Alphamarathi.com

Super Fast Marathi News
देवघरात चुकुनही ठेवू नका या 8 वस्तू .. बरबाद व्हाल.. घरातून गरिबी कधीच जाणार नाही.. आजच जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पुष्कळ वेळा असे घडते की, लोक सात्विक जीवन जगतात आणि दररोज परमेश्वराची पूजा करूनही त्याचे फळ त्यांना मिळत नाही. जर तुमच्या सोबतही असे होत असेल तर शास्त्रानुसार याचे कारण तुमच्या घरातील मंदिरात दडलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया नकळत झालेल्या त्या चुका आणि वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिराशी सं’बंधित नियम..

घरातील मंदिराबाबतचा पहिला नियम म्हणजे एकापेक्षा जास्त देवाच्या मूर्ती ठेवू नयेत. घरात बनवलेल्या मंदिरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत, असे केल्याने घरात विघ्न येते आणि चाललेले काम बिघडते. यासोबतच तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. देवाच्या उग्र स्वरूपाचे चित्र ठेवू नका :- दुसऱ्या नियमाबद्दल सांगायचे तर,

जर तुम्हाला तुमच्या घरात सुख-शांती टिकवून ठेवायची असेल, तर उशीर न करता घरातील मंदिरातून देवाची उग्र स्वरूपातील मूर्ती किंवा चित्र काढून टाका. असे मानले जाते की, अशा चित्रांमुळे घरात क्लेश होतो, घरात नकारात्मकताही पसरते. तुम्ही मूर्ती श्रद्धेने ठेवली असेल, पण त्याचा परिणाम उलटा होतो, मुख्यत्वे घरातील मंदिरातून हनुमानजींचा रौद्र अवतार आणि,

भगवान शंकराच्या नटराज स्वरूपाचे चित्र काढून टाकणे योग्य आहे. त्याऐवजी मंदिरात देव हसत हसत आशीर्वाद देताना दिसतो, अशा मूर्ती ठेवायला हव्यात. अशा मूर्ती घरात सकारात्मक उर्जा पसरवतात. एकापेक्षा जास्त शंख ठेऊ नका :- नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या पूजेच्या घरात कधीही एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका. पूजेसाठी रोज एकच शंख वापरावा मान्यतेनुसार,

शंख हे भगवान विष्णूचे प्रतिक आहे, त्यामुळे तो रोज बदलणे योग्य मानले जात नाही. पूजेत एकापेक्षा जास्त शंख ठेवल्यास एक काढून बाकीचे शंख पवित्र नदीत सोडुन द्या. कोमेजलेली फुले ठेवू नका :- असे मानले जाते की, देवाला फुले अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो. परंतु देवाच्या मंदिरात कोमेजलेली आणि सुकी फुले ठेऊ नयेत.

फुले सुकताच ती ताबडतोब पूजेच्या ठिकाणाहून काढून टाकावीत. असे मानले जाते की, कोमेजलेली फुले नकारात्मकता आकर्षित करतात पण तुळशीच्या पानांचा विचार केला तर त्याची तु’टलेली पाने ११ दिवस शिळी मानली जात नाहीत. अशा स्थितीत ती पाने पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही दररोज देवाला अर्पण करू शकता. तु’टलेल्या मूर्ती ठेवू नका :- भं’गलेल्या मूर्तींबाबत अशी श्रद्धा आहे की,

अशा मूर्तींची पूजा केल्याने पूर्ण फळ मिळत नाही आणि एकाग्रताही प्राप्त होत नाही, एकाग्रतेच्या अभावामुळे मन चंचल राहते. तु’टलेल्या मूर्ती पूजेच्या ठिकाणाहून ताबडतोब काढून टाका, अन्यथा अशा मूर्तीची पूजा देवाला मान्य होत नाही आणि त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. एखाद्याच्या घरी भं’गलेली देवाची मूर्ती असेल तर तिचे लगेच विसर्जन करावे.

त्याच मूर्तींच्या संदर्भात शिवपुराणात असे सांगितले आहे की, शिवलिं’ग निराकार मानले जाते, शिवलिं’ग भग्न झाले तरी पूजनीय आहे. अशा शिवलिं’गाची पूजा करता येते. शिवलिं’गाशिवाय इतर सर्व देवतांच्या मूर्ती भ’ग्नावस्थेत पूजनीय मानल्या जात नाहीत. पुर्वजांचे फोटो ठेवू नका :- तुम्ही पाहिले असेलच की, अनेक लोक आपल्या घरातील मंदिरात आपल्या  पूर्वजांचे फोटो ठेवतात. पण हिं’दू ध’र्मात असे करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे करणे अपायकारक ठरू शकते, असे केल्याने घराच्या सुख-समृद्धीला बाधा येते.

असे करणे म्हणजे पितर आणि देव या दोघांचाही अपमान करण्यासारखे आहे असे केल्याने घरामध्ये दुर्दैव येऊ शकते. निळा विद्युत दिवा लावू नका :- अनेक घरांच्या मंदिरात निळ्या बल्बचा वापर केला जातो जो खूप अशुभ आहे. मंदिरात नेहमी पिवळा बल्ब लावा. प्राचीन ग्रंथानुसार भगवान विष्णूंना पिवळा रंग सर्वात जास्त आवडतो. मुख्यतः सर्व सात्विक गोष्टी जसे की, परमेश्वराच्या आरतीतील ज्योतीचा रंग, भगवान विष्णूला अर्पण केलेल्या अक्षतांचा रंग, पूजेदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांचा रंग पिवळा असतो.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.