Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वनवास करत असताना श्री राम कुठे राहिले होते पहा.. आज ती जागा कशी दिसते पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, रामाचे नाव ऐकताच माणसाच्या मनात भक्तीची भावना जागृत होते. परमेश्वराच्या महानतेची आणि सौदर्याची जगभर चर्चा होते. तुम्हाला हे देखील माहित आहे की, त्याच्या वडिलांच्या आदेशानुसार, त्याने आपले राज्य सोडले आणि चौदा वर्षे वनवासात गेले. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की, प्रभू रामांनी आपला चौदा वर्षांचा वनवास कुठे घालवला होता.

चौदा वर्षांच्या वनवासात भगवान रामांनी अनेक ऋषीमुनींकडून शिक्षण आणि ज्ञान प्राप्त केले. तपश्चर्या, देशातील आदि’वासी, वनवासी आणि इतर अनेक समाजांना संघटित करून ध’र्माच्या मार्गावर नेले. त्यांनी संपूर्ण भारताला एकाच सिद्धांताच्या माळेत ओवले. पण या काळात त्याच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे त्याचं आयुष्यही बदललं.

वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात भगवान रामाला वनवास मिळाल्यावर त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केल्याचा उल्लेख आहे. रामेश्वरम नंतर हा प्रवास श्रीलंकेत संपला. या काळात त्याच्यासोबत जे काही घडले, त्यापैकी दोनशे हून अधिक घटनांचा उल्लेख या धार्मिक ग्रंथात करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी सं’बंधित स्मारके आहेत. जिथे भगवान श्रीराम आणि माता सीता मुक्कामी होते.

चला तर मग अशाच काही प्रमुख ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. १) तमसा नदी :- ही तमसा नदी अयोध्येपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. नदीला बोटीने ओलांडून प्रभू राम पुढील प्रवासाला निघाले. २) श्रृंगवेरपुर तीर्थ :- अलाहाबादपासून बावीस किलोमीटर अंतरावर शृंगवरपूर वसलेले आहे. जे भगवान रामाच्या काळात निषादराज गुहांचे राज्य होते. सध्याच्या काळात शृंगवरपूर हे सिंगरौर म्हणून ओळखले जाते.

३) कुरई गांव :- गंगा नदी ओलांडल्यानंतर भगवान श्रीराम कुरई नावाच्या गावात राहिले. ४) प्रयाग :- श्री राम त्यांचे भाऊ लक्ष्मणजी आणि पत्नी सीता यांच्यासह कुरईच्या पुढे चालत प्रयागला पोहोचले. तेथे त्याने काही दिवस घालवले. ५) चित्रकूट :- श्रीराम यांनी प्रयाग संगमानंतर यमुना नदी पार केली आणि चित्रकूट येथे पोहोचले. चित्रकूट ही तीच जागा आहे श्रीराम यांची समजूत काढण्यासाठी,

भरत आपल्या सेनेसह तेथे आला होता. त्यावेळी राजा दशरथ यांचा देहांत झाला होता. भरत नाही त्यावेळी जाताना श्रीराम यांच्या पादुका नेल्या व सिंहासनावरती त्या पादुका ठेवून राज्य चालविले. ६) सतना :- चित्रकूट जवळच सतनामध्ये अत्रि ऋषींचा आश्रम होता. अनुसयाचे पती महर्षी अत्रे चित्रकूट येतील तपोवनामध्ये राहत असत. सतनामध्ये रामवन नामक एका ठिकाणी राम राहिले होते तिथे महर्षी अत्री यांचा अजून एक आश्रम होता. दंडकारण्य..

सतना येथून पुढे निघाले असता श्रीराम एका अरण्यमध्ये पोहोचले इथूनच श्रीराम यांचा खरा वनवास सुरू झाला होता. त्रेतायुगामध्ये या वनाला दंडकारण्य नावाने ओळखले जात असे. या अरण्याच्या आकाशामध्येच रावण आणि जटायुचे यु-द्ध झाले होते. असे सांगितले जाते त्या यु’द्धामध्ये जतायुचे पंख या आरण्यात पडले होते. दंडकारण्य येथे जतयुचे एकमेव मंदिर आहे.

७) पंचवटी नाशिक :- दंडकारण्य येथून श्रीराम अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये गेले हा आश्रम नाशिक येथील पंचवटी येथे आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे गाव आहे. लक्ष्मण याने शुर्पणाकाचे नाक येथेच का’पले होते. ८) सर्वतीर्थ :- नाशिक क्षेत्रामध्ये रावणाने सीतेचे अपह’रण करून जटायुचा व’ध केला होता. नाशिक येथील ताकेड गावामध्ये आजही जटातूचे स्मारक आहे.

९) तुंगभद्रा :- सीता मातेला शोधण्यासाठी लक्ष्मण व श्रीराम तुंगभद्रा आणि कावेरी नदीच्या क्षेत्रामध्ये पोहोचले होते. या परिसरात भगवान श्री राम आणि लक्ष्मण तेथे आल्याचे पुरावे मिळतात. १०) शबरीचा आश्रम :- हे आश्रम वर्तमानातील केरळ या ठिकाणी आहे. बहु प्रसिद्ध शबरीमाला मंदिर देखील याच ठिकाणी आहे. ११) ऋषमुक पर्वत :- मलई पर्वत आणि चंदन वनाला पार करून ऋषमुक पर्वत येथे पोहोचले. येथे त्यांना हनुमान आणि सुग्रीव भेटले. वाल्मीकि रामायण नुसार ऋषमुक पर्वत हा वानरांची राजधानी किष्किंधा जवळ होता.

१२) रामेश्वरम :- वर्तमान काळात रामेश्वरम हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते. श्रीराम यांनी रावणाशी यु’द्ध करण्याच्या आधी रामेश्वरम मध्ये शंकराची पूजा केली होती, येथे असलेले शिवलिं’ग श्रीराम द्वारा स्थापित केलेले आहे. भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर येथे बनवला गेलेला सेतू श्रीलंका आणि रामेश्वरम यांना जोडलेला आहे. हा सेतू 30 किलोमीटर लांब आहे.

१३) धनुषकोडी :- रामेश्वरम मध्ये तीन दिवस राहिल्यानंतर श्रीराम यांनी अशी जागा शोधून काढली जिथून श्रीलंकेला लवकर जाणे शक्य होते. धनुष कोडी रामेश्वरम येथील दक्षिण बाजूस वसलेले एक गाव आहे. नल आणि नील यांची मदत घेऊन वानरसेनेने जो पुल बनवला होता त्याचा आकार धनुष सारखा होता म्हणून त्याला धनुष कोडी हे नाव दिले गेले.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.