या तरुणाने खोटं बोलून प्रेमात पाडलं, लग्न केलं पण लग्नानंतर खोटं उघड पडलं पुढे जे घडले ते पाहून तुम्ही देखील.. पहा

नमस्कार मित्रांनो..
एका पार्टीमध्ये तिची आणि त्याची भेट झाली. ती मुलगी फारच सुंदर आणि कुणालाही आवडेल अशी होती. तो मात्र अगदीच साधा, सरळ होता. त्याला फार मित्र देखील नव्हते. त्याने तिला पाहिले आणि तिच्याशी एकदा तरी बोलायचे असे मनात ठरवले. सर्व बळ एकवटून तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला की पार्टी संपल्यावर तू माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का ?
तिला नाही म्हणणे फार सोपे होते परंतु तिने त्याच्या डोळ्यातील नितळ पारदर्शी भाव आणि आवाजातला आर्जव व त्याचा प्रामाणिकपणा पाहिला आणि ती हो म्हणाली. ती आपल्याला हो म्हणेल याचा त्याने विचारच केला नव्हता. कॉफी शॉपमध्ये ते दोघे कॉफी पिण्यासाठी गेले तेथे बसल्यानंतर दोघेही अवघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे बोलणे होत नव्हते.
कॉफीची ऑर्डर आली त्याने कॉफी पिताच वेटरला हाक मारली. वेटर त्याच्याजवळ आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे मीठ मागितले, सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले अगदी ती सुद्धा! वेटरने त्याला मीठ आणून दिल्यानंतर त्याने ते मीठ कॉफीमध्ये टाकले आणि पिऊ लागला. तिला रहावलं नाही आणि तिने त्याला विचारले की,
तुला ही अशी जगावेगळी सवय कशी लागली? त्याने सांगितले की तो लहानपणापासून समुद्रकिनारी राहायचा. समुद्राच्या पाण्यामध्ये तासंतास खेळायचा. कॉफी पिण्यासाठी आई जेव्हा हाक मारायची त्यावेळी कॉफीच्या बशी मध्ये बोट बुडवून ती कॉफी प्यायचा, आता आई राहिली नाही आणि ती खारट कॉफी ही राहिली नाही.
परंतु या खारट कॉफीची चव मला माझ्या आईची आठवण करून देते आणि पुन्हा बालपणात घेऊन जाते त्याचे हे सर्व बोलणे ऐकून तिचेही मन भरून आले आणि ती देखील आपल्या बालपणाविषयी, वडिलांविषयी बोलू लागली. त्या दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला होता. ते दोघे वारंवार भेटू लागले. नंतर तिच्या लक्षात आले की हाच तिचा जीवनसाथी आहे.
तो स्वभावाने फारच प्रेम शांत आणि तिची काळजी करणारा होता. काही दिवसांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. दोघेही फार आनंदात होते ती त्याच्यासाठी सर्व काही करायची अगदी कॉफी सुद्धा त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी ती कॉफीमध्ये चिमूटभर मीठ सुद्धा टाकायची.
त्यांच्या संसाराला चाळीस वर्ष पूर्ण झाली होती. एके रात्री तो झोपला तो कधीही न उठण्यासाठी. त्याच्या मृ’त्यूनंतर तिने स्वतःला कसेबसे सावरले. एके दिवशी पुस्तकांचे कपाट आवरत असताना तिला एक चिक्की सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्याने कधीतरी ती चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठी मध्ये त्याने लिहिले होते की,
“प्रिये! मला माफ कर. मी आज पर्यंत तुझ्याशी एक गोष्ट खोटं बोलत होतो. ही एकच गोष्ट खरी सांगायची मी कधी हिम्मत केली नाही कारण तू मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावेन या भीतीने. कॉफी शॉप मधल्या आपल्या पहिल्या भेटीवेळी खरं तर मला कॉफी मध्ये टाकण्यासाठी साखर हवी होती परंतु मी एवढा गोंधळलो होतो की मी साखरेऐवजी मीठ मागितले.
मी मीठ मागितले या विषयावर आपल्यामध्ये संभाषण सुरू झाले होते म्हणून मी ते तसंच पुढे चालवून घेतलं. खारट कॉफीची चव किती विचित्र असते म्हणून मला खारट कॉफी अजिबात आवडत नाही परंतु मला तू खूप आवडतेस, मला तुला गमवायचे नव्हते म्हणून मी आयुष्यभर खारट कॉफी पीत राहिलो. आता म’रण्याआधी मला तुला हे सत्य सांगायलाच पाहिजे, खोटेपणाचं ओझं मी आता पेलू शकत नाही मला माफ कर.”
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.