महाभारत यु’द्धाच्या अगोदर एकलव्य ला मारणे का गरजेचे होते.? पहा एकलव्य च्या मृत्यूचे रहस्य..
मित्रांनो, महाभारतातील एक अज्ञात पात्र, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्याला फक्त एवढेच माहीत होते की एकलव्य नावाचा एक धनुर्धर होता ज्याला गुरु द्रोणाचार्य यांनी शिकवण्यास नकार दिला होता. जेव्हा त्याने द्रोणाचार्यांना गुरू मानून धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे गुरू दक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. आज आपण पाहणार आहोत की, एकलव्याचा अंगठा कापल्यानंतर त्याचे काय झाले आणि एकलव्याला मा’रणारा कोण होता ?
एकलव्य खरोखर कोण होता ते पाहूया.. महाभारतानुसार द्वापर युगात प्रयागराजजवळ शंखवीरपूर नावाचे राज्य होते. त्यावेळी त्या राज्याचा राजा हिरण्यधनु होता. एकलव्य हा राजा हिरण धनूचा मुलगा होता. महाभारत काळात निषाद जा’त शू-द्र मानली जात होती, त्यामुळे शंखवीरपूर राज्याबद्दल आपल्याला फारसं वाचायला मिळत नाही. एकलव्याचे बालपणीचे नाव अभिद्युमन होते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, लहानपणी एकलव्य अभय नावाने ओळखला जात होता.
तसेच हरिवंश पुराणानुसार, एकलव्य हा हिरण्यधनूचा दत्तक पुत्र होता, ज्याचा ज’न्म भगवान श्रीकृष्णाच्या काकांच्या घरी झाला होता. पण जेव्हा ज्योतिषांनी त्या मुलाची जन्मकुंडली पाहिली आणि त्याच्या वडिलांना त्याच्या भविष्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या भाच्याच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून त्याला हिरण्यधनुच्या स्वाधीन केले. म्हणजेच हरिवंश पुराणानुसार एकलव्य हा क्षत्रिय राजपुत्र होता शू’द्र पुत्र नव्हता. अभिद्युम्न आणि अभय हा शेवटी एकलव्य कसा झाला हे जाणून घेऊया..
एकलव्य लहानपणापासूनच बुद्धीने संपन्न होता. आणि वयाच्या ५ व्या वर्षी गुरुकुलात त्याचे शिक्षण सुरू झाले, तेव्हा त्याचे समर्पण, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा पाहून गुरूंनी त्याचे नाव एकलव्य ठेवले. त्याच गुरुकुलात पुन्हा एकदा गुरूंना एकलव्य मध्ये धनुष्यबाण शिकण्यासाठी समर्पण आणि तो आत्मविश्वासाने भरलेला दिसला, तेव्हा त्यांनी निषादराज हिरण्यधनूला सांगितले की, तुझा मुलगा एकलव्यामध्ये मोठा धनुर्धर होण्याचे सर्व गुण आहेत, त्यासाठी एका चांगल्या गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे.
त्यानंतर पुलक मुनींच्या प्रभावाने राजा हिरण्यधनूने आपला मुलगा एकलव्य याला द्रोणाचार्य सारख्या महान गुरूकडे नेले आणि एकलव्याला आपला शिष्य बनवण्याचा आग्रह केला. दुसरीकडे, एकलव्यने द्रोणाचार्यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले होते. परंतु गुरू द्रोणांनी शिकवण्यास नकार दिला, कारण ते यावेळी राजपुतांशिवाय इतर कोणालाही शिकवू शकत नव्हते. गुरु द्रोणांकडून हे ऐकून एकलव्य आणि त्याचे वडील तेथून निराश होऊन परतले. पण एकलव्याने द्रोणाचार्याला आपला गुरू म्हणून स्वीकारले होते आणि त्याला हेही माहीत होते की,
त्याच्यापेक्षा चांगले धनुर्विद्या त्याला कोणी शिकवू शकत नाही. त्यांने द्रोणाचार्यांच्या आश्रमाशेजारील जंगलात गुरू द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला गुरू द्रोणाचार्य मानून धनुर्विद्येचा सराव सुरू केला. त्याचप्रमाणे जेव्हा बरेच महिने गेले आणि एके दिवशी जेव्हा गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते त्यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने सर्वांचे लक्ष विचलित झाले. पण काही वेळाने कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज इतका बंद झाला की गुरु द्रोणाचार्यांसह कौरव आणि पांडव आश्चर्यचकित झाले.
मग ते ज्या दिशेने कुत्र्याचे भुंकणे ऐकू येत होते त्या दिशेला गेले तिथे पोहोचल्यावर सर्वांनी पाहिले की, कुत्र्याच्या तोंडात कोणीतरी बाण भरले होते पण र’क्ताचा एक थेंबही पडला नाही. हे पाहून सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा द्रोणाचार्य मोठ्याने म्हणाले की हे कोणी केले आहे, तेव्हा एकलव्य त्यांच्याजवळ आला आणि नतमस्तक होऊन म्हणाला, गुरुदेव तुमच्या कृपेने मी या कुत्र्याची ही अवस्था केली आहे. एकलव्याचे म्हणणे ऐकून गुरु द्रोणांनी त्याला विचारले, तू कोण आहेस बाळा आणि मी तुझा गुरु कसा झालो ?
