Alphamarathi.com

Super Fast Marathi News
उच्चशिक्षित डॉ’क्टर मुलगी आणि शेतकरी मुलाचं मनापासून प्रेम होत पण घरी जेंव्हा कळते तेंव्हा.. पुढे पहा

नमस्कार मित्रांनो..

दोन्ही बाजूला हिरवीगार भाताची शेती मध्ये मध्ये काळ्याभोर मातीचे बांध. संध्याकाळची वेळ होती आणि थंड वाऱ्याने भाताची पाती सळसळत हळुवारपणे डोलत होती. दुरून मावळत्या सूर्याचे सोनेरी किरणे पुसट होत जात होती. घरट्याकडे उडत निघालेली पक्षांची माळ निळ्याभोर आकाशात मोत्यांचे हारासारखे जुळलेली दिसत होती.

शेताच्या बांधावरून कासोटा नेसलेल्या बायांची घरी जाण्याची लगबग चालू होती. काहींच्या डोक्यावर बुट्ट्या होत्या तर काहींच्या लाकडाच्या मोळ्या त्यांचा पाठीमागून हवेवर उगीचच भुंकत जाणारे पाळीव कुत्रे. दूरवर घुंगराच्या खणखणीत आवाज करत गळ्यातील घंटांच्या तालात परतणारी बैलांची खिलारी जोडी. मधूनच चातकाचा सब सब वार वाजत होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांद्यांकडून किर किर आवाज येत होता. एकंदरीत हे सगळे ग्रामीण जीवन खूपच मनोहर दिसत होते.

सर्वत्र जसे काही एक उल्हासदायक वातावरण पसरले होते. बांधावरून सुरभी सागरला शोधत झपा झप पावले टाकीत निघाली होती. हळूहळू काळोख दाटत होता आणि रात्र होण्याच्या आधी तिला सागरला भेटून रात्रीची गाडी म्हैसूर ला जाण्यासाठी पकडायची होती. तिला तो दूरवर त्याच्या शेताच्या लहान तुकड्यात काम करताना दिसला आजूबाजूला चाललेल्या गदा रुळाशी सोयर सुतक नसल्यासारखा तो त्याच्या बैलांबरोबर मग्न होता. उंच धिप्पाड नीट शरीर यष्टी आणि तोंडावर निरागसता असलेला सागर चारचौघात उठून दिसायचा.

सुरभी आणि सागर बाल स्नेही होते. सुरभी ही पाटलांची एकूलती एक लाडकी मुलगी होती. शिवमोग्याला शंभर एकरावर त्यांची शेती होती. सधन शेतकरी असलेले भीमराव पाटील पंचक्रोशीत माहीत होते. आवाजात जरब, चांलण्यात रुबाब आणि खानदानी वागणे तसेच त्याच्या बोलण्याचा धबधबा होता आणि त्यांचा दिलदारपणा खूप खेडू त्यांनी अनुभवला होता.

सुरभी श्रीमंत घराण्यात जन्मली तरी विद्यादेवी तिच्यावर प्रसन्न होती. लहान वयातच तिची बुद्धिमत्ता उठून दिसली. गुणाने सालस असलेल्या सुरभीने कधीच पहिला क्रमांक सोडला नाही. पाचव्या इयत्तेपासून तिला गुणवत्तेवर शिष्यवृत्ती लागली. आपल्या श्रीमंतीपेक्षा तिच्या बुद्धिमत्तेवर आलेल्या त्या रकमेचा पाटलांना खूप अभिमान वाटायचा. आपल्याला वारस म्हणून मुलगा झाला नाही म्हणून त्यांना कधी येत खंत वाटत नव्हती. सागर हा त्यांच्या कुळाचा मुलगा होता. धनाने घरी बसलेला सागर गुणाने श्रीमंत होता.

त्याचा विनयी स्वभाव लहान वयात असलेली समज आणि जीवनात धडपड करायची प्रवृत्ती लहान वयातच उठून दिसली. पाटलांनी दिलेले कोणतेही काम तो प्रामाणिकपणे करायचा. पाटलीने कितीही आग्रह केला तरी तो वाड्यात काही खायचं नाही. त्या दोघांसमोर तो कधीच बसला नाहीत त्याच्या अशा गुणामुळे पाटलीन नेहमी म्हणायच्या की हा मुलगा नक्की घराण्याचे नाव वर काढेल.

