जे पती पत्नी दोघे मिळून धार्मिक कार्य करत नाहीत.. त्यांच्यासोबत काय घडते बघा.. यामुळे दोघांना..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, बऱ्याचदा आपण पाहतो की पूजा विधी करत असताना पती-पत्नी एकत्र करतात. धार्मिक मान्यतेनुसार पती किंवा पत्नी एकटेच पूजा करतात त्यावेळी त्या पूजेच्या फळाची पूर्णप्राप्ती मिळत नाही. तीर्थयात्रेला सुद्धा एकट्याने गेल्याने पूर्ण फळ मिळत नाही. असे का.? ते आता आपण जाणून घेऊया. सर्व नात्यांमध्ये स्त्री पुरुषाचे नाते सर्वात महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचे वर्णन केले आहे त्यापैकी विवाह संस्कार हा एक संस्कार आहे. लग्नाचा अर्थ फक्त दोन जीवांचे मिलन एवढाच नसतो तर हा संस्कार जबाबदारीची जाणीव देखील करून देतो. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाशी जोडलेले अनेक रितीरिवाज आहेत. असे सांगितले जाते की, सात फेरे आणि सात वचनांशिवाय विवाह पूर्ण होत नाही,
यासोबतच पती-पत्नीचे नाते देखील सात जन्मांचे असते. सनातन ध’र्मामध्ये पत्नीला पतीची अर्धांगिनी सांगितले गेले आहे. म्हणजेच पत्नी पतीचे अर्धे अंग आहे. पत्नीशिवाय पती अधूरा आहे आणि पती शिवाय पत्नी. पत्नी पतीच्या जीवनाला पूर्ण करते, ज्यावर पतीचा हक्क आहे ते सर्व सुख पत्नी आपल्या पतीला देते. पौराणिक मान्यतेनुसार,
पती-पत्नी विवाहाच्या वेळी एकमेकांना सात वचने देतात ज्यामध्ये एक वचन हे देखील दिले जाते की, पूजा पाठ आणि तीर्थयात्रा सारखे सर्व धार्मिक कार्य एकत्र मिळून करतील. स्त्री पुरुषाने एकत्र येऊन धार्मिक कार्य केल्यास घरातील शांतता आणि समाधान टिकून राहते शिवाय आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव राहत नाही.
हिं’दू ध’र्म ग्रंथांमध्ये पाहिले असता अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील की, जिथे स्त्रीला पुरुषाची शक्ती म्हटले आहे. राधा कृष्णा, सिता राम या देवाचे नाव घेण्या अगोदर शक्ती स्वरूप देवीचे नाव घेतले जाते. पत्नी शिवाय पती द्वारा केले गेलेले धार्मिक कार्य अधुरे मानले जातात. कुठलेही धार्मिक कार्य पती-पत्नी एकत्र मिळून करत असतील,
तर त्यांच्यामध्ये प्रेम कायम बनवून राहते. नात्यांमध्ये आलेल्या उतार चढावांना शिवाय क्लेश कमी होण्यास मदत मिळते. पूजेचे दुप्पट फळ मिळते आणि घरामध्ये चौपट सुख संपत्ती येते. पूजेचे फळ तात्काळ प्राप्त होते. जर पती-पत्नींना मनासारखे फळ हवे असेल तर त्यांनी एकत्र पूजापाठ करावे. एकत्र पूजा करतेवेळी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
भगवान शंकराने अर्धनारी चे रूप घेऊन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. या कारणामुळे स्त्रीला प्रत्येक कामात सहभागिनी बनवले जाते. हिं’दू ध’र्मशास्त्रामध्ये पत्नीला वामांगी सांगितले गेले आहे. याचा अर्थ आहे डाव्या बाजूचा अधिकारी म्हणूनच स्त्रीला पुरुषाचे डावे अंग मानले जाते. कारण भगवान शंकराच्या शरीराच्या डाव्या बाजूने स्त्रीची उत्पत्ती झाली आहे.
हस्तरेखा शस्त्राच्या काही पुस्तकांमध्ये पुरुषाच्या उजव्या हाताने पुरुषाची स्थिती आणि डाव्या हाताने स्त्रीची स्थिती दाखवली गेली आहे. स्त्रीला वामांगी म्हटले असल्यामुळे झोपते वेळी आणि आशीर्वाद ग्रहण करतेवेळी स्त्री नेहमी पुरुषाच्या डाव्या बाजूला असावी. यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते. महाभारतामध्ये देखील पती-पत्नीच्या सं’बंधांविषयी बरेच काही सांगितले गेले आहे.
भीष्म पितामह यांनी सांगितले की, पतीचे कर्तव्य असते की त्याने पत्नीला नेहमी खुश ठेवावे. कारण स्त्री मुळेच वंशवृद्धी होते, स्त्री घरातील लक्ष्मी आहे. जर घरातील लक्ष्मी आनंदी असेल तरच घरामध्ये सुख संपत्ती येईल. गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांविषयी संक्षिप्त रूपात वर्णन सांगितले आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे पती-पत्नीचे नाते हे फार पवित्र असते, पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात.
पत्नीचे गुण किंवा अवगुण हे पतीला प्रभावित करत असतात. जी पत्नी घर स्वच्छ ठेवते, घरातील सर्व कामे करते, अतिथींचा आदर करते, थोड्या सामग्रीत देखील घर चालवण्याची क्षमता ठेवते, यासारख्या सर्व जबाबदाऱ्या पार पडते अशा स्त्रीला सुशील पत्नी असे म्हटले आहे. अशी पत्नी आपल्या परिवारासाठी आणि पतीसाठी भाग्यशाली मानली गेली आहे. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.