Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रस्त्यावरती स्त्रीला एकटक बघणे, बस मध्ये मागून धक्के देणे पहा त्या स्त्रियांवरती कसा परिणाम होतोय.. एका स्त्रीने सांगितलेला प्रसंग

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, काल माझ्यासोबत एक प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे गाडीवर घरी जात होतो. अचानक विरुद्ध दिशेकडून एक प्रौढ व्यक्ती समोरून येणाऱ्या दोन महिलांकडे बघू लागला. त्या क्रॉस होऊनही त्याची नजर सरळ झाली नाही. लक्ष विचलित झाल्यामुळे सरळ मला येऊन धडकला. धडकल्यावर त्याचे वय पाहून त्याची कीव करावी वाटली. तरी भांबावून, दिसत नाही का ?

असा उलटा सवाल महाशय मलाच करू लागले. मी त्यांना तुम्ही कुठे बघत होते ? याची जाणीव करून दिली. या वयात ही तुमच्या विकृत सवयी जात नाही म्हणून खडसावले. कशी तरी सावरा सावर करून महाशय चालते झाले. हे दृश्य तसे पाहिले तर काही नवीन नसून अगदी नित्य आहे. काही लोकांना समोरून येणाऱ्या महिलेचा किंवा समोरून जात असलेल्या,

स्त्रीचा चेहरा पाहिल्याशिवाय समाधान होत नाही. समोरून येणाऱ्या स्त्रीला किंवा मुलींना अगदी त्यांची मान खाली जाईपर्यंत अखंड न्याहाळणे, ती आपल्यासमोर असेल तर तिला मागे वळून तिच्याकडे बघणे, अगदी ती लाजिरवाणी होईपर्यंत हपापल्यासारखे तिला बघत राहणे, इत्यादी अमानुष वर्तन ते करतात.

एका स्त्री किंवा मुलीला हे अतिशय क्लेशदायक ठरतं. आज-कालच्या ह्या स्वातंत्र्य असलेल्या जगात स्त्रियांना बंधिस्त वाटते ते ह्यामुळेच. यामध्ये आश्चर्य तेव्हा वाटत किंवा चीड तेव्हा येते जेव्हा एखादा प्रौढ व्यक्ती हे करतो. जरी स्त्रीने ह्या गोष्टीवर आक्षेप घेऊन काही बोलले तरी वयाचा फायदा घेऊन त्यांची लगेच सुटका होते. ह्या गोष्टीची जास्त चीड येते.

रस्त्याने चालताना समोरून येणाऱ्या महिलेला आपल्या हावशी नजरेने एकटक बघणे किंवा ओव्हरटेक करताना गाडीवरून मागे वळून तिला बघणे ही काही पुरुषांची एक वाईट प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा विकृती आहे असे मी म्हणेन. समोरच्या महिलेच्या मनाचा विचार न करता असभ्यपणे हे कृत्य करणे, म्हणजे असमंजस्याची परिसिमाच गाठणे आहे.

बऱ्याच पुरुषांना बायकांनी म्हटलेले ‘पुरुषांच्या घाणेरड्या नजरा’.. वगैरे वाक्य खटकतात. त्यावर त्यांची उत्तरं, ‘हे म्हणजे अतीच झालं’, ‘आता काय डोळे बंद करून बाहेर वागायचं का?’, ‘नुसतं पाहिलं तरी वाईट का ?’, ‘पाहिलं की भो’कं पडतात का यांना’, अशा प्रकारची उद्धट असतात. स्त्री सौंदर्य न्याहाळणे ही पुरुषाची मक्तेदारी आहे असे काही लोक म्हणतात.

पण त्यातून आपली प्रतिमा किती सकारात्मक परावर्तित होते याचे भान पुरुषांनी ठेवायला हवे. एका स्त्रीला तुमच्या या विकृत नजरेचा किती त्रास होतो याची कल्पना तुम्ही करायला हवी. आपल्या आई-बहिणी किंवा पत्नी सोबत कधी असताना अशा परपुरुषाच्या नजरा आपण सहन करणार नाही. मग रस्त्यावरच्या महिलांना इतक्या गैरवर्तणुकीतून बघणे कितपत योग्य आहे,

याचे आत्मपरीक्षण अशा विकृत मानसिकतेच्या पुरुषांनी करायला हवे. आपण कोण आहोत ? आपले वय काय ? आपण गाडी चालवत आहोत की कुणी प्रतिष्ठित आपल्या सोबत आहेत ? याचा कुठलाच विचार न करता आपली विकृत नजर ती स्त्री नजरेआड होईपर्यंत रोखून धरणे म्हणजे विकृतपणाचा कळसच. शाळा कॉलेज किंवा तारुण्यात हे नैसर्गिक आहे.

पण आयुष्याचा एक टप्पा गाठल्यानंतरही स्वतःचे असे हीन प्रदर्शन करणे सामाजिक दृष्ट्या स्वीकाराह्य नसायला पाहिजे. पण, जे कोणी आजच्या घडीला टीनएजर किंवा नुकतीच मिसरूड फुटलेली पोरं आहेत, जी तुम्ही उद्याचं भविष्य असणार आहात, कारण ‘उद्याचा समाज कसा असावा’, हे तुमच्या हातात आहे. पण कुणालाही याविषयी आपण प्रत्यक्ष उद्बोधन न करता हा विषय फक्त लिहून मांडू शकतो हे त्यातील कटू सत्य आहे. शेवटी व्यक्ती तितक्या विकृती.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.