कॉलेजमधील या दोघांचं प्रेम पण घरच्यांमुळे लग्न झाले नाही, पुढे १० वर्षांनी एकदम अचानक घरी भेटले पण पुढे जे घडले ते पाहून..
नमस्कार मित्रांनो..
आज दुपारी रिया एकटीच घरी होती. बऱ्याच दिवसांनी तिला दुपारचा मोकळा वेळ मिळाला होता. नाहीतर घर आणि ऑफिस या चक्रात तिला वेळ मिळणं खूप मुश्किल होत. रिया एक वेल सेटल इंटेरियर डिझायनर. मुंबई बांद्र्याला घर. लग्न न केल्याने एकटीच रहायची. आज तिला नचिकेतची फार आठवण येत होती. रिया आणि नचिकेत कॉलेजमध्ये अकरावीला असल्यापासून मित्र होते.
पुढे मैत्रीचे धागे प्रेमाचे बंध झाले. बारावीनंतर नचिकेत इंजिनिअरिंगला गेला आणि रियाने आर्किटेक आणि इंटिरियर डिझाईनच्या इंटिग्रेटेड कोर्सला ऍडमिशन घेतली. पुढची चार रो-मँटिक वर्ष पटकन निघून गेले. काही विचित्र परिस्थिती आणि नचिकेतच्या आई-वडिलांच्या दबावामुळे नचिकेत आणि रियाचे सं’बंध संपुष्टात आले.
नचिकेत ठरवल्याप्रमाणे एअर फोर्स मध्ये गेला. रिया आणि तिची आई पुणे सोडून मुंबईला सेटल झाले. रियाने लॅपटॉप सुरू केला. नुकतच फेसबुक सुरू झालं होतं. तिने फेसबुक वर नचिकेतला शोधलं. एका प्रोफाईलने तिचं लक्ष वेधलं. अनन्या नचिकेत. वाइफ ऑफ विंग कमांडर नचिकेत. फार बदलला नव्हता नचिकेत. तिच्या मनात विचार येऊन गेला.
तिने पूर्ण प्रोफाइल सर्च केले. फक्त बायकोबरोबर काही फोटो दिसत होते. प्रत्येक फोटोच्या खाली लिहिलं होतं अनन्या विथ नचिकेत. हो बायकोचं नाव अनन्या आहे. छान आहे दिसायला. अगदी नचिकेतला शोभणारी. काही धूसर झालेल्या रियाच्या जुन्या आठवणी पडद्या आडून डोकावून गेल्या. बाकी मुलांचे फोटो वगैरे काही नव्हते. त्याचा फक्त मेल आयडी होता.
रियाने लगेच त्याला मेल केला. नचिकेत, ओळखलस. मी रिया. कसा आहेस ? तू आता फेसबुक वर सापडलास आणि मला काय करू आणि काय नको असे झाले. मला तुला भेटायचं आहे. जस्ट एक मैत्रीण म्हणून भेटशील का ? मी मुंबईला असते. तुझे पोस्टिंग सध्या कुठे आहे ? लव्ह टू अनन्या अँड किड्स. दोन दिवसांनी रियाच्या मेल बॉक्समध्ये नोटिफिकेशन आलं, मेल फ्रॉम नचिकेत.
हॅलो रिया, मी अनन्या. नचिकेचा सगळा मेल करेस्पोंड्स मी सांभाळते. आणि व्हाय नॉट, तुला भेटायला खूप आवडेल. या शनिवारी आपण भेटू. जमत असेल तर एक रिक्वेस्ट आहे, की रविवारी पण तू इथेच राहावं. रविवार संध्याकाळी परत मुंबईला निघ. खाली पुण्याचा पत्ता दिला होता. रियाने शनिवारी ११ पर्यंत येते असं सांगितलं. रविवारी ती फ्री होती.
