Alphamarathi.com

Super Fast Marathi News
5000 वर्षे जुने श्री कृष्णाचे खरे घर.. पाहून लोकांचे होशच उडाले.. आजही या ठिकाणी..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपण सर्वांनी कृष्ण ज’न्मभूमीबद्दल ऐकले असेलच. भगवान कृष्णाच्या द्वारका नगरी बद्दल सुद्धा ऐकले असेल. जिथे श्रीकृष्णाने आपले बालपण घालवले त्या गोकुळाविषयी सुद्धा तुम्ही ऐकले असेल. भगवान श्रीकृष्ण जिथे रासलीला करायचे त्याने निधीवन बद्दल सुद्धा तुम्ही ऐकले असेल. परंतु आपल्या भारतात असे खूप कमी लोक आहेत ज्यांना,

त्या घराबद्दल माहित नाहीय ज्या घरात श्रीकृष्णाने आपले बालपण घालवले होते. भगवान श्रीकृष्णाचे ते पाच हजार वर्ष पूर्वीचे घर आजही पूर्णतः सुरक्षित आहे. या घराविषयी अशी काही रहस्य आहेत जी रहस्य शोधून काढण्यासाठी काही वैज्ञानिक तिथे आले होते परंतु ते या रहस्यांना आजपर्यंत शोधू शकले नाहीत. या घरात श्रीकृष्णाशी सं’बंधित,

अशा काही गोष्टी आणि रहस्य आहेत ज्यांना बघून आणि ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. श्रीकृष्ण विषयी आपण लहानपणापासूनच काही गोष्टी ऐकत आलो आहोत. श्रीकृष्णाच्या सं’बंधित असलेल्या कथांना हिं’दू ध’र्मात खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. जिथे पण श्रीकृष्णाशी सं’बंधित मंदिरांची आठवण काढली जाते तेव्हा मथुरा मधील द्वारकाधीश मंदिर आणि वृंदावन मधील मंदिर वरच्या स्थानावर असतात.

श्री कृष्णाच्या लहानपणाशी जोडलेलं अजून एक मंदिर आहे ते म्हणजे गोकुळ च “नंदभवन मंदिर” याला “चौरसी खंबा” असेही म्हटले जाते. हे मंदिर भगवान श्रीकृष्णचे पाच हजार वर्षे जुने घर आहे जे आता मंदिराच्या रूपात आपल्या सर्वांना परिचित आहे. गोकुळ मधील हे मंदिर पर्यटकांना आणि श्रद्धाळू लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. या मंदिरा जवळ एक यशोदा भवन आहे.

बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते. या मंदिरात श्री कृष्णची बालमुर्ती आहे. अनेक मूर्ती तिथे ठेवल्या आहेत. ह्यापैकी एका मूर्ती बद्दल असे म्हटले जाते की, ही मूर्ती आपोआप जमिनीतून आली होती. या मंदिराच्या शेजारी एक गोशाळा पण आहे. या मंदिराला नंद भवन,

नंदा महल आणि चोरासी खंबा अशा नावाने ओळखले जाते. या मंदिराला चोरासी खंबा असे का म्हटले जाते तर हे मंदिर चोरासी खांबांवरती टिकले आहे. मंदिराच्या भिंती श्रीकृष्णाच्या छायाचित्रानी भरलेले आहेत. या भिंतीवर श्रीकृष्णाच्या बालपणाशी सं’बंधित छायाचित्रे आहेत. तिथे जाऊन त्या मंदिरात येणाऱ्या भक्तांना तुम्ही जर विचारला तर त्या मंदिराशी सं’बंधित अनेक गोष्टी तुम्हाला सांगितले जातील.

नंदा बाबा मंदिराशी जोडलेली एक गोष्ट सांगितली जाते की, भगवान श्रीकृष्ण आपल्या आई-वडिलांना चारधाम यात्रेचे सुख गोकुळ मध्येच देऊ इच्छित होते. म्हणून श्रीकृष्ण यांनी विश्वकर्मांना श्रीकृष्णाच्या घरात ८४ खांब लावण्यास सांगितले. यावर विश्वकर्मा यांनी सांगितले की, कलियुगामध्ये काम कोणी मोजू शकत नाही. म्हणून जर तुम्ही या मंदिराचे दर्शन घेतले तर तुम्हाला चारधाम यात्रेचे फळ मिळेल.

हे काम कोणीही बरोबर मोजू शकत नाही एक खांब जास्त तर एक खांब कमी असे मोजले जाते असे मानले जाते. या खांबांना अनेक न्यूज चैनल आणि वैज्ञानिकांद्वारे मोजले गेले आहे परंतु हे खांब नक्की किती आहेत निश्चित सांगू शकले नाहीत. या मंदिराला ८४ खांबच का आहेत याविषयीची माहिती पुराणामध्ये आहे. हिं’दू शास्त्रानुसार असे मानले जाते की, ८४ लक्ष यो-नी तून प्रवास केल्यानंतर माणसाला माणूस म्हणून ज’न्म मिळतो म्हणून या मंदिराला ८४ खांब आहेत.

जर तुम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी पहावयास जात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या जिथे श्रीकृष्णाने आपल्या बालपण घालवलं होतं. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.