तेव्हा तो म्हणाला गुरुदेव, मी तोच एकलव्य आहे जो त्याचे वडील निषादराज हिरण्याधनू यांच्यासोबत तुमच्याकडून शिक्षण घेण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही नकार दिला होता. पण मी हार मानली नाही आणि तुमच्या पुतळ्यासमोर दररोज तिरंदाजीचा सराव करू लागलो आणि त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. एकलव्याचे बोलणे ऐकून गुरु द्रोणांचा कंठ भरून आला आणि मनात म्हणू लागले की, एकलव्याला शिष्य न बनवून आपण मोठी चूक केली आहे. मग ते एकलव्याला छातीशी लावण्यास पुढे गेले असता काही पावले चालल्यावर त्यांना अर्जुनाला दिलेले वचन आठवले. त्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की, ते त्याला जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनवतील.
हे वचन ध्यानात येताच ते तिथेच थांबले आणि एकलव्याला म्हणाले, चल आणि माझी मूर्ती दाखव. त्यानंतर एकलव्य द्रोणाचार्यांसह कौरव आणि पांडव त्या ठिकाणी गेले. जेथे एकलव्याने द्रोणाचार्य ची मूर्ती बनवली होती, ती पाहून गुरू द्रोणचाऱ्या प्रसन्न झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जर एकलव्य असाच धनुर्विद्या करत राहिला तर तो अर्जुनापेक्षा नक्कीच मोठा धनुर्धर होईल. म्हणूनच ते एकलव्याला म्हणाले, वत्स जर तू मला तुझा गुरु मानत असशील तर तुला हेही माहीत असलं पाहिजे की, गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कोणतीही विद्या सफल होत नाही,
म्हणून तू मला गुरुदक्षिणा द्यावी अशी माझी इच्छा आहे. कारण आजपासून मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. गुरू द्रोणांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून एकलव्य प्रसन्न झाला आणि म्हणाला, गुरुदेव तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार केला म्हणून मी धन्य आहे. गुरुदक्षिणा मध्ये तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ते सांगा, मग द्रोणाचार्य म्हणाले, वत्सा मला गुरुदक्षिणा मध्ये तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आहे. गुरु द्रोणाचाऱ्य यांचे शब्द ऐकून एकलव्याला प्रथम आश्चर्य वाटले, पण त्याच क्षणी त्याने चा’कूने आपला अंगठा का’पला आणि तो गुरु द्रोणांच्या चरणी अर्पण केला. हे पाहून द्रोणाचार्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले.
मग काही वेळाने ते एकलव्याला म्हणाले, वत्सा आजवर माझे अनेक शिष्य झाले आहेत आणि अजून होतील पण तुझ्यासारखा शिष्य अनंत काळा मध्ये कुठल्याही गुरूला मिळणार नाही. मग ते सर्व तिथून आपापल्या आश्रमात परतले आणि एकलव्यही आपल्या राज्यात शंखवीरपूरला परतला. तिथे बिना अंगठ्याशिवाय तिरंदाजीचा सराव करू लागला आणि बघता बघता तो एक उत्तम धनुर्धर बनला. शंख वीरपूरला परतल्यानंतर काही वर्षांनी हिरण धनूने आपल्या निषाद मित्राची मुलगी सुनिता हिच्याशी एकलव्याचे लग्न लावून दिले.
त्यानंतर ते सर्व आनंदाने राहू लागले आणि काही वर्षांनी एकलव्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर एकलव्य शंखवीरपूर राज्याचा अधिपती झाला. शासक झाल्यानंतर, एकलव्याने निषाद जा’तीच्या लोकांसाठी एक मजबूत सैन्य आणि नौदल तयार केले आणि आपल्या राज्याच्या सीमांचा विस्तार करत राहिला. या कामात गुंतून त्याची भेट राजा जरासंधाशी झाली, जो भगवान श्रीकृष्णाचा सर्वात मोठा शत्रू होता. विष्णु पुराणानुसार एकदा जरासंधाशी मैत्री केल्यानंतर तो जरासंधाच्या बाजूने द्वारके विरुद्ध लढायला गेला.
जिथे त्याने बघता बघता जवळजवळ संपूर्ण यादव सैन्याचा वध केला दुसरीकडे जेव्हा भगवान श्रीकृष्णाला हे कळले तेव्हा ते त्याला भेटायला आले. आणि त्यांनी पाहिले की तो उजव्या हाताच्या फक्त चार बोटांच्या मदतीने धनुष्य बाण चालवत आहे. हे पाहून श्रीकृष्णाच्या मनात आले की भविष्यातील महाभारत यु’द्धात एकलव्य पांडवांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे त्याचा नाश आता आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी एकलव्याशी लढाई सुरू केली जी दीर्घकाळ चालली पण शेवटी एकलव्याला श्रीकृष्णाच्या हातून वीरगती प्राप्त झाली.