Alphamarathi.com

Super Fast Marathi News
मुलगा सांभाळत नाही म्हणून वडिल को’र्टात गेले, पण को’र्टात गेल्यावर मात्र सगळे उलटेच झाले पुढे.. पाहून तुम्हीही..

नमस्कार मित्रांनो..

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला. न्यायाधीशांनी विचारले की, “तुमची तक्रार काय आहे?” वृध्द वडील म्हणाले, “मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे.” न्यायाधीश म्हणाले की, “हा तुमचा अधिकार आहे. ह्यामध्ये सुनावणीची काहीच गरज नाही.

तुमचा सांभाळ तुमच्या मुलानेच केला पाहिजे. ते त्याच कर्तव्यच आहे.” वडील म्हणाले की, “मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.” न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. ते त्या वृध्द वडिलांना म्हणाले, “जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे?”

यावर त्या वृध्द वडिलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, “माझ्या मुलाला को’र्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.” न्यायाधीश त्या मुलाला को’र्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, “तुमच्या वडिलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे. मग तो कितीही असो.

तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.” न्यायाधीशांचं बोलणं ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, “माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही. मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे.” न्यायाधीश म्हणतात, “ही तुमच्या वडिलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.” मग वडील म्हणतात, ” न्यायाधीश महोदय,

तुम्ही माझ्या मुलाला सांगा की त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे. परंतू अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावे आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.” न्यायाधीश म्हणतात, “ठीक आहे. तुमच्या मनासारखं होईल.” मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, ” तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि,

हा को’र्टाचा आदेश आहे. त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा.” ख’टला संपल्यावर न्यायाधीश त्या वृध्द वडिलांना आपल्याकडे बोलवतात, “तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा ख’टला का दाखल केला? आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली? असे का?

आता मात्र त्या वृध्द वडिलांचे डोळे पाणावले. “न्यायाधीश साहेब मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती. तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की मला त्याला भेटुन बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईल वरही कधी आम्ही बोललो मला खरच काही आठवत नाही. माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.

म्हणूनच मी त्याच्यावर हा ख’टला दाखल केला. जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल. त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.” वृध्द वडिलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, “तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर, वडिलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.”

यावर ते वृध्द वडील हसतमुखाने न्या’याधिशांकडे बघतात आणि म्हणतात, “माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि तेही माझ्यामुळे यासारखे वाईट काय? कारण, माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेला मला कधीच सहन होणार नाही.” हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो.

तो धावत येतो आणि वडिलांना मिठी मारतो. बस, अजून काय हवं असतं म्हातारपणी आई वडिलांना. मित्रांनो, हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. यामुळे त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. त्यांना कधीच एकटे वाटू देऊ नका.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.