Alphamarathi.com

Super Fast Marathi News
श्रावण चे आई-वडील आंधळे का झाले.? पहा त्यावेळी असे काय घडले होते ज्यामुळे त्यांना हे भो’गावे लागले..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, श्रावण बाळाच्या मातृ आणि पितृ भक्तीची कहाणी तुम्ही सर्वांनी ऐकली असेलच. त्यांनी आपली संपूर्ण जीवन आपल्या आंधळ्या आई-वडिलांच्या सेवेसाठी व्यक्तीत केले होते. श्रावण बाळा आपल्या आंधळ्या आई-वडिलांची काठी बनुन होते. हे बोलणं पण चुकीचा नाही ठरणार की श्रावण बाळ त्यांच्या माता पिताचे भक्त होते. तुम्हाला हे माहित आहे का श्रावण कुमार चे माता पिता कुठल्या श्रापामुळे आंधळे होते?

अनेक कथांमध्ये श्रावण बाळाचे आई वडील आंधळे होण्यामागे वेग-वेगळी कारणे सांगितली आहे. अशाच एका कथेनुसार आंधळे होण्याचे कारण त्रिजठा ऋषीचा शाप आहे असे सांगितले आहे. हा शाप त्यांना मागच्या ज’न्मात मिळाला होता. ही कथा त्या वेळेची आहे जेव्हा त्रिजठा ऋषी श्रावण कुमार च्या आई वडिलांच्या घरी गेले होते. तेव्हा त्या ऋषीचे पाय धुळीने आणि मातीने माखले होते.

त्या पायांना श्रावण कुमारचे आई वडील घृणास्पद नजरेने पाहत होते. श्रावण कुमार च्या वडिलांच्या वडिलांनी त्यांना ऋषीचे पाय धू असे सांगितले. वडिलांच्या आदेशानुसार मुलगा आणि सून त्या ऋषीचे पाय धुवू लागली परंतु त्यांनी आपले डोळे बंद केले. त्या दोघांचे हे कृत्य पाहून ऋषी क्रोधित झाले आणि त्या ऋषीने दोघांना श्राप दिला की, “एका ऋषीचे पाय धुताना डोळे बंद करून त्याचा अपमान केला आहे,

या पापामुळे तुम्ही पुढच्या ज’न्मी आंधळे व्हाल”. हे ऐकताच दोघेही ऋषीच्या पाया पडून माफी मागू लागले. तेव्हा ऋषी त्यांना म्हणाले की, तुमचा पत्र श्रावण कुमार तुमचा सहारा बनेल, श्रावण कुमार माता पिता यांचा खरा भक्त आणि ऋषीमुनींसारखा ज्ञानी असेल. दुसऱ्या कथेनुसार, त्रेतायुगामध्ये शंतनु नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी ज्ञानवंती होती. त्या दोघांना संतान नव्हती.

दिवशी ऋषी आणि त्यांची पत्नी त्यांना संतान होत नाही याचे दुःख करत बसले होते. तेव्हा तेथे नारद मुनी प्रकट झाले. ऋषी शंतनु आणि ज्ञानवंती यांनी भव्य स्वरूपात नारद मुनिंचे स्वागत केले. या त्यांच्या सेवेला खुश होऊन नारद मुनीने ज्ञानवंतीला आशीर्वाद दिला “सौभाग्यवती भव, आयुष वती भव, पुत्रवती भव”. हा आशीर्वाद ऐकताच ज्ञानवंतीने विचारले की खरच मला पुत्र प्राप्ती होईल ?

यावर नारद मुनी म्हणाले की, “ऋषीने सांगितलेले शब्द कधी खोटे ठरत नाही ते जो आशीर्वाद देतात तो अवश्य पुरा होतो”. नारदजी म्हणाले तुम्हा दोघांनाही पुत्र प्राप्ती हवी असेल तर, नैमिष्यारण्यमध्ये एका वर्षासाठी ब्रह्मदेवाची कठोर तप’स्या करावी लागेल. नारद जिनी सांगितल्याप्रमाणे ऋषीमुनी आणि त्यांची पत्नी यांनी एका वर्षासाठी ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली,

या तपस्येला प्रसन्न होऊन ब्रम्हाजीनी दर्शन दिले आणि वर मागा का असे सांगितले. यावर ऋषीमुनी म्हणाले की, “मला पुत्रवान होण्याचा वर द्या.” ब्रह्माजी म्हणाले,” तुम्हाला पुत्र नक्कीच प्राप्त होईल परंतु माझी एक अट आहे. “हे ऐकून दोन्ही पती-पत्नी थोडेसे घाबरले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, तुम्हाला पुत्र झाल्यावर तुमची नजर जाईल. ऋषीमुनी म्हणाले “माझी नजर गेली तरीही चालेल निदान मला पुत्र प्राप्ती तरी होईल,

आणि समाज मला नपुं’सक म्हणणार नाही, मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे.” तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल आणि या पुत्राचे युगायुगान मध्ये त्याचे नाव होईल, तुमच्या पुत्राचे नाव मातृभाक्ती आणि पितृ भक्तीसाठी अमर राहील असा आशीर्वाद ब्रम्हाजींनी दिला. त्यांना पुत्र प्राप्ती झाल्यानंतर दोघांचीही नजर गेली. या बालकाचे नाव श्रावण कुमार असे ठेवण्यात आले.

जसे की ब्रह्माजीने सांगितले श्रावण कुमार अगदी तसाच होता तो आपल्या माता-पिताचा भक्त होता. माता पिता विषयी त्याच्या मनात प्रेम आणि श्रद्धा होती. तो दिवस रात्र आपल्या माता पिताजी सेवा करत होता. श्रावण कुमार चे माता पिता स्वतःला गौरवशाली समजत होती. श्रावण कुमार आपल्या माता पिताजी सेवा करता करता घरातील बाकी सर्व कामे सुद्धा करत होते.

इतिहासा त मात्र भक्ती आणि पितृ भक्तीसाठी श्रावण कुमार चे नाव अमर आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.