Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पांढरे केस कायमचे काळेभूर होतील.. फक्त या तेलामध्ये मिसळून लावा हे 2 पदार्थ.. एकदा करून पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हालाही राखाडी केस काळे करायचे आहेत का ? कोणताही रंग न वापरता, कोणतेही रसायन न लावता आपण काहीसे पांढरे झालेले केस पुन्हा काळे करू शकतो. केसांची मुळे मजबूत करू शकतो. यासाठी आज आपण असा हेअर मास्क बनवणार आहोत, जो पूर्णपणे नैसर्गिक देखील आहे आणि आपले केस काळे करेल, केसांची मुळे मजबूत होतील, केस गळणे थांबेल.

यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी इथे घ्यावी लागेल ती म्हणजे चहा पावडर. या उपायामध्ये योग्य आहार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जे पोषण आपण शरीराला आतून देऊ शकतो, ते बाहेरून देऊ शकत नाही. तुम्ही व्हिटॅमिन सी असलेल्या वस्तूंचे जास्तीत जास्त सेवन करा. तुम्ही दिवसाला एका आवळ्याचे सेवन देखील करू शकता कडीपत्ता खाऊ शकता.

भिजवलेले बदाम खाल्ले तरी सुद्धा तुमच्या केसांना पोषण देतात. प्रत्येक घरात चहा बनवण्यासाठी वापरली जाणारी चहा पावडर आपण येथे एक चमचा घ्यायची आहे. ही पावडर खलबत्याच्या साहायाने थोडी कुटुन घ्या. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कॉफी पावडर. दुसरे एका वाटीमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्या. एक रिकामी वाटी घेऊन,

त्यात अर्धी वाटी खोबरेल तेल घ्या. एका लिंबाचे चार तुकडे करून एका तुकड्यांमध्ये जेवढा रस निघेल तेवढा रस या तेलात काढून घ्या. लिंबामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या केसांची वाढ होण्यास मदत होते तसेच केसांच्या मुळाशी कुठले इन्फेक्शन असेल तर तेही कमी होते. लिंबाच्या वापरामुळे केसांचे गळणे बंद होते.

तेल आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा कॉफी पावडर टाकायची आहे. या मिश्रणात कुठून ठेवलेली चहाची पावडर सुद्धा पाऊण चमचा टाकायची आहे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण एका तासासाठी असेच ठेवून द्या. जर हे मिश्रण तुम्ही दुपारी तयार करत असाल तर दुपारच्या वेळी जेऊन येते तेव्हा हे मिश्रण एका तासासाठी ठेवून द्या.

आता हेअर मास्क वापरायचा कसा ते आपण पाहू. केसांची सुरुवात आपल्या मुळापासून होत असते त्यामुळे केसांच्या मुळाशी या तेलाने चांगल्या प्रकारे मालिश करा. हे तेल तुम्ही गाळून देखील घेऊ शकता किंवा तसेच वापरले तरी चालेल. जर तुमचे केस कोरडे आणि खराब झालेले असतील तर उरलेले तेल तुमच्या बाकी केसांना सुद्धा लावू शकता. या तेलाच्या वापराने तुमच्या केसांमध्ये चांगली चमक येईल.

हे ३ ते ४ आठवडे पुरेल एवढे बनवून ठेवू शकता. आठवड्यातून तीन वेळा या तेलाचा वापर करा. आंघोळीच्या आधी एक तास यातील आणि तुमच्या केसांना चांगल्या प्रकारे मालिश करा आणि कुठल्याही हर्बल शाम्पू वापरून केस धुवून टाका. या तेलाच्या वापराने हळूहळू तुमच्या केसांमध्ये होणारा बदल तुम्हाला दिसेल. पांढरे पडत असलेले केस काळे होतील, केसांचे गळणे थांबले,

केसांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला केसांची सं’बंधित समस्या असतील तर या आयुर्वेदिक तेलाचा वापर नक्कीच करून पहा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.