कैलास पर्वताची ही पाच रहस्ये..जी स्वतः बघितल्यावर नासाही हैराण झाले..कोणीच या रहस्यांचा उलगडा करू शकला नाही..
कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे व ते तिबेटाच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वताचा आकार शिवलिं-गाप्रमाणे असून चारी बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या दऱ्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. ह्या पर्वताची उंची ६,६३८ मीटर इतकी असून सिंधू, ब्रम्हपुत्रा अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात.
कैलास पर्वताचा दक्षिणेकडचा भाग:- हा पर्वत एक पवित्र स्थळ असल्या कारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. भगवान शिव यांचे निवासस्थान असणाऱ्या कैलास पर्वतास भारतातील आणि चीनचे लोक अत्यंत पूजनीय मानतात. हिमालयातील कैलास पर्वत सर्वात रहस्यमय पर्वत मानला जातो.
कैलास पर्वत खूप आधीपासून या दुनियेचे आकर्षण केंद्र आहे आणि अजूनही असंख्य वैज्ञानिक या पर्वताच्या रहस्यचे संशोधन करत आहेत. पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे आणि दुसर्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. या दोघांच्या मध्यभागी हिमालय आहे आणि हिमालयाच्या मध्यभागी कैलास पर्वत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते हा पर्वत पृथ्वीचे मुख्य केंद्र मानले जाते.
तसेच हा कैलाश पर्वत हे 4 मुख्य ध-र्म हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख ध-र्म यांचे केंद्र आहे. तसेच काही शास्त्रज्ञच्या मते, हा कैलास पर्वत एक विशाल पिरामिड आहे, जो 100 छोट्या छोट्या पिरामिडचे मध्य केंद्र मानले जाते. कैलास पर्वताची संरचना दिशादर्शकाच्या 4 पॉइंट सारखीच आहे. हे निर्जन ठिकाणी आहे, जिथे कोणताही मोठा पर्वत नाही.
जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टवर बर्याच लोकांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे परंतु कैलास पर्वत हा जगातील एकमेव पर्वत आहे ज्याच्यावर आजपर्यंत कोणीही चढलेले नाही. जे रहस्य अजूनही एक गुढ आहे.
तसेच काही लोक असा दावा करत आहेत की कैलास पर्वतावर बर्याच वेळा 7 प्रकारच्या लाईट आकाशात चमकताना पाहिल्या गेल्या आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे कदाचित येथील चुंबकीय शक्तीमुळे असू शकते. कारण ही चुंबकीय शक्ती आकाशाला मिळून बऱ्याच वेळा अशा गोष्टीं निर्माण करते.
कैलास पर्वताच्या 4 दिशांतून 4 नद्यांचा उगम होतो – या नद्या प्रामुख्याने ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज आणि कर्नाळी नदी या आहेत . तसेच या नद्यांतूनच गंगा, सरस्वती आणि चीनच्या काही नद्याही निघाल्या आहेत. कैलासच्या चार दिशांमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे मुख आहेत यातून या नद्यांच्या उगम झाला आहे. पूर्वेकडे अश्वमुख, पश्चिमेला हत्तीचे मुख, उत्तरेस सिंहाचे मुख, दक्षिणेस मोराचे मुख ही या मुखाची नावे आहेत.