कैलाश मंदिरातील या गुहेचे रहस्य स’रकार आजही सामान्य लोकांपासून लपवते.. बघा या मंदिराचे अद्भुत रहस्ये.. या गुहेमध्ये..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, भारतामध्ये असे अनेक प्राचीन मंदिर आहेत, जे त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जातात, पण भारतात असे एक मंदिर आहे जे, शेकडो वर्षांपासून, त्याच्या सौंदर्यामागील अनेक रहस्ये लपवत आहे. हे अतिप्राचीन मंदिर औरंगाबादमधील कैलाश मंदिर म्हणून ओळखले जाते. वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोडं आहे.
कारण या मंदिराचे रहस्य आजपर्यंत कोणालाच समजले नाही. परंतु मित्रांनो आज आपण या लेखामध्ये या रहस्यांबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.. एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. ७५७ मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं आहे. युनेस्कोच्या भारताच्या जागतिक,
वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं. या मंदिराची निर्मिती ही ‘आधी कळस मग पाया’, या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगर फोडू’न समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. हे मंदिर बनवण्यासाठी साधारण १५० वर्षं लागली असावी असं संशोधकांना वाटते.
हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिं’दू पुराणांमध्ये म्हटलं गेल आहे. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.
मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं होत. या खोदकामात जवळपास २० हजार टन दगड फो’डून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिं’ग आहे.
या शिवलिं’गाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठ-मोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात.
या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे. हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत.
कैलास मंदिराबाबात अनेक गोष्टी बोलल्या जातात. मंदिराच्या चारही बाजूस गुहेप्रमाणे काही जागा आहेत. ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमीनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे. तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवासीयांनी उभारल्याचं सांगतात. मात्र हि गोष्ट खरी नाही.
मुळात त्या काळात म्हणजे इ.स. ६००-८०० या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन हे काही नाही. हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे. भूमिती शास्त्राबरोबर भूग र्भशास्त्र, पहाडी प्रदेशातील पत्थराच्या दर्जाचा अभ्यास करून येथे कामाला प्रारंभ झाला.
संपूर्ण लेणी-समूहातून हवा-प्रकाशाबरोबर पर्यावरणाचाही अभ्यास या शिल्पकारांनी करून आम्ही किती प्रगत, अभ्यासू आहोत हेच जगाला दाखवून दिले आहे. डोंगर फो’डून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आले, तेव्हा जवळपास २० हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाही.
औरंगजेबाने हिं’दूंची अनेक मंदिरे नष्ट केली. मात्र ते जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या १००० सै निकांनी ३ वर्षांपर्यंत मंदिर तो’डण्याचे प्रयत्न केले मात्र ते या कामात यशस्वी होऊ शकले नाहीत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.