पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते.. कारण नवऱ्याने १० वर्ष फक्त तिच्यासोबत.. पुढे बघा काय घडले..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रेम हे अंधळे असते असे आपण खूप लोकांकडून ऐकत आलो आहोत. अशीच एक घटना आज आपण पाहणार आहोत. आंतर जा’तीय विवाह करून घरच्यांचा विरोध पत्करून पळून जावून लग्न केलेली आरती १० वर्षांनी माहेरच्या दारात उभी होती. हातात एक लिफाफा घेऊन, १० वर्षांनी माहेरच्या दारात येऊन उभे राहताना,
डोळ्यात पाणी आणी मनात भीती तर होतीच. घरात आरतीचा भाऊ सुजय आणी सुजयची बायको मेघा, आणी आई जरा टेन्शन मध्ये बसले होते. आरतीच्या बाबांचे हार्ट चे ऑ’परेशन करण्यास सांगितले होते. ऑ-परेशनला किमान ५ ते ६ लाख खर्च येणार होता. सुजयचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीतही धर-सोड चालूच होती.
त्यामुळे त्याला पगार कमीच होता. इतके दिवस बाबांच्याच जीवावर घर चालत होत. घरात तीच चर्चा चालू होती, पैशांची जुळवाजुळव कशी करायची. सगळे हातभर झाले होते. तेवढ्यात दारात आरती उभी राहिली. हातातला लिफाफा पुढे करत ती म्हणाली दादा माझा वाटा. आरतीचे हे शब्द ऐकताच सुजयचा राग अनावर झाला.
त्याने काडखण तिच्या कानावर वाजवली. अगं आमची बेइ’ज्जती करून पळून गेलीसंच आणी आता बाबा हॉ’स्पिटल मध्ये आहेत. आम्ही कोणत्या परिस्थिती मधून जात आहे हे कळते का तुला ? बाबांना कल्पना होतीच या लोकांनी तुला पैशासाठीच फसवलय. एक दिवस हे होणारच होत म्हणा. आणी ती तशीच रडत दारात उभी होती.
आई पुढे येऊन म्हणाली तु घरात लहान, हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी बाबांनी किती कष्ट करून पैसे भरले होते. आणी तु त्यांच्या या अशा अवस्थेत वाटा मागतेस, चांगलेच पांग फेडलेस बाई तु आमचे. हात जोडून तळतळीने आई बोलत होती. मेघा.. आरती लहान म्हणून आम्ही तुला आमच्या मुलीसारख जपलं होत. झालं गेलं विसरलो असतो पण अशा परिस्थितीत,
वाटा मागावा थोडा तरी विचार करायचा होता ना. आरती मात्र निशब्दपणे रडतच होती. सगळ्यांच बोलून झाल्यावर ती दीर्घस्वास घेवून बोलायला लागली – आई, वहिनी, दादा मला माफ करा मी तुमच्या विरोधात जावून लग्न केल. पण मला माहित आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता, त्याचं शिक्षण, नोकरी पाहून तुम्ही पसंती दाखवली होती.
विरोध होता तो फक्त त्याच्या जा’तीला. जा’त कळल्यावर तुम्ही नकार दिला पण दादा तिथून मागे येण मला नसत जमले रे. मान्य आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप केलय पण त्यावेळी तुमच्या मनात जे होत ना – राहुल पैशासाठी माझ्यासोबत लग्न करतोय ते मी तुम्हाला कितीही समजावलं तर तुम्ही मला समजावून घेत नव्हता. या १० वर्षात १ रुपयाही कधीही माझ्याकडून राहुल ने मागितला नाही.
राहूलच काय तर त्याच्या आई-वडिलांनी देखील कधीच विचारले नाही. हातातला लिफाफा पुढे करत आरती म्हणाली – दादा यात रक्कम न टाकलेला चेक आहे. बाबांच्या ऑ’परेशन ला जेवढे पैसे लागतील तेवढे टाक, पण बाबांना बरे कर. आरतीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. बाबांचे ऑ’परेशन सकाळी आहे असं मला समजले,
तुम्हीं मला दिलेले संस्कार, शिक्षण, प्रेम याची परतफेड तर नाही करू शकत. पण माझ्या माणसांच्या संकटाच्या वेळी खारीचा वाटा मागायला आली आहे. दादा वहिनीला नाही म्हणू नको आणी हे मी माझ्या घरच्यांना विचारूनच देत आहे. त्यांनीच सांगितले सुखापेक्षा दु:खातला वाटा आयुष्यभर पुरेल. उद्या माझ्यावर वेळ आली तर,
मला माझ्या सासरच्या बरोबरच माझ माहेरही माझ्या बरोबर उभं हवय. आरतीचे हे शब्द ऐकून आता सगळ्यांनाच गहिवरून आलं होत. सुजयने तीला जवळ घेतल आणी म्हणाला – एवढी मोठी झाली का गं आरती. आज मला चार चांगल्या गोष्टी शिकवल्यास माफ कर मी तुझ्या घरच्यांना चुकीच समजलो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.