Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या मुलीने घरच्या परस्थितीमुळे त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही.. 7 वर्षाने एकत्र भेटल्यानंतर जे घडले ते पाहून तुम्हीही..

नमस्कार मित्रांनो..

अंजु ही सर्व लग्न समारंभाच्या वेळी व्यवस्थापनाचं काम घेत असे, त्यावेळी मी एका लग्नाच्या कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हा मी पाहत होतो की, एक सावळ्या चेहऱ्याची तरुण मुलगी या कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे करीत होती. या पूर्ण समारंभात ती जबाबदारीने प्रत्येक काम पाहत होती. ती दिसायला जरी सावळी असली तरी सगळ्यांना स्वतःकडे आकर्षून घेणारी होती.

तेव्हा माझ्या शेजारीच बसलेल्या आत्यानी विचारल्यास तिने हीच अंजु अशी मला ओळख करून दिली. तिची घरची परिस्थिती जरा गरीब असल्याने, तसेच तिला वडील नाहीत म्हणून तिची आई स्वयंपाकाची कामे करत असत. याशिवाय अंजु शिकतही आहे. तेवढ्यात आमच्याकडे अंजु आली, तेव्हा आत्याने माझी ओळख करून दिली, आत्या माझ्याकडे वळत म्हणाली,

हा माझा भाचा विद्याधर आणि तेव्हा माझ्याकडे बघून अंजु नमस्कार असे मला म्हणाली. मग लग्न झाले, जेवण झाल्यावर आमचे काका मला विचारले की, अरे तुला मोटरसायकल चालवत येते ? मी मान डोलावली. अरे तुला अंजुला घरी सोडायचे आहे, हे कळल्यावर मी ताडकन उभा राहिलो आणि अंजु रस्ता सांगत होती, मी गाडी चालवत होतो. तिच्या घरी पोहोचलो, अंजुचे घर पण व्यवस्थित होते.

ती मला चहा पिण्यासाठी आग्रह करत होती, खरेतर श्रीखंडाच्या जेवणावर काहीच नको होतं, पण केवळ अंजुशी अजून बोलता यावं म्हणून, हो म्हणालो. अंजुने सांगितले की, ती MA ला ऍडमिशन घेणार आहे, तेव्हा माझ्या एका मित्राने नुकतेच MA पूर्ण केले होते, त्याची पुस्तके पडून असल्याने, ती पुस्तके अंजुला आणून दिली. तेवढाच तिचा खर्चही वाचला, ती हो म्हणाली.

तीला पुस्तके देण्याच्या बहाण्याने व काहीतरी कारणाने पुढे भेटत राहिलो. ती नेहमी मोकळेपणाने बोलायची पण अंतर राखूनच, असेही तिने अप्रत्यक्षपणे सुचवले. मग बऱ्याच दिवसांनी, मलाही नोकरी लागली, अंजूची एम ए फायनलची परीक्षा झाली. शेवटी मी एकदाच धाडस करण्याचे ठरविले आणि एकदा आई नसताना गेलो. तिने दरवाजा उघडताच,

तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत मी आत शिरलो व सांगू लागलो, मी विद्याधर वय २५ युवा बँकेत नोकरी करतो, पगार ४० हजार आणि पुढे वाढण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती उत्तम, स्वतःचे घर, निर्व्यसनी, कोणतेही बंधन नाही. मी हे एका दमात सांगितले. अंजु माझ्याकडे आश्चर्याने पहात म्हणाली, पण तुम्ही मला का सांगताय.. त्यावर मी म्हणालो की, कारण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.

ती पुटपुटली आणि म्हणाली, ते शक्य नाही. कारण आपल्या परिस्थितीत खुप फरक आहे. तुझे आई-वडिल म्हणतील की, चांगला मुलगा पाहून हिने जाळे टाकले आणि एकुलत्या एक मुलाला आई-वडिलांपासून तो-डण्याच्या पापात मला पडायचं नाही. त्यावर मी म्हणालो की, संसार मला करायचा आहे, त्यांना नाही. काय तुझ्या मनात कोणी दुसरा कोणी आहे ?

त्यावर तसे वाटते का म्हणून, तिने डोळ्यात पाणी भरले. माझी चूक झाली, तुझ्याबरोबर भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली, असे म्हणत, मी खुप निराशेने निघून गेलो. या गोष्टीला आज सात वर्ष झाली. आज मी इथे याच कार्यालयात पोहचलो आहे. पण ती अंजूची अंजू ताई झाली आहे. ती प्रत्येकाला नाष्टा कसा झाला, आवर्जून विचारत होती, त्याशिवाय स्वयंपाक घरात जाऊन आचारीला सूचना देत होती.

ती आता जरा जाड झाली होती. तेवढ्यात माझी पत्नी जवळ आली आणि तिने बाजूला तिला हाक मा’रली, अंजू ताई. तेव्हा एक क्षण मी खूप भयभीत झालो, पण आम्ही काहीच केले नव्हते. पण तीने अंजुचे काम पाहून तिला पुढच्या महिन्यात दिराच्या लग्नाची ऑर्डर देऊन टाकली. तेवढ्यात कोणीतरी हाक मा-रली म्हणून पत्नी उठून गेली. मग मी अंजुची विचारपूस केली.

आज मी आणि नवरा स्वतंत्र कामे घेतो, आमच्या हाताखाली माणसे आहेत एकेकाळी अशक्य वाटत होते, ते आता सर्व शक्य झाले आहे. त्यावर ती मी सुखी आहे, हे वाक्य एवढ्या मोठ्याने बोलली की, चार लोकांनी आमच्याकडे वळून पाहिले आणि ती घाईघाईने उठून गेली आणि मी सुन्नपणे बसून राहिलो. मी चेहरा स्वच्छ करायला कोपऱ्यातल्या बेसिनला गेलो, तर तिथे अंजु साडीने आपले डोळ्यातील अश्रू पुसत होती.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.