पिंडदान नदी किनारीच का करतात.? दुसऱ्या ठिकाणी केले तर काय होते.. बघा गरुड पुराण..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हिं’दू ध’र्मामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती आणि शांती मिळण्यासाठी एक महिना चालणाऱ्या पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. पितृपक्षामध्ये केले जाणारे पिंडदान हे नेहमी नदीच्या किंवा तलावाच्या किनारी केले जाते यासाठी सर्वात महत्व बिहार येथील गया याला आहे. आज आपण यामागील पौराणिक कारणे काय आहेत ते पाहूया.
पुराणांमध्ये पाण्याचे महत्व सांगितले आहे आणि नद्यांना देवीचे रूप मानले आहे. जल पंचतत्वांमध्ये एक आहे. हिं’दू ध’र्मामध्ये आरती किंवा पूजेनंतर सर्वांवरती पवित्र जल शिंपडले जाते. पुराणांमध्ये नद्यांना एवढे पवित्र स्थान दिले गेले त्यामुळे सर्व प्रकारच्या धार्मिक आणि पवित्र गोष्टी नदी किनारी करण्याची प्रथा सुरू झाली. तुम्ही पाहिले असेल की,
अंतिम संस्कार देखील नदीच्या किनाऱ्यावर केले जातात. एवढेच नव्हे तर माघमेळा आणि कुंभमेळा त्याच स्थानांवरती आयोजित केला जातो जी स्थाने नदी किनारी असतील. हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी नदीच्या किनारी अस्थि विसर्जन करणारे अस्थि विसर्जन करतात आणि पुंण्याचे भागीदार बनतात. अस्थी विसर्जन देखील एक पुण्य कर्म मानले आहे.
त्यामुळे अस्थी विसर्जन हे नेहमी तलावाच्या किंवा नदीच्या किनारी संपन्न होत असते. राजा दशरथ यांचे पिंडदान बिहारच्या फाल्गुनी नदीच्या किनाऱ्यावर केले गेले होते. श्राद्ध नेहमी अशा ठिकाणी केले पाहिजे ज्या ठिकाणावर कोणाचाही अधिकार असता कामा नये. नदी आणि तलाव कोणा एकाच्या मालकीचे नसतात त्यामुळे या ठिकाणी श्राद्ध कर्म करून पितरांना मुक्ती दिली जाते.
प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या मृ-त्यूनंतर आपल्या पुत्राने विधिपूर्वक आपले श्राद्ध करावे ज्यामुळे आपल्याला मुक्ती मिळेल. बिहारमध्ये असलेल्या गया येथे पिंडदान करण्यासाठी विशेष धार्मिक महत्त्व का आहे ते आता आपण पाहू. यामागे एक पौराणिक कथा आहे. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते त्यावेळी चुकून त्यांच्या हातून एका असुराची रचना झाली त्याचे नाव होते “गया”.
विचित्र गोष्ट अशी होती की, गया असुर होता तरीही त्याच्या अंगी असुरचा एकही गुण नव्हता तो नेहमी देवाची आराधना करत असे. परंतु असे असून देखील त्याला देवांना जो सन्मान मिळतो तो मिळत नव्हता. गया ने भगवान विष्णू यांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू यांनी त्याला वरदान दिले की,
जो कोणी तुला पाहिल तो पापातून मुक्त होईल. वरदान मिळाल्यानंतर गया अनेक ठिकाणी भ्रमण करू लागला जो कोणी त्याला पाहत होता, त्याची पापे धुतली जात होती याच कारणाने स्वर्गामध्ये सुद्धा फार गर्दी झाली होती. हे सर्व दृश्य पाहून यमराज चिंतेत पडले. यमराज ब्रह्माजींकडे गेले आणि त्यांना सांगितले की, गयासुराला थांबवले पाहिजे नाहीतर सृष्टीचे नियम बिघडून जातील.
ब्रह्माजींनी गया सुराला त्याची पाठ पवित्र आहे असे सांगून त्याच्या पाठीवरती यज्ञ करण्याची परवानगी मागितली याला गयासुर तयार झाला नाही. परंतु स्वतः भगवान विष्णू यांनी त्याच्या पाठीवर बसून यज्ञ करण्याचे ठरविले तेव्हा गयासुर भगवान विष्णू यांचा मान राखण्यासाठी तयार झाला आणि जमिनीवर झोपला. भगवान विष्णू त्याच्या पाठीवर बसताच त्याचे संपूर्ण शरीर पाच कोसात पसरले गेले.
ही पाच कोस जागा पुढे जाऊन गया नावाने प्रसिद्ध झाली. गया सुराने भगवान विष्णू यांच्याकडे एक वरदान मागितले. भगवान विष्णूंनी त्याला एक शीला बनवण्यात यावे आणि त्याच जागी त्या शिलेला स्थापित करण्यात यावे. गया सुराने असे मागितले की, भगवान विष्णू सर्व देवतांसोबत अप्रत्यक्ष रूपात याच शिलेवर विराजमान व्हावेत.
गयासुराचे हे बोलणे ऐकून भगवान विष्णू फार प्रसन्न झाले आणि गयासुराला आशीर्वाद दिला की, जो कोणी या ठिकाणी येऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करेल त्या मृत आत्म्याला सर्व प्रकारच्या त्रा’सातून मुक्ती मिळेल. बिहारची राजधानी पटना पासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या गाया येथे वर्षातून एकदा सतरा दिवसांचा पितृपक्षाचा मेळा भरतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.