सात हजार वर्षापासून हनुमानजींची वाट पाहत बसले आहे हे रामायण काळातील वानर.. आजही ते याठिकाणी.. पाहून तुम्हीही..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांना प्राचीन इतिहास लाभलेला आहे. यापैकी काही मंदिरामध्ये अनेक रहस्य देखील आहेत असेही मानलं जात शिवाय तसा उल्लेखही आपल्या पुराण कथांमध्ये आजही पाहायला मिळतो. अशाच एका मंदिराबद्दल थोड जाणून घेऊयात.. जे मंदिर आज आपण पाहणार आहोत त्या मंदिराच्या आसपास जेवढे वानर आहेत,
ते सर्व वानर रामायण कालीन आहेत असे मानले जाते. आजही हे वानर हनुमानजींची वाट पहात आहेत असे म्हटले जाते. हे मंदिर आहे श्री हनुमान मंदिर जाखु. जाखु हे हिमाचल प्रदेश मधील शिमला येथील एक प्रमुख मंदिर आहे. जे शिमल्यामधील मंदिरांपैकी सुद्धा एक प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर जाखू पहाडीवर आहे.
जाखू मंदिर हे फार जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे, या मंदिराचा उल्लेख पुराण कथा मध्येही केला गेला आहे. शिमल्यामध्ये गेलेले हिं’दू ध’र्माचे पर्यटक हे मंदिर नक्की पहायला जातात. जाखू मंदिरमध्ये हनुमानजींची मोठी प्रतिमा आहे, जी शिमल्याच्या बऱ्याच भागातून दिसते. जाखू मंदिर मधील हनुमानजींची मूर्ती ही जगातल्या मोठ्या मुर्त्यांपैकी एक आहे.
या मूर्तीसमोर आजूबाजूला असलेली मोठी-मोठी झाडे पण छोटी वाटतात. या मंदिराशी एक पौराणिक कथा प्रचलीत आहे. भगवान राम आणि रावण यांच्या रामायणातील लढाईच्या दरम्यान रावणपुत्र इंद्रजित याच्या तीराने लक्ष्मण गं’भीर ज’खमी झाला होता. अश्या संकटाच्या वेळी लक्ष्मणला बरे करण्यासाठी हनुमानजी संजीवनी आणण्यासाठी हिमालयाच्या दिशेने निघाले.
हिमालयाच्या दिशेने जात असताना हनुमानजींना एका डोंगरावर याकु नामक ऋषी दिसले त्यांना भेटण्यासाठी हनुमानजी त्या डोंगरावर उतरले हनुमानजी डोंगरावर उतरताच तो डोंगर त्यांचे वजन पेलू शकला नाही. त्यामुळे तो डोंगर हनुमानजींनी पाय ठेवताच जमीन दोस्त झाला. हनुमानजींनी ऋषीमुनींना नमन करून संजीवनी बद्दल अधिक माहिती जाणून घेतली,
आणि त्यांना वचन दिले की, संजीवनी घेऊन येत असताना ऋषीच्या आश्रमात नक्की येतील. परंतु हनुमानजींना संजीवनी घेऊन परत येताना ऋषीच्या आश्रमात जाणे शक्य झाले नाही. हनुमानजींना याखु ऋषीना नाराज करायचे नव्हते. त्यामुळे ऋषी समोर अचानक भगवान हनुमान प्रकट होऊन भेट घेतली होती. ऋषींनी हनुमानजींच्या स्मृतीत मंदिराची स्थापना केली.
जेथे हनुमानजींनी आपले चरण ठेवले होते त्या चरणांना संगमरवरी दगडाने तयार करून ठेवले आहे. संजीवनी घेऊन येण्यासाठी हनुमानजी निघाले होते, तेव्हा त्याने जाखु मंदिरमध्ये विश्राम केला होता त्यावेळी आपल्या सोबत असलेल्यांना त्यांनी तिथेच राहण्यास सांगून आपण एकटेच संजीवनी बुटी घेऊन येण्यास गेले होते असे पुरणामध्ये म्हटले आहे.
त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या वानर सेनेला हनुमानजी आपल्यावर नाराज होऊन एकटेच निघून गेले असे वाटले असेही म्हटले आहे. हनुमानजी परत येतील या आशेने ते वानर तिथेच थांबले. आजही असे मानले जाते की, आज जाखु मंदिरमध्ये जेवढे वानर आहेत ते सर्व रामायण कालीन वानरांचे वंशज आहेत जे आजही हनुमानजींची प्रतीक्षा करत आहेत.
जाखु मंदिर अत्यंत अद्भुत आहे. याचा अनुभव त्याठिकाणी गेलेल्या प्रत्येक हनुमान भक्ताला येतो. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.