रिटायर शिक्षकाला त्याच्या मुलाने घरातून हाकलून दिले.. वडिल पो’लिसांकडे गेले पण पोलिसाने पुढे जे केले..
नमस्कार मित्रांनो..
गुरुजींनी वैतागून शेवटी इच्छा नसतांनाही पो’लीस स्टेशनची पायरी चढलीच. “साहेब, माझी तक्रार लिहून घ्या.” साहेबांनी जरा ओळखीचा आवाज ऐकून हळूच वर मान करून पाहिले. एक सत्तरीचे गृहस्थ शर्ट पायजमा ह्या साध्या वेशात समोर उभे होते. साहेबांना चेहरा ओळखीचा वाटला. त्यांनी पुढे होऊन बसायला खुर्ची दिली. “बोला, काय नाव आणि काय तक्रार आहे तुमची ?”
“माझे नाव तुकाराम काळे. मी निवृत्त शिक्षक आहे. बायकोचे निधन झाल्याने सध्या मुलाकडे राहतो. माझी तक्रार अशी आहे की माझा मुलगा आणि सून मला त्रास देतात. मुलगा रात्री दा’रू पिऊन आल्यावर मारहाण करतो.” गुरुजींचे नाव ऐकून साहेब भूतकाळात गेले. गावात पाचवी ते सातवीपर्यंत गुरुजी त्याला शिकवायला होते.
गुरुजींच्या आवाजात जरब, पण मनाने खूपच प्रेमळ. तो हुशार असला तरी उनाड आणि अतरंगी विद्यार्थी होता. शाळेच्या वेळात बरेचदा रानोमाळ भटकायचा, शाळेत मुलांच्या खोड्या काढायचा. गुरुजींनी छडी असूनही कधी वापर केला नाही. छडी पेक्षा प्रेमाने समजवण्याचा जास्त प्रयत्न करायचे. बरेचदा गुरुजी त्याला शाळेबाहेर भटकताना पाहून वर्गात आणून बसवायचे.
आज शाळेतले ते दिवस आठवून साहेब गालातल्या गालात हसत होते. गुरुजींनी साहेबांना हसताना पाहून विचारले, “का हो साहेब, का हसताय.” “काही नाही, सहज हसतोय. बरं तुम्ही, मला तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर द्या आणि बिनधास्तपणे घरी जावा. काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल. “गुरुजी ठीक आहे म्हणत घरी निघून गेले.
गुरुजी आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा पो’लीस ठाण्यात आले. गुरुजींना पाहून साहेबांनी खुर्चीवरून उठत गुरुजींचे स्वागत करत नमस्कार केला. “या या गुरुजी, काय म्हणते तब्येत? मुलगा आणि सुनबाई ने काही त्रास दिला का परत ?” “नाही हो साहेब, तुम्ही काय जादू केली कळालेच नाही. पण घरी सध्या कमालीचा बदल जाणवतोय.
मुलगा, सुनबाई दोघेही खूपच काळजी घेत आहेत. चहा, नाष्टा, जेवण सगळ वेळेत. विशेष म्हणजे मुलाचे दा’रू पिऊन येणे सुद्धा बंद झाले. तुम्ही असा काय कानमंत्र दिला.” “गुरुजी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला साहेब म्हणू नका. खरे सांगायचे झाले तर मी काहीही केले नाही. फक्त फोनवरून थोडे माझ्या भाषेत समजून सांगितले.
त्याने समजून घेतल्याने पो’लीस स्टेशनला बोलवण्याची वेळ आली नाही.” “मी आज पुन्हा इकडे खास तुमचे आभार मानण्यासाठीच आलो आहे. बाकी काही काम नव्हते.” “गुरुजी, आभार मानून मला लाजवू नका. तुम्ही मला ओळखले की नाही हे माहीत नाही, पण मी तुम्हाला पहिल्या भेटीतच ओळखले. तुम्ही मला पाचवी ते सातवीपर्यंत शिकवायला होते.”
“अरे मी तर तुला ओळखलेच नाही. खूपच आनंददायी दिवस आहे, की माझा विद्यार्थी पी एस आय झालाय. अविनाश का तू?” असे म्हणत गुरुजींनी उठून पाठीवर कौतुकाचे थाप मारले. गुरुजींची कौतुकाची थाप पाठीवर पडतात त्याला गहिवरून आले. “गुरुजी, ही सगळी तुमची कृपा आहे. तुम्ही त्यावेळी मला प्रेमाने समजावून सांगताना म्हणाले होतात की,
मी आज तुझ्या पाठीमागे छडी घेऊन पळतोय, तसा तू शिकून काही दिवसांनी गुं’डांच्या मागे दंडूका घेऊन पळालेला पाहायचा आहे. गुरुजी तुमचे आणि माझेही स्वप्न पूर्ण झाले. त्यात तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते. परीक्षा दिली, पास झालो आणि योगायोगाने खाकी गणवेशात तुमच्यासमोर बसायचे भाग्य लाभले. खरोखरच मी खूपच नशीबवान आहे.”
“नाही रे, त्यात माझे कसले योगदान. खरी मेहनत तुझीच आहे. माझे कामच होते मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे.” “गुरुजी मी ठरवले आहे की तुमची ताठ मान खाली जाईल असे कोणतेही काम करणार नाही. गोरगरिबांना योग्य न्याय देण्यासाठी तसेच अप’राध्यांना शिक्षा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहील.” “वा! तू खरोखरच माझा आदर्श विद्यार्थी आहे.
हे तू मला काही दिवसातच तुझ्या कामातून दाखवून दिले आहे. खरोखरच तुझे मनापासून धन्यवाद.” “गुरुजी, धन्यवाद देऊन मला लाजवू नका. तुम्ही मला तुमची मदत करण्याची अनोखी संधी दिली हीच माझ्याकडून तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा समजा.” “यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा काय असावी. खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद.
तुझ्याबद्दल सांगताना मला नक्कीच अभिमान वाटेल. चल येतो मी, तुझा हेवा आणि गर्व वाटेल असे काम असेच सुरू ठेव. शुभेच्छा.” “गुरुजी, मी आज असे तुम्हाला जाऊ देणार नाही. जेवणाची वेळ झाली आहे. आपण आज हॉटेल मध्ये सोबतच जेवण करूया.” त्याने हॉटेलमध्ये आग्रहाने गुरूजींना सोबत जेऊ घालत, घरी येण्याचे आमंत्रण देऊन, पुन्हा भेटत राहू असे म्हणत निरोप घेतला
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.