Alphamarathi.com

Super Fast Marathi News
शनिदेवाला मोहरीचे तेल का चढवले जाते.. काय आहे यामागील रहस्य.. जाणून घ्या यामागील कथा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की- शनि देवाचा क्रोध राजाला रंक बनवू शकतो याच क्रोधा पासून स्वातःला वाचवण्यासाठी प्रत्येक मनुष्य दर शनिवारी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करतो. पण तुम्हाला माहित आहे का ? शनिदेव यांना मोहरीचे तेल कधी पासून आणि का अर्पण केले जाऊ लागले ? यामागे एक पौराणिक कथा आहे. एके दिवशी रावणाने सगळ्या ग्रहांना बंदी बनविले होते.

या ग्रहांमध्ये शनिदेव सुद्धा होते. रावण आपल्या अहंकारात एवढा अधीन झाला होता की, त्याने शनिदेवाला उलटे लटकून ठेवले होते. याच दरम्याने हनुमानजी माता सीतेला शोधत लंकेत आले होते त्यावेळी रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली होती. शेपटीला आग लावल्याचे क्रोधाने हनुमानजीनी पूर्ण लंकेला आग लावण्यास सुरुवात केली.

जेव्हा पूर्ण लंका आगीत ज’ळत होती तेव्हा सर्व ग्रह बंदी मुक्त झाले परंतु शनिदेव उलटे लटकून असल्यामुळे ते मुक्त होऊ शकत नव्हते. आगीत हो’रपळून गेल्यामुळे शनिदेव असह्य वेदना होत होत्या. हनुमानजींना हे पाहून फार वाईट वाटले आणि त्याने शनिदेवाच्या अंगावर मोहरीच्या तेलाने मालिश केली. शनिदेव यांना होणारा त्रा’स त्या तेलाने कमी झाला,

यावर प्रसन्न होऊन शनिदेव हनुमानजींना सांगितले की, शनिवारच्या दिवशी जो कोणी भक्त मला मोहरीचे तेल अर्पण करेल त्याच्या आयुष्यातील सर्व सम’स्या दूर होतील. तेव्हा पासून शनिदेव मोहरीचे तेल अर्पण केले जात आहे असे मानले गेले आहे. याशिवाय सनातन ध’र्मात अजून एक कथा सांगितली गेली आहे की, एके दिवशी संध्याकाळी हनुमानजी,

रामसेतू च्या बाजूला बसून प्रभू श्रीरामा यांचा जप करत होते. शनिदेव वायू मार्गाने येत समुद्र किनारी बसलेल्या हनुमानजी कडे आले. शनिदेव यांना आपल्या बुद्धी आणि शक्ती वर फार गर्व होता, त्यांना असे वाटत होते की आपल्या एवढे शक्तिशाली या धरती वर दुसरे कोणीच नाही. शनिदेव यांनी हनुमजींना अपमानित करून त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

हनुमानजी नम्र पणे त्यांच्याशी बोलत होते परंतु शनिदेव आपल्या अहंकारावर ठाम होते. शनीची महादशा झाल्यामुळे शनिदेव हनुमानजींच्या डोक्यावर जाऊन बसले. डोक्यावर बसताच हनुमानजींना फार खाज येऊ लागली. हनुमानजींनी आपल्या डोक्यावर गदेने प्रहार केला. प्रहार करताच वेदना सहन न झाल्याने शनिदेव हनुमानजींच्या नाभिवर आले तेथेही हनुमानजींनी आपल्या गदेने प्रहार केला.

वेदनेने कळवळत शनिदेव हनुमानाच्या पायावर पडले. शनिदेव यांना आपली चूक समजली आणि शनिदेव हनुमानजींना शरण आले. यावर हनुमानजी शनिदेव यांना म्हणाले की,”माझ्या शरीरात फक्त माझे प्रभू श्रीराम निवास करतात दुसऱ्या कोणालाच माझ्या शरीरात मी जागा देऊ शकत नाही”. हनुमानजींनी केलेल्या प्रहारामुळे शनिदेव यांना असह्य वेदना होऊ लागल्या.

या वेदना कमी करण्यासाठी हनुमानजी यांनी शनिदेव ला मोहरीचे तेल दिले. याचाच परिणाम म्हणून दर शनिवारी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. शिवाय असे मानले जाते की, जो कोणी हनुमानजीची उपासना करतो त्याला शनिदेव कधी त्रास देत नाहीत. टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.