Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लालची लोकांना मृत्यूनंतर काय काय भोगावे लागते बघा.. देव त्यांना कोणती शिक्षा देतात पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, ध’र्मग्रंथात असे वर्णन केले आहे की, लोभ मग तो कसलाही असो, नेहमी माणसाच्या विनाशाचे कारण बनला आहे. जर मनुष्य पैशाचा लोभी असेल तर त्याला शास्त्रात सर्वात घातक मानले गेले आहे. कदाचित तुमच्यापैकी काहींनी तुमच्या आयुष्यात याचा अनुभव घेतला देखील असेल, तर काही जण ते अनुभवण्याच्या मार्गावर असतील. कारण, आजच्या कलियुगात असा माणूस मिळणे जरा अवघडच आहे,

ज्याला कशाचाही लोभ नाही. माणसाची ही प्रवृत्ती त्याला कुठपर्यंत घेऊन जाते हे जाणून घेऊया. लोभी वृत्तीचा माणूस कुबेराच्या खजिन्यातही समाधानी होऊ शकत नाही. पण माणसाची ही तळमळ आणि इच्छा त्याला कुठे घेऊन जाते हे कोणालाच कळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आलो आहोत, जी ऐकल्यानंतर तुमच्या मनोवृत्तीवर नक्कीच परिणाम होईल.

एक राजा होता. देवपूजा करण्यात तो इतका आनंदी होता की त्याने स्वतः जंगलात मंदिर बांधले. ज्यामध्ये तो सकाळ संध्याकाळ नित्य नेमाने पूजा करत असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एके दिवशी देव त्याच्यासमोर प्रकट झाला. देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन राजा धन्य झाला आणि देवाला म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्याकडे काही मागू शकतो का ?”

देव म्हणाले, “का नाही राजन, तुझ्या शुद्ध भक्तीवर मी एवढा प्रसन्न झालो आहे की, तुझ्या आवडीची वस्तू देण्यासाठीच मी इथे आलो आहे.”  तेव्हा तो पुण्यवान राजा म्हणाला, “प्रभु, तू मला सर्व काही दिले आहेस. मला संपत्तीची कमतरता नाही, संतती सुखापासून मी वंचित नाही. परंतु, मी माझ्या प्रजेसाठी तुझ्याकडे काही तरी मागणार आहे. हे प्रभु, कृपया माझ्या सर्व प्रजेला दर्शन दे आणि त्यांचे जीवन फलदायी करा. देवानेही राजाची ही इच्छा पूर्ण करण्याचे मान्य केले.

पण एक अट ठेवली ती म्हणजे, मी यावेळी याच ठिकाणी राहीन, जो इथ वर पोहचेल तोच व्यक्ती माझे दर्शन करेल. राजाने देवाची अट मान्य केली आणि देवाच्या दर्शनाची बातमी राज्यभर पसरवली. दुस-या दिवशी सर्व प्रजा स्नान करून भगवंताचे दर्शन घेण्यासाठी हरिचे भजन करीत बाहेर पडले. गाव सोडताना देवाने त्याचा भ्रम निर्माण केला. वाटेत पैशांचा ढीग लागला.

तो ढीग पाहून सर्व गावकरी पैसे गोळा करू लागले. राजा त्यांना समजावत राहिला की, देव थोड्याच अंतरावर आहे. देव मिळाला ते ही संपत्ती आणि धान्य काय, सगळं आपोआपच मिळेल. नगरवासी म्हणू लागले, “राजन, आमच्यावर खूप कर्ज आहे. हे धन आम्ही घरी ठेवून येतो. आधी हे सर्व घेऊन आमची गरज पूर्ण करतो नंतर देवाला भेटतो असे म्हणून काही लोक पैसे उचलू लागले.

परंतु त्यातील काही लोकांनी राजाचे म्हणणे पटले आणि ते राजा सोबत पुढे चालु लागले. थोड्या अंतरावर जाताच त्यांना चांदीच्या वस्तूंचा ढीग दिसतो, थोडे लोक चांदी गोळा करण्यात व्यस्त होतात. राजा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की, ईश्वर थोड्याच अंतरावरती आहे, आपण आधी ईश्वराला भेटू परंतु ग्रामस्थ चांदी गोळा करण्यात व्यस्त झाले. काही लोकांना राजाचे मान्य पटले आणि ते लोक राजासोबत पुढे निघून गेले. थोड्या अंतरावर जाताच त्यांना सोन्याचा ढीग दिसला.

सोने पाहून राजासोबत जे कोणी थोडे लोक होते ते सुद्धा त्या सोन्याकडे आकर्षित झाले. राजाने त्यांना देखील समजावण्याचा प्रयत्न केला की, आपण आधी ईश्वराचे दर्शन घेऊ परंतु राजाचे कोणी ऐकले नाही. आता राजा सोबत फक्त त्याची पत्नी होती. राजा तिला म्हणाला की, चल आपण तरी देवाचे दर्शन घेऊ. परंतु देवाची परीक्षा अजून संपली नव्हती.

थोडे अंतर चालत गेल्यानंतर सोन्याची आभूषणे राणीला दिसली ती आभूषणे एवढी सुंदर होती की, राणी स्वतःवरती संयम न ठेवता त्या आभूषणाकडे गेली. राजाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला यावर राणी म्हणाली अशी आभूषणे मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पहात आहे आधी मला ही आभूषणे परिधान करू द्या. हे उत्तर ऐकताच राजा एकटाच देवाचे दर्शन घेण्यासाठी निघाला.

ईश्वराकडे पोहोचताच ईश्वराने विचारले तू तुझ्या राज्यातील लोकांना आणणार होतास माझ्या दर्शनासाठी त्याचे काय झाले ? यावर राजा म्हणाला की, सर्व लोक मोहामध्ये व्यस्त झाले आहेत. तुमच्या दर्शनापेक्षा त्यांना या सर्व गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात. ईश्वर म्हणाले की, यासाठीच जो कोणी मोहमायापासून दूर राहील, माझी भक्ती करेल त्यालाच मोक्ष प्राप्त होईल.

लोभी व्यक्तींना भलेही संसारातील सर्व सुख मिळेल, पैसा धनसंपत्ती मिळेल परंतु ज्यावेळी त्यांचा मृ-त्यू होईल त्यावेळी या सर्व गोष्टींचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. म्हणूनच असे सांगितले जाते की, तुम्ही भलेही संपूर्ण जीवन पैसा कमावण्यात खर्च कराल परंतु पैसा कमवण्यासाठी कधीही चुकीच्या मार्गाचा वापर करू नका.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.