Alphamarathi.com

Super Fast Marathi News
द्रौपदी ला सोडून युधिष्ठिर ला किती पत्नी होत्या.. जाणून घ्या द्रौपदीच्या 5 पतींचे रहस्य..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, महाभारत हे असे महाकाव्य आहे त्याच्यामधील पात्रे, कथा सर्वांना माहिती आहेत. आज आपण ह्या ग्रंथाची ती बाजू पाहणार आहोत जी फार कमी लोकांना माहित आहे. पांडवांच्या विवाह सं’बंधी ही माहिती आहे. जी आज आपण पाहणार आहोत. जास्त तर लोक पांडव आणि त्यांची पत्नी द्रोपदी त्याच बरोबर अर्जुनाची पत्नी सूबद्रा यांना ओळखतात.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का द्रौपदी आणि सुभद्रा यांच्याशिवाय पांडवांना पत्नी आणि पुत्र देखील होते. सर्वात पहिले आपण जाणून घेऊया द्रौपदी विषयी. द्रौपदी :- पांचाल देशाची राजकुमारी जीला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले होते. परंतु माता कुंती हिच्या आदेशा नुसार द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांसोबत झाला. विवाहा नंतर द्रौपदी एक वर्ष एका पांडव कडे राहत होती.

यातूनच द्रौपदीने पांडवांच्या पाच पुत्रांना जन्म दिला. युधिष्ठिर याचा पुत्र प्रतीबिंध्य, भीमसेन चा पुत्र सुतसोम, अर्जुनाचा पुत्र शृत्कर्मा, नकुलचा पुत्र शतानिक आणि सहादेवचा पुत्र श्रुतसेनचा यांचा जन्म झाला होता. आता आपण पांडवांच्या बाकी पत्नी बद्दल पाहू. देविका :- युधिष्ठिर याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव देविका होते. युधिष्ठिर आणि देविका यांच्या पुत्राचे नाव धौधेय असे होते.

सुभद्रा :- सुभद्रा श्री कृष्णाची बहीण होती आणि तिचा विवाह अर्जूनाशी झाला होता. सुभद्रा आणि अर्जुन च्या पुत्राचे नाव अभिमन्यू होते. अभिमन्यू आपल्या पित्या प्रमाणे शुर विर होता. उलुपी :- उलूपी ही एक नाग कन्या असून ती अर्जुनाची तिसरी पत्नी होती. वनवासाच्या काळात अर्जुनाने उलुपि हिच्याशी विवाह केला होता. उलूपी आणि अर्जुनाच्या पुत्राचे नाव इरावन असे होते.

चित्रांगदा :- अर्जुनाने मणिपूर च्या राजकुमारी सोबत चौथा विवाह केला होता. चित्रांगदा आणि अर्जुन यांच्या पुत्राचे नाव बभ्रूवाहन असे होते.
हीडिंबा :- हीदिंबा ही एक राक्षसी होती ती भिमसेन याच्या प्रेमात पडली आणि विवाह केला. हिडिंबा आणि भिमसेन यांना घटोत्कच नामक राक्षस पुत्राची प्राप्ती झाली होती. बलांधरा :- भीमच्या तिसऱ्या पत्नीचे नाव बालांधरा होते.

बलांधरा पासून भीम ला सर्वांग नामक पुत्राची प्राप्ती झाली होती. करेणुमती :- करेणुमती ही नकुलची दुसरी पत्नी होती तिच्यापासून निरमित्र नावाच्या पुत्राचा जन्म झाला होता. विजय :- सहदेवची दुसरी पत्नी विजय होती तिच्यापासून सहदेव याला सूहोत्र नामक पुत्राची प्राप्ती झाली होती. यासोबतच महाभारतातील बाकी लोकांविषयी माहिती करून घेऊया ज्यांच्या रहस्य बाबत फार कमी लोकांना माहित आहे.

द्रौपदीच्या पाच पतींचे रहस्य :- द्रौपदी ही पूर्वजन्मी ऋषी कन्या होती, तिच्या पापकर्मामुळे तिला कोणीही आपली पत्नी म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. त्यावेळी द्रोपदी हिने भगवान शंकरांची तपश्चर्या केली, तपश्चर्य वरती खुश होऊन भगवान भोलेनाथ यांनी द्रौपदीला वर मागण्यास सांगितले. द्रोपती हिने तिला सर्वगुणसंपन्न असा पती हवा असल्याचे सांगितले.

भगवान शंकराने द्रौपदीला सांगितले की एका पती मध्ये सर्व गुण असू शकत नाही त्यामुळे तू भारतवंशी पाच पांडव यांची पत्नी होशील.
श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा पुनर्जन्म :- श्रीकृष्ण आणि अर्जुन आपल्या पूर्व जन्मामध्ये नर आणि नारायण होते. नर आणि नारायण च्या रूपात दंभोद्वा असुराचा व’ध करण्यासाठी जन्म घेतला होता. कर्ण आपल्या पूर्व जन्मामध्ये दमभुत्व असून होते.

कर्णाचा व’ध करण्यासाठीच दोघांनी पुन्हा जन्म घेतला होता. श्रीकृष्णाची अजून एक बहीण :- श्रीकृष्णांची एक बहीण सुभद्रा हे तर सर्वांनाच माहित आहे परंतु श्रीकृष्णांना अजून एक बहीण होती हे फार कमी लोकांना माहित आहे त्या बहिणीचे नाव “एकांगा”. द्रोणाचार्य यांचा जन्म :- द्रोणाचार्य यांचे पिता महर्षी भारतद्वाज होते आणि त्यांची माता एक अप्सरा होती.

इथे दिवशी महर्षी गंगेमध्ये स्नान करत असताना त्यांना तिथे अप्सरा स्नान करत असलेली दिसली. त्यात सारेच्या सौंदर्यावरती मोहित होऊन महर्षी भारद्वाज यांचे वी-र्य प’तन झाले ते वी-र्य त्यांनी एका मातीच्या मटक्यामध्ये ठेवून अंधारात ठेवले त्यातूनच महान द्रोणाचार्य यांचा जन्म झाला. भीष्म पितामह यांना श्राप :- भीष्म पितामह पूर्व जन्मामध्ये आठ वसु पैकी एक वसु होते.

पूर्व जन्मामध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या बोलण्यात येऊन ऋषी वशिष्ठ यांची गाई चोरली. ज्यामुळे ऋषी वशिष्ठ यांनी रागाने त्यांना मनुष्य रूपात जन्म घेऊन दीर्घकाळ कष्ट भोगण्याचा श्राप दिला. अभिमन्यूचा पूर्वजन्म :- अभिमन्यू हा पूर्व जन्मामध्ये कालायवन नामक राक्षस होता याचा मृ-त्यू भगवान श्रीकृष्ण यांनी केला होता मृ’त्यू केल्यानंतर त्याचा आत्मा श्रीकृष्ण यांनी आपल्या अंगवस्त्राला बांधून ठेवला.

श्रीकृष्णांनी आणलेली ती अंगवस्त्रे ग-र्भवती सुभद्राने उघडली त्यामुळे तो आत्मा सुभद्रीच्या ग’र्भात गेला. तो बालक पुढे जाऊन अभिमन्यू म्हणून प्रसिद्ध झाला. एकलव्य कुठे गायब झाले :- महाभारतामध्ये एकलव्य आणि रुक्मिणी हरण याबद्दल तुम्ही ऐकले असेल. रुक्मिणी हरणाच्या वेळी एकलव्य राजा जरासंध याच्या बाजूने लढले होते परंतु आपल्या पित्याला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या हातून विरगतीला प्राप्त झाले.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.