पण तिथे राहणं तिला प्रशस्त नाही वाटलं. म्हणून रविवारी जमणार नाही, असा मेल केला. पुण्यातल्या औंधला असलेल्या बंगल्यावर एक नेमप्लेट दिमाखात झळकत होती, विंग कमांडर नचिकेत. वॉचमनने गेट उघडून चौकशी केली आणि तिला आत घेतलं. रियाने तिथे गाडी पार्क केली. घड्याळ पाहिलं तर १०.४० झाले होते. तिने बेल वाजवली आतून अनन्याने दरवाजा उघडला.
मिस रिया, वेलकम. मी अनन्या. रिया बुचकळ्यात पडली. फेसबुक वर आपला फोटो नसताना सुद्धा तिने मला कसं ओळखल? नचिकेतने अगदी तंतोतंत वर्णन केलं होतं तुझ. बी कम्फर्टेबल. रियाने अधिरतेने विचारलं, नचिकेत ? आय मीन नचिकेत ? अगं हो, आधी थोडी बस, रिलॅक्स हो. त्याने आपल्याला लंच करून घ्यायला सांगितले आहे. इथे ह्या खोलीत आहे त्याच्या मीटिंगमध्ये. तो नंतर येईल.
असे म्हणून अनन्याने एका बंद दरवाज्याकडे बोट दाखवले. रिया थोडी हिरमुसली. पण मिलिट्री मॅन असल्याने ड्युटी फर्स्ट म्हणुन तो बिझी असेल. तुम्ही केव्हापासून पुण्यात आहात ? २००९ पासून. आपण आधीच भेटायला पाहिजे होतं. पण काही कॉन्टॅक्ट मिळतच नव्हता. नचिकेत अल्सो मिस यू अलॉट. त्याने मला तुझ्याबद्दल आणि तुमच्या लव स्टोरीचे सगळे किस्से सांगितले आहेत.
म्हणूनच तर तुला पाहिल्या पाहिल्या ओळखायला सोपं गेलं. अनन्या फोटोत दिसत होती त्यापेक्षा खूप सुंदर दिसत होती. बोलायलाही छान होती. दुपारी साधारण साडेबाराच्या दरम्यान त्या दोघी जेवायला बसल्या. आम्हाला मुलं नाहीत. अनन्याने रियाच्या शोधक नजरेला उत्तर दिल. प्रॉब्लेम माझ्यात आहे. अनन्याच्या या वाक्यावर रियाने विषय बदलला.
लंचला आलू पराठा, कैरीचे लोणचं, आणि फ्रेश दही होतं. तुझी आवड बोलला आहे नचिकेत. म्हणजे नचिकेत मला विसरला नाहीये, असा एक विचार रियाच्या मनात येऊन गेला. अजिबात नाही, नाही विसरला तो तुला. रिया शॉक झाली. तू कुठे ? कसा ? आणि काय विचार करतेस ? हे नचिकेत ने सांगितलं मला. लंच झाला आणि अनन्या म्हणाली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.
काय ? अनन्याने तिच्यापुढे मॅंगो मस्तानी ठेवली. हे तर आवर्जून सांगितलं आहे त्याने मला. तो म्हणाला, एक वेळ जेवायला देऊ नकोस, पण मँगो मस्तानी रियाला न देणे हा गु-न्हा आहे. या वाक्यावर दोघी खळखळून हसल्या. सर्व काही झालं तेव्हा दीड वाजत आला होता. चला, आता त्याला भेट असं म्हणून अनन्याने तो बंद दरवाजा उघडला. आत एक मोठी खोली, मधे प्रशस्त ऑफिस टेबल,
एका बाजूच्या भिंतीवर नचिकेतचा ड्रेस हँगर केला होता. आणि टेबलच्या मागे नचिकेतचं मोठं पोट्रेट होतं. त्यावर खालच्या बाजूला लिहिलं होतं, विंग कमांडर नचिकेत जन्मदिन २८ मार्च १९६७. शहीद दिन १ फेब्रुवारी २०१०. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.