ही अशी शाळा आहे जिथे तंत्र मंत्र शिकवले जाते.. तंत्र मंत्रावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी पाहू नका..

नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्ही जर तंत्र-मंत्र विद्या, भूत प्रेत ह्या गोष्टी मानत नाही किंवा ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असे तुम्हाला वाटते तर तुम्ही एकदा रहस्यमय चौसष्ट योगिनी मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे. जिथे गेल्यावर तुम्हाला समजेल की, अंधश्रध्ये मध्ये सुध्दा काही श्रद्धा असतात. आज कालच्या विज्ञान युगात तुम्हाला अश्या गोष्टी मध्ये पडले नाही पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणे सुध्दा गरजेचे आहे.
चला तर जाणून घेवू अशा काही गोष्टी. मध्यप्रदेशाच्या मोरायनात प्राचीन चौसष्ट योगिनी मंदिर आहे. देवी दुर्गा जेव्हा असुरांचा प्रभाव करत होत्या तेव्हा असुर र’क्तबिज, शुंभ, निशुंभ, ह्यांचा व’ध करताना देवी ब्रम्हणी, महेश्वरी, कोमारी, वैष्णवी, केंद्री, वाराही, नरसिंही, आणि देवी कलिमाता ह्यांनी त्यांची मदत केली होती. ह्यांच्या सोबत काही सहिका सुध्दा होत्या,
त्यामुळे ह्यांची संख्या चौसष्ट होते म्हणून त्यांना चौसष्ट योगिनी असे म्हटले जाते. ह्या सोबतच महाविद्या व सीतविद्या सुध्दा योगिनी ह्यांच्या श्रेणी आहेत. हे देवी कालीमाता ह्यांची काही रूप आहेत. समस्त योगिनी अलौकिक शक्तींनी संपन्न आहेत. इंद्रजाल, जादू, वशीकरण, मारण, स्तंभन हे सगळे ह्यांच्याच मुळे संभव होते. त्यामुळे दूरदूर वरून लोक ह्या मंदिरात तंत्र मंत्र विद्या पहायला येत होते.
असे म्हटले जाते की, ह्या मंदिराचे निर्माण राजा देववाल ह्यांनी इसवी सन १३२३ मध्ये केले होते. जिथे सुऱ्येनुसार ज्योतिषी व गणित विद्या शिकवली जात होती. हे मंदिर गोलाकार आकाराचे आहे. हिं’दू ध’र्मात गोलाकार मंदिर नाही बनवली जात परंतु इथे असा कोणता ही नियम नव्हता. तंत्र विद्ये मध्ये पूजेच्या विरुद्ध नियम असतात जस की,
पूजा करताना ज्या गोष्टी पूजेत वापरल्या जात नाही त्या गोष्टी तंत्र विद्येत हमखास वापरल्या जातात. त्यात मंत्र उपचाराचा नियम व साधनेचा नियम हा पूर्णपणे वेगळा असतो. मोरायना पासून ३० किलोमिटर लांब एक मितावली गावात हे मंदिर आहे जिथे चौसष्ट खोल्या आहेत ज्या प्रत्येक खोलीत एक भगवान शिव आणि योगिनीची मूर्ती आहे.
जमिनी पासून २०० पायऱ्या वरती १०० फीट वरती हे मंदिर आहे. मंदिराला पाहून तुम्हाला वाटेल हे तर संसद भवन सारखे आहे. आज ही ते मंदिर भगवान शिव ह्यांच्या तंत्र साधनाच्या कवचाने वेढलेले आहे. रात्री ह्या मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही किंवा तिथे कोणाला थांबू ही देत नाही. असे म्हटले जाते की रात्री तिथे योगिनी येवून चर्चा करतात,
जर अशा वेळेस त्यांना कोणी पाहिले तर तो व्यक्ती घाबरून वेडा होऊ शकतो. जे कोणत्या पुरुषाने त्या चौसष्ट योगिनी ला प्रसन्न केले तर त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तिथल्या मुर्त्या जेवढ्या चोरी होवू लागल्या तेव्हा त्यांना दिल्ली च्या संग्रालयात ठेवण्यात आल्या. आणि मंदिर बंद करण्यात आले. असेच बाकी योगिनी मंदिरा सोबत झाले. असे हे मंदिर जिथे तंत्र-मंत्र विद्या होत असत,
जिथे लोक जायला सुध्दा घाबरत होते. अशा काही गोष्टी जानल्या तर हे सिध्द होते की, भारतातील तंत्र मंत्र विद्येचा इतिहास खूप जुना आहे. चार वेद मधील अथर्ववेद ह्या मध्येही तंत्र मंत्र विद्येचे नियम लिहिले आहेत. वशीकरण पासून तर मरणक्रिया पर्यंत लागणारी सामग्री व मंत्र ह्या मध्ये लिहिले आहेत. आजच्या बदलत्या काळात काही लोकांनी ह्याचा चुकीचा वापर करून त्याला परवले आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.