Alphamarathi.com

Super Fast Marathi News
त्या दिवशी सकाळपासून माझी चौथी वेळ होती.. खूप त्रास होत होता.. तरी सुद्धा मी पाचव्यांदा माझे श-रीर.. बघा पुढे ती काय म्हणते..

नमस्कार मित्रांनो..

ती खूप अशक्त झाली होती. म्हणत होती- आज नको साहेब, आज सकाळ पासून माझी चौथी वेळ आहे, खूप त्रास होतोय. आजची रात्र दुसऱ्या कोणाला तरी सांगा. प्रिया कळवळून समोर असलेल्या राकट, पण ऐकेल तो दलाल कसला ? त्याने तिच्या मर्जी विरुद्ध गिऱ्हाईकाला आतमध्ये पाठवलेच. गिऱ्हाईकच्या मर्जी विरुद्ध कोणतीही बाई खोली बाहेर जाऊ शकत नव्हती.

तिच्या मर्जी विरुद्ध तो तुटून पडला तिच्यावर. असं अनेकदा व्हायचं. अनंत क’ळा ती निव्वळ यासाठी सह न करायची कि त्यातून मिळणाऱ्या पैशातून गावाकडे लहान भाऊ आणि आई दोन घास सुखाने खाऊ शकत होते. मध्यरात्री तिला जाग आली तेंव्हा खोलीत कोणी नव्हत. ती तशीच निपचिप पडून राहिली. त्या रात्री अचानक तो आला, अर्थातच गिऱ्हाईक म्हणून, सडपातळ बांधा, मध्यम उंची, इन शर्ट,

डोळ्यावर डिझाईनचा नवीन चष्मा, केस घामाने भिजलेले. त्या दिवशी तो पहिल्यांदाच त्याच्या मित्रांसोबत अशा ठिकाणी आला होता. आणि आजच त्याची भेट प्रिया सोबत ठरली होती. खोलीत तर त्याला वेगळीच घुसमट जाणवू लागली. त्याने प्रियाला सांगून टाकले, कि माझ्या मित्रांनी जबरदस्ती केली म्हणून तो इथे आला आहे. त्याला तिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये.

सो त्याच्या मित्रा च झाल कि तो इथून निघून जाईल, तोपर्यंत तो या खोलीत बसून राहील. तिच्या बिछान्याच्या समोर असलेल्या खुर्चीवर तो बसला, ती मात्र कावरी बावरी होऊन बिछान्यावरच बसून राहिली. दोघांची नजरानजर होते, पण दोघेही माना वळवतात. थोड्या वेळाने, हाय.. मी हरीश, मला सगळे हरी म्हणून ओळखतात. तुमच नाव काय ? त्याने प्रियाला प्रश्न केला,

तीने गोंधळलेल्या आवाजात तीच नाव सांगितलं. किती शिकला आहात? कुठे राहता? इथे कशा आलात? त्याने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. अहो आम्हाला आमची माहिती सांगण्यास मनाई आहे. तिने थोड्या चढ्या आवाजात सांगून टाकले. मला थोडे पाणी मिळेल का ? त्याने झटकन विषय बदलला. त्याच्या मधुर आवाजाने ती पार विरघळून गेली होती.

आजवर इतकं छान आपल्याशी कोणी बोललच नाही. इवढी छान हाक कधी ऐकायलाच मिळाली नाही आपल्याला. ती मनोमन सुखावली. प्रिया, माझ्याकडे समोसे आहेत खाणार का ? अस म्हणत त्याने पिशवीतून समोसे बाहेर काढले. हा काय प्रकार आहे ? इथे येणारा माणूस येताना फक्त वा’सना घेऊन येतो आज हा पहिला व्यक्ती आहे, ज्याने समोसे आणलेत खायला ती अधाश्यासारखी समोस्यांकडे पाहू लागली,

तिची भूक पाहून त्यानेच स्वतःहून डिश तिच्या समोर धरली. ती समोसे खाऊ लागली, अग हळू, ठसका लागेल न, तो तिला समजाऊ लागला, तिला समोसे खूप आवडायचे, पण इथे आल्यापासून फक्त शिळी भाकरी खायला मिळते, बाहेर तर जाऊच शकत नाही. त्यामुळे समोसे पाहून ती पार विरघळून गेली. साहेब, इथे येणारा प्रत्येक माणूस वा’सना घेऊन येत असतो फक्त,

कोणी पैसे वसूल करत, तर कोणी घरातला, ऑफिसचा माहित नाही. कुठला कुठला राग आमच्या शरीरावर काढत असत. मला या खोलीच्या बाहेर जाऊन वर्ष झाल असेल, इथे ना वार कळतो ना तारीख, ना महिना, रोज आपले कोणाच्या तरी वा सने खाली झोपायचे, हे माझे काम. किती सि’गारेटचे चटके सोसलेत मलाच आठवत नाही. धुराच्या भयानक घाणे’रड्या वासाने झोप सुद्धा नीट लागत नाही.

मला काय हवय हे सुद्धा कोणी विचारत नाही. कारण काही झाल तरी शेवटी मी एक वे-श्या आहे. प्रिया उद्या माझ्यासोबत फिरायला येशील ? तो निरागसतेने तिला विचारतो. तिचे डोळे चमकतात, साहेब तुम्ही खूप साधे आहात. तुमच्या मनात कसलेही कपट नाही, लोभ नाही, म्हणून तुमच्याशी एवढ बोलले मी. अग मी खरचं विचारतोय येशील का ? तुझ्या भूतकाळात तू खूप त्रास सहन केला आहे हे मला माहित आहे.

तू मनाने खूप साधी आहेस, इथले लोक तुझा गैर फायदा घेत असतील याची मला कल्पना आहे. प्रियाचे डोळे भरून येतात, आजवर आपल्याबद्दल येवढा विचार कोणीच केला नसेल. ती हमसून हमसून रडू लागते. नको साहेब राहूद्या, इथला अंधार हाच माझा सोबती आहे, बाहेरच्या जगात लोक मला जगू देणार नाहीत, प्रत्येक वाटेवर माणसे मला नजरेने न-ग्न करतील, त्यापेक्षा मी इथेच बरी.

मग मी तुला भेटायला येत जाऊ का? प्रिया हसू लागते, साहेब तुम्ही बद’नाम व्हाल या गल्लीत. आज आलात तेच खूप आहे, पुन्हा नका येऊ कधी. आपला समाज खूप पोकळ आहे, स्वतः काहीही करेल पण समोरच्याने जर काही चुकीच केल तर त्याला सुखाने जगू नाही देणार. आज कितीतरी दिवसांनी ती भरभरून बोलत होती. रात्रभर त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. सकाळी तो तिचा निरोप घेऊन जाऊ लागला. प्रिया आजही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसली.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.