पाटलांच्या भल्या मोठ्या वाड्या पाठीमागे एका छोट्या खापराच्या मातीच्या घरात सागरच्या आई-बाबा त्याच्या दोन लहान बहिणी सोबत रहात. फावल्या वेळात सागरची आई वढ्यात पडेल ते काम करायची, त्याचे बाबा शेतावर जात, सुरभी आणि सागर तिथल्या शाळेत एकत्र दहावीपर्यंत शिकले. दोघे मिळून शाळेला जात. तो खूप शांत आणि समंजस स्वभावाचा होता.आपल्या गरीब परिस्थितीमुळे तो त्याच्या वडिलांना लहान वयातच शेतात मदत करू लागला.

शाळेतून परत येताच जेव्हा सुरभी माडीवर बसून अभ्यास करत बसायची तेव्हा तिला दूरवर शेतात सागर काम करताना दिसायचा. का कोणास ठाऊक पण तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटायचे. मग जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा सुरभी त्याची उजळणी घ्यायची. तसा अभ्यासात तो तल्लक होता. तिचा स्वभाव खूप बडबड्या होता सागर नेहमी कमी बोलायचा आणि शांतपणे तिची बडबड ऐकायचा. खूपदा त्याची सहनशीलता गांभीर्य आणि समझ तीला कोड्यात टाकायची.

एकंदरीत त्याची वागणूक सगळ्यांना आवडायची पाटलांनी ही दोघांच्या स्नेहाकडे काना डोळा केला होता. दहावी नंतर पाटलांनी सुरभिला एका चांगल्या कॉलेजला घातलं. ती मैसूर ला हॉस्टेल वर राहायची. डॉ’क्टर होण्याची आवड होती म्हणून विज्ञान शाखेत शिकत होती. सागर मात्र दहावी होताच पूर्ण वेळ त्याच्या बाबांच्या बरोबर शेती कामात लागला. त्याचे स्वतःचे अर्धा एकरचे शेत होते. होस्टेल वरून जेव्हा सुरभी घरी यायची तेव्हा तेव्हा ती सागरला भेटायला शेताकडे धावायची. तिला तसेच चिखलातून येताना पाहून सागरला वाईट वाटायचे.

पण ती ऐकायची नाहीत म्हैसूरच्या कॉलेजची मैत्रिणींची आणि अभ्यासाची त्याच्यासमोर पूर्ण बडबड केल्यानंतरच तिचे समाधान व्हायचे. त्याने सगळे शांतपणे ऐकून घेऊन मग तिला पटण्याजोगे सल्ले दिल्यानंतर ती आनंदाने परत होस्टेलला जायची. हे असे काही वर्षापर्यंत चालले. दिवस असेच भराभर जाऊ लागले वर्ष जाऊ लागले सुरभी चे वैद्यकीय शिक्षण पण संपायला आले. तिचे तेच सुट्टीला येणे, त्याला भेटणे, गप्पा मारणे चालूच राहिले. मध्यंतरी एकदा सागर बेंगलोरच्या शेतकीय विश्वविद्यालयात एक कोर्स करून आला.

व्हॅनिलाची पेरणी आणि उत्पादन कसे करायचे ते प्राध्यापकांनी सांगितले होते. जी जगाच्या बाजारपेठेत व्हॅनिलाला खूप मागणी आहे. प्रगती पर शेतकऱ्यांनी हे उत्पादन करून पहावे सरकारकडून दुसऱ्या देशांना निर्यात करायला खूप उत्तेजन मिळते आणि सवलती सुद्धा. सागरने हा प्रयोग त्याच्या अर्ध्या एकराच्या जमिनीत करून पाहायचा निर्धार केला. दिवस-रात्र तो आता शेतात गुंतू लागला. त्याला सुरभीशी फुर्सतीने बोलणे बंद कठीण होऊन गेले. तसे ती पण आपले एम बी बी एस पूर्ण करण्यात मग्न होऊन गेली.

