Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आचार्य चाणक्य यांचा मृत्यू कशामुळे झाला होता.. त्यावेळी काय घडले होते पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पुराण काळामध्ये बरेच महान विद्वान होते त्यापैकीच एक होते “आचार्य चाणक्य”. आचार्य चाणक्य कौटिल्य नावाने साऱ्या जगात प्रसिद्ध होते. त्यांच्याविषयी प्रत्येकाने काही ना काही ऐकले असेलच. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की चाणक्यचा मृत्यू कसा झाला ?
चाणक्य मगद येथे तक्षशिला विश्वविद्यालयाचे आचार्य होते.

त्यांनी अनेक ग्रंथांची स्थापना केली त्यापैकी अर्थशास्त्र हे प्रमुख शास्त्र मानले जाते. ऐतिहासिक काळात आचार्य चाणक्य यांनी मौर्य वंशाच्या विकासासाठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित केले होते. चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार मौर्य आणि सम्राट अशोक यांना मार्गदर्शन केले होते. चाणक्य यांचा जन्म इसवी सन पूर्व ३७१ मध्ये झाला होता. चाणक्यचा मृत्यू इसवी सन पूर्व २८३ मध्ये झाला.

आचार्य चाणक्यांचा उल्लेख मुद्राराक्षस, बृहतकथाकोश, वायुपुराण, मत्स्यपुराण, विष्णुपुराण यामध्ये मिळतो. बृहतकथाकोश मधे त्यांच्या पत्नीचे नाव “यशोमती” असे होते. मुद्राराक्षस नुसार चाणक्याचे खरे नाव “विष्णूगुप्त” असे होते. आचार्य चाणक्याचे जीवन रहस्यांनी भरलेले होते. आजही भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.

चाणक्य हे शिक्षक, लेखक व अर्थशास्त्री होते. असे सांगितले जाते की, वासायन नावाने त्यांनी का-मसूत्र लिहिले होते. चाणक्याचे वडील चनक यांनी त्यांचे नाव “कौटिल्य” ठेवले होते. चाणक्य यांनी “कौटिल्य अर्थशास्त्र” नावाचा महान ग्रंथ सुद्धा लिहिला आहे. आचार्य चाणक्य यांनी रचलेले अर्थशास्त्र, नीती शास्त्र नामक ग्रंथांची गणना जगातील महान ग्रंथांमध्ये केली जाते.

विष्णूगुप्त तक्षशिला म्हणजेच वर्तमानातील रावळपिंडी येथील ते निवासी होते. चला तर आता पाहू की त्यांचा मृत्यू कसा झाला ते. आचार्य चाणक्यांच्या मृत्यूबाबत बऱ्याच प्रकारचे उल्लेख मिळतात. असे सांगितले जाते की, आचार्य चाणक्य आपले कार्य पूर्ण झाल्यानंतर मगद पासून दूर एका जंगलामध्ये निघून गेले होते. त्यानंतर ते कधीच परतले नाही.

दुसरी आख्यायिका अशी आहे की, मगद ची राणी “हेलिना” यांनीच त्यांना विष देऊन मा’रले होते. अश्या प्रकारच्या अनेक कथा चाणक्याच्या मृत्यू सं’बंधित प्रचलित आहेत. परंतु कोणती कथा सत्य आहे हे कोणालाच सांगता येणारे नाही. याशिवाय आचार्य चाणक्य यांच्या मृत्यू सं’बंधित दोन कथा फार प्रचलित आहेत. त्यापैकी पहिली आहे ती अशी..

चंद्रगुप्त मौर्य च्या मृत्यूनंतर चाणक्याच्या अनुशासना अंतर्गत राजा बिंदुसार सफलतापूर्वक राज्य करीत होते. असे म्हटले जाते की, परिवार आणि राजदरबारातील काही लोकांना चाणक्याचे राजा बिंदुसार यांच्यासोबत असलेले जवळचे नाते आवडत नव्हते. दरबारात “सुबंदु” नामक एक मंत्री होता. चाणक्यला राजापासून काहीही करून दूर करणे हा त्याचा मानस होता.

त्याच कारणास्तव सुबंदूने चाणक्याचे विरोधात काही षडयंत्र रचली होती. राजा आणि चाणक्य यांच्यामध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ लागला. दुरावा निर्माण झाल्यामुळे आचार्य चाणक्य यांनी तो महाल सोडण्याचा निर्णय घेतला. चाणक्य यांनी जीवनभर उपवास करण्याचे ठरविले आणि त्यातूनच एक दिवस त्यांचा मृत्यू झाला. दुसरी कथा :- राजा बिंदुसार यांचे मंत्री सुबंदू यांनी आचार्य चाणक्य यांना,

जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. इतिहासिक गोष्टी पाहता आचार्य चाणक्य यांनी स्वतःहून प्राण्यांचा त्याग केला होता की कुठल्या षड्यंत्राचा शिकार झाले होते हे आज मी तीपर्यंत कोणीही सांगू शकले नाही. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.