तुम्हाला तुमच्या मांस बद्दल एक लाख सुवर्ण मुद्रा देण्यात येतील. जर तुम्हाला हा प्रस्ताव मान्य असेल तर मी कट्यार ने तुमचे शरीर कापून दोन तोळा मांस घेऊ शकतो का ? यावर तो मंत्री विचार करू लागला की,

जर आयुष्यात नाही राहिले तर एक लाख सुवर्ण मुद्रा घेऊन मी काय करू ? मंत्री आपल्या घरात जाऊन एक लाख सुवर्ण मुद्रा घेऊन आला आणि प्रधानमंत्री ना देत म्हणाला की मला क्षमा करा आणि या एक लाख सुवर्णमंत्र्यातून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचे मांस खरेदी करा. प्रधानमंत्री ने सर्व मंत्र्यांकडे मास ची मागणी केली परंतु कोणीही देण्यास तयार झाले नाही.

दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये सर्व मंत्री उपस्थित असताना प्रधानमंत्री ने सांगितले की कोणीही मांस देण्यासाठी तयार नाही. राजाला आपली चूक समजली आणि राजाने आपल्या प्रजेला अत्याधिक प्रयत्न करून धान्य पिकवण्याची विनंती केली. या गोष्टी मधून आपण असे शिकतो की ज्याप्रकारे मनुष्याचे जीवन अमूल्य आहे त्याप्रमाणेच इतर प्राण्यांचे देखील जीवन अमूल्य आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या सुखासाठी दुसऱ्या जीवाची ह’त्या करणे चुकीचे आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.