Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या मंदिरातील मूर्ती 40 वर्षातून फक्त एकदा पाण्यातून वर येते.. बघा यामागील रहस्य.. मूर्ती पाहून सर्वांचे होशच उडाले..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुम्हाला या मंदिराबद्दल माहित आहे का ? या मंदिरातील मूर्ती चाळीस वर्षानंतर भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रकट होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही मूर्ती चाळीस वर्षांपर्यंत पाण्यामध्ये असते. ही मूर्ती लाकडाची बनविलेली असून ती पाण्यामध्ये राहिली तरीही त्या मूर्तीला काहीही होत नाही. ही मूर्ती कोणत्या देवाची आहे व चाळीस वर्षे ती मूर्ती पाण्यामध्ये का असते ते आज आपण पाहू.

भारतामध्ये तमिळनाडू राज्यात कांचीपुरम या ठिकाणी एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव “भगवान वरदराजा स्वामी मंदिर” असे आहे. या मंदिरामध्ये असलेली मूर्ती भक्तांना दर्शन देण्यासाठी चाळीस वर्षानंतर काही काळासाठी पाण्यातून बाहेर येते. हल्लीच ही मूर्ती तीन जुलै 2019 रोजी बुधवारच्या दिवशी जल समाधीतून बाहेर आली होती.

त्यानंतर 40 वर्षांसाठी ही मूर्ती पुन्हा पाण्यामध्ये निघून गेली. या मंदिरावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. चाळीस वर्ष देवाची मूर्ती पाण्यात असली तरी सुद्धा या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी भक्तांची गर्दी असते. पवित्र तलावामधून जेव्हा ही मूर्ती बाहेर काढली जाते त्यावेळी या मंदिराच्या वसंत मंडपामध्ये ती मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते. त्यानंतर या मूर्तीची पूजा, अर्चा केली जाते.

ज्या तलावामध्ये ही मूर्ती ठेवली जाते त्या तलावाचे पाणी कधीही कमी होत नाही किंवा ते तळे कधी सुकत देखील नाही. चाळीस वर्षांनी मूर्ती बाहेर काढण्यासाठी या तलावाचे पाणी बाहेर काढले जाते त्यानंतर 38 दिवसांसाठी हे तळे सुखे असते. असे म्हटले जाते की सण 1969 रोजी या मूर्तीला पाण्यामध्ये ठेवण्यासाठी नेले असता त्या क्षणी त्या रात्री भरपूर पर्जन्यवृष्टी झाली ज्यामुळे या तलावाचे पाणी काठोकाठ भरले गेले.

ही मूर्ती लाकडाची बनलेली असून देखील चाळीस वर्ष पाण्यामध्ये राहून देखील या मूर्तीला काही होत नाही. या लाकडाच्या मूर्तीवर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही ज्याप्रमाणे ती पाण्यातून बाहेर काढले जाते त्याचप्रमाणे ती पुन्हा पाण्यामध्ये ठेवली जाते. मंदिरामधील लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्यावेळी ही मूर्ती बनवली गेली होती,

त्यावेळी या मूर्तीमध्ये अशा काही धातूंचा उपयोग केला असावा ज्यामुळे ही मूर्ती पाण्यामध्ये राहून सुद्धा खराब होत नाही. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ज्यावेळी ही मूर्ती पाण्या मध्ये ठेवली जाते त्यावेळी ती मूर्ती लाकडाची असल्याकारणाने बाहेर येऊ नये यासाठी या मूर्तीच्या छातीवर दगडाचे सात शेषनाग ठेवले जातात.

चाळीस वर्षानंतर 38 दिवसांसाठी ही मूर्ती ज्यावेळी भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवली जाते त्यावेळी पहिले 31 दिवस ही मूर्ती शयन अवस्थेत असते त्यानंतर उरलेले दिवस या मूर्तीला उभे ठेवले जाते. ही मूर्ती पाण्यातून बाहेर काढताना तसेच पुन्हा पाण्यामध्ये ठेवताना त्या ठिकाणी त्या मंदिरातील पुजारी आणि मंदिरातील खास कर्मचारी उपस्थित असतात.

या दोन्ही वेळी कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजवले जात नाही तसेच फटाके फोडले जात नाहीत तर ब्रा’ह्मण वेदांचा पाठ पठण करत असतात. चाळीस वर्षांची प्रथा कशी सुरू झाली ते आता आपण पाहू. पुराणांमध्ये असलेल्या कथेनुसार, मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एके दिवशी देवाने मंदिरातील पुजाऱ्याला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि सांगितले की,

या प्रतिमेला मंदिरामध्ये असलेल्या अनंत सरस तलावामध्ये ठेवून दे आणि मंदिरामध्ये पुजे साठी दुसऱ्या दगडाच्या प्रतिमेची निर्मिती कर. यावर पुजाऱ्याने विचारले की. त्या मूर्तीचे दर्शन कसे होणार? यावर देवाने सांगितले की ही मूर्ती चाळीस वर्षांनी 38 दिवसांसाठी मंदिरामध्ये काढून ठेव. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.

या परंपरेसंबंधित काही लोकांचे असे म्हणणे आहे की दक्षिणेमध्ये ज्यावेळी मुघलांनी आक्रमण केले होते तेव्हा या मूर्तीला या मंदिराच्या तलावामध्ये लपविले गेले होते. त्यानंतर 40 वर्षांनी मंदिराच्या धर्माधिकारी यांच्या मुलांनी जेव्हा या मूर्ती ला बाहेर काढले तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.