Alphamarathi.com

Super Fast Marathi News
धोकेबाज जीवन साथीला कसे ओळखावे.. यासाठी काय करायला हवे.. जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तिमध्ये चांगले गुण तसेच वाईट गुण देखील असतात. मैत्री असो किंवा प्रेम, व्यवहार असो किंवा लग्न या नात्यांमध्ये जाण्यासाठी काही नियम निश्चित केले पाहिजे. एकमेकांच्या संमतीने पुढचे पाऊल टाकले पाहिजे. परंतु जर तुमचा जीवन साथी तुमची फसवणूक करत असेल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याला शिक्षा देऊ शकता ती कशी या सं’बंधीचे नियम आज आपण पाहणार आहोत.

नवरा बायकोचे नाते :- पती-पत्नीचे नाते हे इतर नात्यांपेक्षा खूप खास असते. प्रेम आणि विश्वास यावर हे नाते टिकून असते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात परंतु कोणा एका कडून केली गेलेली फसवणूक हे नाते पूर्णतः तोडून टाकते. फसवणूक करणाऱ्या जीवनसाथी सोबत संवाद साधा :- जर तुम्हाला वाटत असेल की,

तुमचा जीवन साथी तुमची फसवणूक करत आहे तर या विषयावर गंभीरतापूर्वक तुमच्या जीवनसाथी सोबत चर्चा करा. जीवनसाथीला समजावण्याचा प्रयत्न करा. जर धोका देणारी पत्नी असेल तर तिच्यासोबत चिडून बोलू नका, मन शांत ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. संवाद साधत असताना एकमेकांच्या विचारांना प्राधान्य देऊन समजू देणे उत्तर शोधण्याचे प्रयत्न करावे.

जीवनसाथी फसवणूक करत असेल तर आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे :- कधी कधी जीवन साथीची पूर्णतः चूक नसते, कोणा एकाच्या चुकीच्या वागण्यामुळे परिस्थितीनुसार काही वेळा चुकीचे पाऊल उचलले जाते. ज्या व्यक्तीच्या जीवनसाथीने त्याला धोका दिला आहे त्याने स्वतःच्या चुका मान्य कराव्यात आपण केलेल्या चुकांमुळे आपला जीवनसाथी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाला आहे हे मान्य करावे.

अशावेळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीची समजूत काढून पुन्हा तुमच्या हातून तीच चूक होणार नाही असा विश्वास द्या. जर तुम्ही तुमची चूक मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा जीवन साथी मनापासून तुमच्यासोबत राहण्यास तयार होईल. जीवन साथी धोका देत असेल तर त्याच्या पालकांशी चर्चा करा :- वैवाहिक जीवनामध्ये जर कधी जीवनसाथी धोका देत असेल यामुळे भांडणे होत असतील आणि,

तुम्ही जर ती भांडणे मिटवण्यासाठी असफल होत असाल अशावेळी त्या जीवनसाथीच्या पालकांना याबाबतची माहिती देणे गरजेचे असते. असे करून देखील तुमच्यावर दुरावा राहणार असेल तर तुम्हाला का’यद्याची मदत घेणे आवश्यक असते. पती-पत्नीमध्ये छोटी मोठी भांडणे होत असतात आणि ते संपुष्टात देखील येतात त्यामुळे छोट्या मोठ्या भांडणांची जास्त काळजी करू नये.

फसवणूक करणाऱ्या जीवन साथीला माफ केले पाहिजे :- आपल्या जीवन साथीने आपल्या सोबत कुठल्या प्रकारचा धोका केला आहे यावर त्याला माफ करणे किंवा न करणे हे ठरवावे. ज्या जीवनसाथीने धोका दिलेला आहे त्याला समजून घेतले पाहिजे. आता प्रश्न हा उरतो की तुमचे नाते टिकवणे गरजेचे आहे की नाही कारण बऱ्याचदा तुमची चूक नसताना देखील,

तुमच्यासोबत जीवनसाथीने फसवणूक केली आहे अशावेळी योग्य विचार व संवाद साधून निर्णय घ्यावा. धोका देणाऱ्या जीवन साथीला शिक्षा कशी द्यायची :- जीवनसाथी जर धोका देत असेल तर ती व्यक्ती कोण आहे. जिच्यासाठी तुमचा जीवनसाथी तुम्हाला धोका देत आहे त्या व्यक्तीची माहिती मिळवावी. बऱ्याचदा पुरुष आपले लग्न झालेले नाही असे सांगून दुसऱ्या मुलीशी प्रेमसं’बंध प्रस्थापित करतात,

अशावेळी त्या मुलीला भेटून तुम्ही वास्तवाची जाणीव करून देऊ शकता. जर तुमचा जीवन साथी तुमच्यावर प्रेम करत नसेल अशावेळी त्याच्यापासून काही काळ दूर राहावे कारण दुराव्यामुळे तुमच्या साथीदाराला तुमची किंमत कळेल आणि तो तुमच्याकडे परत येईल. परंतु जर असे झाले नाही तर अशा व्यक्तीपासून वेगळे होण्यातच शहाणपणा असतो. कारण प्रेम आणि विश्वास नसेल तर कुठलेही नाते टिकत नाही.

जीवनसाथी पासून वेगळी झाल्यानंतर पुन्हा हिमतीने आयुष्याची नवीन सुरुवात करा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून एक यशस्वी व्यक्ती बनवून दाखवा. विश्वास ठेवा याहून मोठी शिक्षा तुमच्या जोडीदारांसाठी दुसरी कुठलीच नसेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.