Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कैलाश मंदिराचा हा दरवाजा 70 वर्षांपासून का बंद आहे.. सर’कार हे गुप्त दरवाजे का उघडत नाही.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, ही गोष्ट आपल्या भारत देशाच्या अझादीच्या पूर्वीची आहे. मंदिराच्या गुप्त दरवाजांना बंद करण्यात आले याचे कारण असे सांगितले गेले की, या गुप्त दरवाजांमध्ये मनुष्याचे जाणे अशक्य आहे. जर मनुष्य आत जाऊ शकत नाही तर हे सर्व बनवले कोणी ? असा प्रश्न सर्वांना पडला. या मंदिराच्या अस्तित्वाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.

या मंदिराला देवतांनी बनवले असे काहींचे म्हणणे आहे. तर कोणी म्हणते की या मंदिराला परग्रहवासी यांनी बनवले. हे मंदिर आपोआपच येथे प्रकट झाले असेही काहींचे म्हणणे आहे. परंतु या मंदिरामध्ये असे काय खास आहे ज्याचा सर्वांना विचार करणे भाग पडले. तुम्ही या मंदिराची बनावट पहाल तर तुम्ही देखील हेच म्हणाल की, हे कुठल्याही माणसाचे काम नाही.

या मंदिराशी सं’बंधित अनेक रहस्य प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशा दुर्मिळ गोष्टीविषयी ज्याच्यामुळे या मंदिराचे गुप्त दरवाजे कायमसाठी बंद करण्यात आले जेणे करून कुठलाही मनुष्य याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे. हे मंदिर “कैलाश मंदिर” या नावाने ओळखले जाते.

कैलास मंदिरातील रहस्य संशोधकांसाठी एक मोठे आव्हान आहे. हे मंदिर जेवढे रहस्यमय दिसते तेवढेच रहस्य याची बनावट देखील आहे. जेवढे रहस्य या मंदिराशी जोडलेली आहेत त्याहून कितीतरी पटीने अधिक रहस्य या गुप्त दरवाजांमध्ये आहेत. हे गुप्त दरवाजे स’रकार द्वारे बंद करण्यात आले. असे म्हणले जाते की, या मंदिराचा निर्माण आठव्या शतकात केला होता.

काही संशोधक हे मंदिर हजारो वर्ष जुने आहे असे म्हणतात. हे मंदिर कोणी बनवले ? कुठल्या उद्देशाने बनवले ? व कसे बनवले याबाबत कुठलेही पुरावे अस्तित्वात नाहीत. या मंदिरावर लिहिलेले लेख फार जुने झाले आहेत. या भाषेला वाचता येत नाही. कुठल्याही मंदिराला बनवण्यासाठी एकावर एक दगड रचून बनवले जाते परंतु हे मंदिर एक मोठा डोंगर कोरून बनवले आहे,

या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की, हे मंदिर खालून वर बनवण्यात आले नाही तर सर्वप्रथम याचा कळस बनविला गेला आहे. एखादा मूर्तिकार मूर्ती बनविता त्याचप्रमाणे हे मंदिर बनवले गेले आहे. संशोधक सांगतात की, हे मंदिर बनवत असताना चार लाख टन एवढा दगड का’पून बाजूला केला गेला आहे. ह्या हिशोबाने जर सात हजार कामगार जर पन्नास वर्षे काम करतील तर हे मंदिर पूर्ण बनू शकेल.

परंतु असे सांगितले जाते की हे मंदिर सतरा वर्षातच बनवून पूर्ण झाले होते. या मंदिराला बनवण्याची गरज का पडली ते आपण पाहू. पौराणिक कथेनुसार हे मंदिर बनविण्याचा विचार राजा कृष्णप्रथम याच्या पत्नीला आला होता. राजा कृष्ण प्रथम याला गंभीर आ-जार झाला होता. राजाच्या पत्नीने भगवान शंकराला प्रार्थना करून सांगितले की,

जर माझ्या पतीचा आ-जार बरा झाला तर मी एक मोठा डोंगर फोडून तेथे शंकराचे मंदिर बांधीन. जोपर्यंत ती या मंदिराचा कळस पाहत नाही तोपर्यंत व्रत करेल. राजा कृष्ण प्रथम बरे झाले तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधण्याचा विचार केला तेव्हा त्यांना सांगितले गेले की, असे मंदिर बांधण्यास खूप वर्षे जातील, पत्नी एवढे मोठे व्रत ठेवू शकणार नाही त्यावेळी राजाने भगवान शंकरांना प्रार्थना केली की,

भगवान शंकराने चे मंदिर बांधण्यासाठी त्यांचे सहाय्य करावे. भगवान शंकरांनी राजाला “भूमीअस्त्र” नामक अस्त्र दिले. असे सांगितले जाते की या अस्त्राच्या साहाय्याने हे मंदिर वरून खालच्या दिशेला बनवले गेले. या मंदिराचा कळस काही दिवसातच दिसू लागला. असे म्हणतात की हे वस्त्र मातीला वाफ बनवत होते म्हणूनच या मंदिराचा निर्माण फार कमी दिवसात झाला.

त्यानंतर राजा कृष्णप्रथम यांनी ह्या वस्त्राला मंदिरातील खालच्या गुहेमध्ये दफन केले. इसवी सन १८७६ मध्ये इंग्लंडचे इतिहासकार यांच्या एका पुस्तकांमध्ये लिहिले होते की हे मंदिर तेवढे मोठे नाही आहे जेवढे मोठे ते बाहेरून दिसते. या गुहेच्या खाली अजूनही मोठे असे काहीतरी निर्माण केले गेले आहे. कैलाश मंदिर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सांगितले की, या मंदिराच्या खाली फार वेळ मनुष्य राहू शकत नाही. हे प्राचीन अस्त्र आज देखील तेथे असू शकते ज्याच्यामुळे या मंदिराचा निर्माण केला गेला होता.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.