भारतातील सर्वात जुने पहिले मंदिर.. या मंदिराचे रहस्य पाहून शास्त्रज्ञांना बसला धक्का.. कारण येथे घडतात अशा घटना..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जो व्यक्ती जन्माला येतो त्याचे मरण निश्चित असते. परंतु भारतामध्ये एक मंदिर असे आहे ज्या ठिकाणी मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा प्राणी जिवंत होतो. मंदिरातील या रहस्य वर बऱ्याचदा शोध झाला आहे परंतु हे रहस्य आजवर कोणीही उलगडू शकलेले नाही. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतामधल्या प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर सर्वात प्राचीन आहे.
हे मंदिर कुठे आहे आणि याची काय रहस्य आहे हे आज आपण जाणून घेऊया. हे मंदिर बिहार येथील कैमुर जिल्ह्यामधील कौरा क्षेत्रामधील मुंडेश्वरी देवी मंदिर आहे. या मंदिरातील परिसरामध्ये मिळालेल्या एका शिलालेखावरून या मंदिरचे अस्तित्व सहाशे पस्तीस इसवी सन मध्ये देखील होते. असे म्हटले जाते की, या मंदिरामध्ये असलेली भगवान विष्णूच्या मूर्तीची,
सातव्या शतकामध्ये चोरी झाली होती. या मंदिरामध्ये प्राण्याचा बळी देण्याची परंपरा आज देखील आहे. परंतु ही परंपरा अन्य मंदिरांपेक्षा फारच वेगळी आहे. बळी देण्याची एक खास परंपरा म्हणजे या मंदिरामध्ये ज्या बकरीचा बळी चढविला जातो त्याचा जीव घेतला जात नाही. बकरीच्या बळी देण्याची प्रक्रिया भक्तांच्या समोर केली जाते.
बळी देत असताना तांदळाचे काही दाणे मूर्तीला स्पर्श करून ते तांदूळ बकरीवर फेकले जातात तांदूळ फेकताच बकरी शरीरा मधून प्राण गेल्यासारखी बेशुद्ध अवस्थेत पडून राहते. थोड्यावेळाने तांदळाचे काही दाणे पुन्हा त्या बकरीवर फेकताच बकरी उठून उभी राहते. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले भाविक आश्चर्यचिकित होतात.
बकरीचा बळी दिल्यानंतर त्या बकरीला सोडून दिले जाते. या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिं’गाच्या बाबतीत अद्भुत गोष्ट अशी आहे की, या शिवलिं’गाचा रंग दिवसातून अनेक वेळा बदलतो. या मंदिरा मागे एक पौराणिक कथा आहे ती अशी, दुर्गामाता चंड आणि मुंड नामक राक्षसांचे व’ध करण्यासाठी याच ठिकाणी प्रकट झाली होती.
चंड चा व’ध झाल्यानंतर मुंड याच पहाडाच्या पाठीमागे लपून बसला होता त्यानंतर याच ठिकाणी दुर्गामातेने मुंड चा सुद्धा व’ध केला होता. याच कारणामुळे या स्थानाला मुंडेश्वरी देवीच्या नावाने ओळखले जाते. या मंदिराचा निर्माण नागरशैलीनुसार केला गेला आहे. हे मंदिर अष्टकोनी आकारामध्ये बनविले गेले आहे. याच शैलीनुसार बिहारमध्ये अनेक मंदिरांचा निर्माण केला गेला आहे.
या मंदिराच्या चारही भिंतींवर असलेल्या छोट्या आकाराच्या मूर्ती मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. फार वर्षांपूर्वी या मंदिराच्या वर एक शिखर बनविले गेले होते जो कालांतराने उध्वस्त झाला होता त्यानंतर या शिखराच्या जागी नवीन छताचा निर्माण केला गेला. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गंगा, यमुना यांच्या सोबतच अन्य देवी देवतांच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.
मुख्य गाभाऱ्यात चतुरमुखी शिवलिं’ग आणि देवी मुंडेश्वरी यांचे दर्शन होते. यासोबतच या मंदिरामध्ये भगवान विष्णू, गणपती आणि सूर्य देवाची पूजा केली जाते. मुंडेश्वरी मंदिर सडक मार्गाने पटना आणि वाराणसीला जोडलेले आहे. या मंदिराकडे रेल्वेने देखील जाता येते. या मंदिराकडे असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे भाभुआ रोड रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून मंदिराकडे जाण्यास पंचवीस मिनिटे लागतात.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.