३१ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी गणपतीची स्थापना या दिशेला केली तर घर बरबाद होईल.. बऱ्याच लोकांना हे माहित नसते यामुळे..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, यावर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला बुधवारी आली आहे. या दिवशी घराघरांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं. काही घरांमध्ये दीड दिवस काही घरांमध्ये पाच दिवस तसेच काही घरांमध्ये दहा दिवस गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. अशावेळी अनेक जणांना प्रश्न पडतो की स्थापना करतेवेळी गणपती बाप्पाचा मुख नेमकं कोणत्या दिशेला असाव ?
त्याचबरोबर जी व्यक्ती पूजा व आरती करणार आहे त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असाव ? याबाबतची सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत. ध’र्मशास्त्रानुसार आणि गणेशपुराणानुसार आपल्या घरात गणपतीची स्थापना करण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा. उत्तर आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा असते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात.
ईशान्य या दिशेला देवांची दिशा असे मानले जाते. ईशान्य दिशेला स्थापित केलेली गणेशाची मूर्ती आपल्या घरात स्ताई लक्ष्मीचा वास निर्माण करते. त्यामुळे आपल्या घरात भरपूर धन येतं आणि ते टिकून सुद्धा राहतं त्यासोबतच प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते. दुसरी दिशा आहे ती आहे आपल्या घराची उत्तर दिशा. उत्तर दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीच्या मधोमध जर गणपती बाप्पाची स्थापना केली तर,
आपली आर्थिक स्थिती सुधारते. घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागतो. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपले निर्णय योग्य ठरू लागतात. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला एक रक्षा कवच निर्माण होतं. काही कार्य पडलेले असेल पूर्ण होत नसेल तर ते कार्य मार्गी लागून सफलता मिळते. पश्चिम दिशेच्या भिंतीला लागून सुद्धा तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता.
पश्चिम दिशेच्या भिंतीला लागून स्थापित केलेली श्रीगणेशाची मूर्ती वास्तु वरील सर्व संकट दूर करते, वास्तूमध्ये जर काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात, अशी पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा श्री गणेश पूर्ण करतात. अनेक जण श्री गणेशाची स्थापना घराच्या ब्रह्मस्थानी करण्याचा सल्ला देतात परंतु गणपती बाप्पाच्या पाठीचे दर्शन वारंवार घरातील व्यक्तींना घडू शकतं.
ही गोष्ट लक्षात ठेवा की गणपती बाप्पाच्या पाठीमागे दरिद्रता वास करते, जी व्यक्ती गणपतीचे पाठीमागून दर्शन घेते त्या व्यक्तीच्या जीवनात गरिबी दरिद्रता आल्याशिवाय राहत नाही, अशा घरांमध्ये अलक्ष्मी वास करते. गणपतीची मूर्ती ही नेहमी भिंतीला चिकटवून ठेवायला हवे जेणेकरून गणपतीच्या पाठीचे दर्शन कोणाला होणार नाही. अनेक जण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने,
गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो लावतात त्यामुळे गणपती बाप्पांची पाठ आपल्या घराकडे होते पर्यायाने आपल्या घरात गरिबी, दरिद्रता येते, पैसा टिकत नाही म्हणून गणपतीची मूर्ती लावताना गणपतीचे मूख आपल्या घराकडे असेल अशी लावावी. ईशान्य दिशा, उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा या तीनही दिशेला तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करू शकता.
आता आपण पाहूयात की, गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी अशुभ दिशा कोणत्या आहेत आणि त्या दिशेला चुकूनही गणपती बाप्पाची स्थापना करू नये. ही दिशा आहे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला पाठ करून गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा चुकूनही करू नका. दुसरी दिशा आहे नैऋत्य दिशा. पश्चिम आणि दक्षिण या दिशेच्या मध्ये असणारी दिशा म्हणजे नैऋत्य दिशा.
या दिशेला सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना चुकूनही करू नका यामुळे अत्यंत अशुभ फळ प्राप्त होतात. आता पाहूया पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड कुठल्या दिशेला असावे. पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशेला तोंड करून आपण गणपती बाप्पाची पूजा करू शकतो. गणेश चतुर्थीला तुमच्याही घरात बाप्पाचा आगमन होणार असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.