व्हॅनिला हा केशर सारखाच महाग मसाला गट पदार्थ असून त्याचा उपयोग औ-षधी कंपन्या सौंदर्यप्रसाधने, खाद्य पदार्थ, पेय वगैरे साठी व्यापक पणे होतो. सर’कारने ते विकण्याची पण सोय आणि मदत शेतकऱ्यांसाठी केलेली असते. तीन वर्षांनी व्हॅनिलाची फुले सुटली होती त्याची जुडपे सागरने हरितगृहात लावली होती. त्याचा सखोल अभ्यास करून त्या होतकरूने संधीचा सदुपयोग करायचे ठरवले होते. आजचा दिवस सुरभीला खास होता. तिच्या वैद्यकीय पदवीचा पदवीदान कार्यक्रम ठरला होता.

ती त्यासाठी सागरला आपल्या आई-बाबासोबत सोहळा पाहण्यासाठी निमंत्रण द्यायला आली होती. कधीही तिच्या बुद्धीचा, पैशाचा आणि इस्टेटचा हेवा न करणारा सागर तिला जिवापाड आवडत होता. सुरभीची जोराने सागर म्हणून मारलेली हाक हवेत गुंजत गेली. आवाज ऐकतात सागर शेतातून धावत आला तिच्या चिखलात बरबटलेल्या चपला त्यांनी अलगत काढून घेतल्या पाठाच्या वाहत्या पाण्यात स्वच्छ धुऊन चपला तिच्या पायांना सरकवत तो मस्करी ने म्हणाला, “अहो डॉ’क्टर बाई शेतात कशी काय वाट चुकून आल्याशी?”

लाजलेली सुरभी गालात हसत उतरली “अहो शेतकरी वाईच तुम्हासणी माझ्या लग्नाच्या आमंत्रण देण्यास आली जी”. सागरच्या काळजाचा ठोका चुकला विषय कळताच थोड्या वेळाने दिलखुलास हसत दोघे वाड्याकडे निघाले. सुरभीचे शिक्षण संपले, सागरची व्हॅनिला आता बाजारात उपलब्ध झाली, त्याचे उत्पन्न वाढले त्याच्या बहिणींच्या उच्च शिक्षणाची सोय झाली आहे. खूप वर्षांनी त्याच्या बापाच्या तोंडावर कौतुकाचे हास्य उमटले. आज सुरभीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन चालले होते. तिने आपल्या गावीच वै’द्यकीय सेवा करायचे ठरवले होते.

तिच्या सगळ्या निर्णयात पाटील सहमत असायचे कारण एकुलत्या एका लेकीने त्यांची मान पंचक्रोशीर उंचावली होती. कार्यक्रमाला आलेल्या नातलगांनी आणि काही मान्यवरांनी सुरभीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. पाटलांनी सांगितले मी वर पाहून ठेवला आहे. माझ्या हिरकणीला बावन्नकशी सोन्यासारखा जावई शोधून ठेवला आहे. तो नक्कीच तिची चांगली काळजी घेईल आणि आमच्या वाड्याचा वारसा नीट चालवील. यंदा दिवाळीला बार उडवू. लोकांचे गोंधळलेले चेहरे बघून पाटील मिश्कीलपणे हसले.

दिवाळीच्या धुमधडाक्यात सुरभीच्या विवाहाची तुतारी वाजली. वड्यासमोर उडाला डॉ’क्टर बाईंबरोबर शेतकऱ्यांच्या लग्नाचा बार. हळदीने पिवळी झालेली सुरभी बालपणाचा मित्र जीवनाचा सोबती झाला म्हणून लाजून लाल झाली. सागर मात्र तसाच गंभीर आणि जबाबदार दिसत होता. उंबरावरचे तांदळाचे माप ओलांडून सुरभीने वाड्याच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या खापराच्या घरात आनंदाने प्रवेश केला. पाटलांनी आपल्या हिरकणीला ५२ कशी सोन्याचे कुंदन घातले. कुटुंबासम्मेद नव्या नवरीला आणि नवऱ्याला पोट भरून आशीर्वाद दिला, “लेकरांनो नांदा सौख्यभरे”.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.