अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.. यामुळे तुमच्याकडे पैसा येत नाही.. जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की तो जास्तीत जास्त पैसा कमवेल परंतु बरेचदा मेहनत करून देखील आपल्याला पैशाची कमी जाणवते आणि आपण दुःखी होऊन जातो. तुम्हाला माहित आहे का पैशाच्या कमीचा सं’बंध आपल्या राहणीमानाशी आणि आपल्या दैनंदिन क्रियेशी सुद्धा असतो. चला तर आज आपण पाहूया अश्या कोणत्या सवई आहेत,
ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे येणे थांबु शकते. १) साफसफाई :- शास्त्रानुसार ज्या घरामध्ये स्वच्छता नसते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. बऱ्याच लोकांना आपल्या घरात साफ सफाई करण्याची सवय नसते परंतु असे केल्याने आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. अन्नग्रहण केल्यानंतर ती भांडी कधीही तसेच ठेवू नयेत ती लगेच धुऊन टाकावीत.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेली अस्वच्छता आणि न धुतलेली भांडी घरामध्ये नकारात्मकता आणतात यामुळे घरात अशांतता पसरते. स्वयंपाक घरामध्ये गॅस वर उष्टी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. घरातील देवघरानंतर स्वयंपाक घराला पवित्र स्थान दिले गेले आहे. सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये काही कारणास्तव जर झाडू मारावी लागली तर,
जमा केलेला कचरा बाहेर फेकू नये वास्तुशास्त्रानुसार जर घरातील माती सूर्यास्तानंतर बाहेर फेकली तर लक्ष्मी घरातून निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र येते. २) भांडणाचे वातावरण :- ज्या घरामध्ये रोज भांडणे होत असतात, क्लेश होत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही अश्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा लवकर प्रवेश करते.
जर माणूस घरात क्लेश करण्यात आपली ऊर्जा खर्च करत असेल तर तो आपल्या कामाकडे लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण बनवले पाहिजे. ३) स्त्रियांचा अपमान :- आपल्या ध’र्म शास्त्रामध्ये स्त्रियांना लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीही निवास करत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये स्त्रियांचा अपमान होतो त्या घरामध्ये शुक्र आणि चंद्र अशुभ फळ देतात. त्यामुळे घरातील महिलांचा सन्मान केला पाहिजे. जेव्हा घरातील स्त्रियांना त्यांचा सन्मान मिळेल त्यावेळी माता लक्ष्मी स्वतः प्रसन्नता पूर्वक तुमच्या दारावर येईल सुख समृद्धीचा वास तुमच्या घरामध्ये राहील. ४) आळस :- वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे.
आळशी लोकांच्या घरी कधीही धन येत नाही. काही लोकांना दिवसाची झोपण्याची सवय असते, असे कधीही करू नये कारण असे केल्यास आपल्या घरात दारिद्र्य येते. मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास सदैव राहावा यासाठी वर सांगितलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.