Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीची ह्रदयदावक व्यथा.. लग्नानंतर जे काही घडलं ते खूप विचित्र होतं.. तिचा नवरा रोज रात्री..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपण प्रेमाबद्दल फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. प्रेम ही खूप पवित्र गोष्ट आहे, तिची प्रत्येक व्याख्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. प्रेम करणारे फक्त दोन प्रेमी असतात असे नसते, जगातले सर्वात पहिले प्रेम आईचे आणि बाळाचे असते, आईच्या प्रेमात कसलाच स्वार्थ नसतो, अगदी निस्वार्थपणे आई आपल्या बाळाला पूर्ण आयुष्य अर्पण करते.

प्रेमाची रूपे ही वेग-वेगळी असतात, कधी बाप लेकाचे प्रेम असते तर कधी बहीण भावाचे. कधी मैत्रितले प्रेम असते तर कधी प्रेमाचीच मैत्री असते. या सगळ्या प्रेमाचा एक आधाराचा कडा म्हणजे विश्वास, पण जे प्रेयसी आणि प्रियकर असतात त्यांच्या प्रीतीला विश्वासाचा कडा असेलच असे नाही. कधी फक्त ओळखीच्या आधारावर ते एकमेकांवर प्रेम करू लागतात,

पण हे प्रेम पुढे जाऊन सक्रिय होईल की नाही ही शंकाच असते. पण जेव्हा दोघांच्यातील नाते मैत्री आणि विश्वासाला ओलांडून पुढे सरकते तेव्हा त्यांच्यातील प्रेम निखळ बनू लागते. विश्वास ठेवणे सोपे असते पण समोरील व्यक्तीचा घेतलेला विश्वास आपल्याजवळ जपून ठेवणे कठीण असते, प्रेमात आंधळे झालेले दोन जीव भविष्याची चिंता न करता एकमेकांना वचन देतात,

पण पुढे जाऊन आपल्याला ती वचने पूर्ण करता येतील की नाही याचा विचार केला जात नाही. अशाच काहीश्या वचना आहारी जाऊन एका मुलीने आपल्या आयुष्याचे धागे दोरे इतरांच्या हाती सोपवले आणि स्वतः मात्र आता केलेल्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची संधी शोधत आहे. मनाला खूपदा आवर घालूनही मन त्याच्यात गुंतत गेले आणि,

अखेर ती त्याच्या प्रेमात पडलीच, तसा तो दिसायलाही खूप छान होता. वाढत्या भेटीतून तिला त्याचा स्वभाव सुद्धा उमगला आणि बघता बघता दोघांची मने जुळली. कालपर्यंत एकमेकांसाठी अनोळखी असणारी ही दोघे आज प्रेमात पडल्याने प्रियकर आणि प्रेयसी बनले होते. पण आता प्रेमाच्या या नात्याला लग्नाची जोड द्यावी लागेल म्हणून दोघेही लग्न करण्याचा विचार करू लागले.

इकडे हिच्या घरी आईबाबांना शंका वाटतच होती. तेवढ्यात देवळात पळून जाऊन लग्न केलं त्यांनी. तिच्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध होताच. तिच्यावर लक्ष ठेवणं, सारखा मोबाईल चेक करणं. वैताग आला सगळ्याचा तिला. तो खरच चांगला आहे हे समजावूनही कोणालाच पटलं नाही. उलट तिला स्थळं बघायला सुरुवात केली.

शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरलं. देवळातले एक गुरुजी ओळखीचे होते. लग्न लावून द्यायला ते तयार झाले. मुलाकडच्यांना काहीचं अडचण नव्हती. त्याचं घर खेड्यातलं. दिराने देखील मदत केली लग्नासाठी. तिच्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला. भावाने बोलणं सोडून दिलं. कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते, सगळ्या गावात त्यांची छीथू झाली.

नातेवाइकांनी येऊन आईलाच दोष दिला. घरात ती लाडकी, असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. तिच्या वडिलांनी तर किती दिवस जेवणचं सोडलेलं. सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला. भावाचे मित्र तिला फोन करायचे. ताई तू चुकीचं केलं, असं पळून जायला नको होतं. घरच्यांची काय अवस्था झालीये माहितेय का तुला.

तुझा भाऊ अक्षरशः रडला. तिला सगळं कळत होतं. पण तिला त्याला गमवायचं नव्हतं. प्रेम करायची ती मनापासून त्याच्यावर. घरच्यांना तो नाही आवडायचा. कधीच लग्न लावून नसतं दिलं त्यांचं. लग्नाआधी तसा शरीर सं’बंध नव्हता आलेला त्यांच्यात. एकदा फिरायला गेलेले तेव्हा त्याने श’रीर सं’बंध करण्याचा प्रयत्न केलेला पण ती तयार नव्हती. लग्न झाल्यानंतर सतत सं’भोग व्हायचा.

सकाळी ती लवकर उठायची, सगळ्यांसाठी चहा करणं, मग जेवणाची तयारी. कपडे धूणं, लोकांच येणं जाणं घरात चालू असायचं. त्यामुळे सतत भांडी घासायला लागायची. घरात सहा माणसं. सासू सासरे, दीर, नणंद आणि ही दोघं. लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. वर्ष होत आलं लग्नाला. पोटात लेकरू होतं.

आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्नं खोटी ठरत होती. आपली बारा एकर शेती आहे, सिटीमध्ये दोन फ्ल्याट भाड्याने दिलेत, स्वतःचं दुकान काढायचंय, लवकरच गाडी घेऊ अशी दाखवेली सगळी स्वप्नं एक एक करून खोटी ठरली. गावातलं राहतं घर आणि अडीच एकर रान सोडलं तर काहीच नाही. त्यात दिराचं आणि नणंदेच लग्न डोक्यावर. दुकान होतं ते देखील क’र्जात बुडालं. नवरा कंपनीत कामाला जातो.

आठ हजार पडतात महिन्याचे हातात. कमवणारा एकटा आणि खाणारी तोंड सहा. नटण्या थटण्याची तिची सगळी हौस म’रून गेली होती. आई वडिलांकडं कुठल्या तोंडाने जाऊ म्हणायची. एकदा आई गेलेली भेटायला. जिद्दीने संसार कर म्हणाली. भाऊ तर अजूनही बोलत नाही. कुणासमोर ती मन हलकं करू शकत नव्हती. जरा काही घरात वाद झाले की नवरा हात उचलतो.

उगाच लग्न केलं म्हणतो. तू आल्यापासून प’णवती लागली. माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी त्याला आता काहीच फरक पडत नव्हता. रात्री लगट करण्यापुरता जवळ ओढतो. प्रेम कुठं गेलं काही पत्ता नाही. लग्न करून फसली ती. आयुष्याची वाट लागली. चूक झाली. पश्चाताप होत होता. पण काय करणार. आता माघारी जायला देखील वाट नव्हती. एकदा पाउल उचललं आता तिलाचं हे निभवावं लागणार होतं.

जे नशिबी आलंय ते भोगा’वं लागणार होतं. सगळं तो’डून जावं तर कुठं जाणार. आलेला दिवस ढकलायचा पोटातल्या लेकरासाठी. असंच ती तिचं आयुष्य रडतखडत जगत होती. मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा. पुढील अपडेट्स साठी आमच्या मराठी माहिती या पेज ला लाईक करून ठेवा. धन्यवाद..

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.