सकाळी उठताच करा हे 5 काम गरीबी कधीच येणार नाही.. भरपूर पैसा तुमच्याकडे येईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर ही पाच कामे केली तर घरामध्ये गरिबी येत नाही. प्रत्येक ध’र्मामध्ये सकाळी उठणे हे लाभदायक असते असे सांगितले आहे. लवकर उठल्यामुळे आपले मन आणि शरीर दोन्ही ही स्वास्थ चांगले राहते. चला तर आज आपण पाहू की, सकाळी उठून कुठली कार्य केल्याने घरामध्ये गरिबी येत नाही. शास्त्रांमध्ये धनवान लोकांसाठी फार गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत,
ज्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सर्व सामान्य व्यक्ती देखील धनवान बनू शकतो. १) सकाळी लवकर उठणे :- सकाळी लवकर उठणे म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी दोन तास अगोदर उठून आपली दिनचर्या करावी. दोन तासाची वेळ शरीराची स्वच्छता करण्यासाठी पुरेशी असते. पलंगावरून उठायच्या आधी भगवान श्रीराम यांचे नाव मुखात घ्यावे आणि नवीन दिवस दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले पाहिजे.
पलंगावरून जमिनीवर पाय ठेवत असताना धरती मातेला नमस्कार करावा. २) सूर्याला जल अर्पण करावे :- पहाटे उठून आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण जरूर करावे. सूर्याची किरणे तीव्र झाल्यानंतर जल अर्पण केल्याने फायदा होत नाही. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर “ओम आदित्य नमः” किंवा “ओम घृणी सूर्याय नमः” या मंत्रांचा जप केला पाहिजे.
जल अर्पण करत असताना प्रत्येक वेळी आपले मूख पूर्व दिशेकडे केले पाहिजे. जर पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद-विवाद असतील तर पती-पत्नींनी एकत्र मिळून सूर्याला गोड जल अर्पण केले पाहिजे. ३) श्रीकृष्णाचा शृंगार करावा :- एक थाळी घेऊन चंदनाच्या सहाय्याने चांदणी बनवावी. त्याच्या मध्यभागी “ओम्” लिहावे. उरलेल्या जागेमध्ये श्रीमन नारायण लिहावे किंवा,
तुमची जी कोणी इष्ट देवता आहे त्यांचे नाव लिहावे. असे केल्याने तुम्ही बनवलेल्या चांदणीचे रूपांतर एका यंत्रामध्ये होते. त्या यंत्रामध्ये तुळशीपत्र ठेवावे, जल अर्पण करून प्रणाम केला पाहिजे. प्रेम भावाने श्रीकृष्णाला यामध्ये विराजमान करून पाण्याच्या साह्याने श्रीकृष्णाला अंघोळ घालावी, प्रेमा भावनेने त्यांना आपल्या मांडीवर बसवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे भगवान श्रीकृष्णाला सजवण्यासाठी लाल,
हिरवे, पिवळे किंवा मोरपंखी रंगाच्या वस्त्राचा वापर करू शकता. असे म्हटले जाते की बासरी मध्ये श्रीकृष्णाचे प्राण आहेत त्यामुळे बासरी शिवाय केला गेलेला श्रीकृष्णाचा शृंगार अधुरा मानला जातो. शृंगार केल्यानंतर प्रत्येक वेळी श्रीकृष्णाला आरसा दाखवावा.
देवाला नैवेद्य देणे. सृष्टीचे संचालक असलेले भगवान विष्णू यांना तुळस फार प्रिय आहे त्यामुळे,
नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीपत्र अर्पण करावे. याशिवाय गव्हाच्या पिठाची पंजिरी शिरा आणि पंचामृत अर्पण करणे शुभ असते. भगवान शंकराला मिठाईचा नैवेद्य अर्पण करू नये. असे केल्यास भगवान शंकर नाराज होतात. भगवान शंकरांना नेहमी बेलपत्र, दूध , दही आणि मध अर्पण करावे. भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेक केला तर सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दुर्गा मातेला नैवेद्यामध्ये हलवा आणि चणे अर्पण करावे. याशिवाय दुर्गा मातेला मालपुवा, पुरणपोळी आणि खीर सुद्धा पसंत आहे. ४) अशाप्रकारे चंदन लावू नये :- पूजा करतेवेळी चंदन उगळण्यासाठी जो दगड येतो त्या दगडावरतीच चंदन उगाळून देवासाठी वापरावे. आचार्य चाणक्य सांगतात की जो व्यक्ती ध’र्माचा मार्ग सोडून अधर्माच्या मार्गाने चालतो त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही,
अधर्माच्या मार्गावरून चालत असलेल्या व्यक्तीकडे अचानक फार धन येत असेल तर समजून जावे की, माता लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊन निघून जाणार आहे. चाणक्य आपल्या नीतिशास्त्र मध्ये सांगतात व्यक्तीला गंभीर स्वभावाचे असणे गरजेचे असते. आचार्य चाणक्य यांच्या मते पैसा कधीही एका जागी साठवून ठेवू नये, चांगल्या कामासाठी त्याचा वापर करावा.
एका जागी पैसा साठवून ठेवणाऱ्या व्यक्तीकडे जास्त काळ पैसा टिकत नाही आणि हळूहळू पैसा संपून जाते पैसा गुंतवला तर तो वाढत राहतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.