Alphamarathi.com

Super Fast Marathi News
घरात घेऊन या बाप्पांची अशी मूर्ती बनाल करोडपती.. एकदा जरूर पहा.. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, यावर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला बुधवारी आली आहे. या दिवशी घरोघरी बाप्पाच आगमन होईल. गणपती बाप्पाची स्थापना दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस केली जाते. गणेश चतुर्थीच्या बापाची मूर्ती नेमकी कशी असावी असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात पडतो. गणेशाच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला असावी की डाव्या बाजूला ? बाप्पाची सोंड सरळ असावी की वाकडी असावी ?

गणपती बाप्पाची मूर्ती उभी असावी की बसलेली असावी ? बाप्पाच्या मूर्ती जवळ उंदीर मामा असावेत की नसावेत ? यासारखे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. या सं’बंधित माहिती आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया गणपतीच्या मूर्तीची सोंड कोणत्या बाजूस असावी. कोणत्याही बाजूला सोंड असलेली बाप्पाची मूर्ती ही शुभच मानली जाते.

शास्त्रांमध्ये फक्त या पूजेचे विधान वेग-वेगळ्या आहेत. उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीच्या पूजेचे नियम हे अत्यंत कडक आहेत. कडक नियम प्रत्येकालाच पाळता येतील असे नाही म्हणून शक्यतो डाव्या बाजूला सोंड असलेली गणपतीची मूर्ती घरात पूजेसाठी आणावी.
गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त नसावी. अथर्वशीर्ष यामध्ये असे सांगितलेले आहे की,

गणपतीची मूर्ती ही एकदंत आणि चतुर्भुज असावी, शक्यतो हातामध्ये पाश, अंकुश आणि मोदक असावा. मांडी घालून बसलेली किंवा लोडला टेकून विश्राम अवस्थेत बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती ही उत्तम मानली जाते. प्रसन्न मुद्रेत सुबक रेखीव डोळे असलेली मूर्ती असावी. बाप्पाच्या डोळ्यात पाहिलं तर प्रसन्नता आणि मनाला शांतता वाटली पाहिजे.

गणपती बाप्पाची मूर्ती आशीर्वाद मुद्रेत असावी म्हणजेच बाप्पाचा उजवा हात हा आशीर्वाद मुद्रेत असावा. बाप्पाच्या मूर्तीच्या बाजूला ज्याला आपण बाप्पाचे वाहन म्हणतो तो “मूषक” असायला पाहिजे. यु’द्ध करताना मासा, गरुड, साप यासोबत किंवा चित्र विचित्र आकारातील गणपती बाप्पाची मूर्ती अजिबात घेऊ नये. शिव पार्वती यांच्या मांडी वर बसलेली गणपतीची मूर्ती घेऊ नये,

कारण शिवपार्वतीची पूजा लिं’ग स्वरूपातच केली जाते. हिं’दू ध’र्म शास्त्रांमध्ये शिवपार्वतीची मूर्ती निषिद्ध मानली गेली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घरी आल्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर त्याची विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठापना करावी. परंतु जर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्याआधीच काही कारणास्तव जर,

मूर्ती भंग पावली तर अजिबात घाबरू नका. त्या मूर्तीला दहीभाताचा नैवेद्य दाखवून ती मूर्ती विसर्जित करा आणि नवीन मूर्ती आणून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. असं झाल्यास मनात भय किंवा शंका आणू नये. गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर घरामध्ये किंवा नात्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृ-त्यू झाला तर सुतका मध्ये मित्रमंडळींकडून नैवेद्य दाखवून गणपतीची पूजा करून घ्यावी.

अश्या वेळी गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपती स्थापना केल्यानंतर घरामध्ये वा’द विवाद आणि क’लह करू नये. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. गणपती असलेल्या घरात मां’साहार करू किंवा खाऊ नये. गणपती बाप्पाला तर रोज भाजी भाकरीचा नैवेद्य असला तरी चालतो. दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. गणपती बाप्पाची विसर्जन करताना बापाचं नामस्मरण करून टाळ्या वाजवत पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष करत मूर्तीचे विसर्जन करावे.

आज मी तुम्हाला सांगितलेल्या माहितीवरून गणपती बाप्पाच्या मूर्ती विषयी तुमच्या मनात असलेल्या शंकांचं नक्कीच निरसन झाले असेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.