वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क असतो ? जाणून घ्या लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे तिचे काय अधिकार आहेत.. तसेच मुलींच्या नवऱ्याचा देखील..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, अनेक लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की, लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांचा मृ’त्यू झाल्यानंतर वडिलांच्या मालमत्तेवर हक्क असतो का? याबद्दल का’यदेशीर तरतुदी काय आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वडिलांच्या मालमत्तेवर वडिलांच्या मृत्यूनंतर लग्न झालेल्या मुलीचाही का’यदेशीर हक्क असतो. मुलींना वडिलांच्या संपतीमध्ये,
समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिं’दू उत्तर अधिकार का’यद्यामध्ये बदल करण्यात आला होता. वडिलांचे निधन झाले किंवा वडिलांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये मुलगा आणि मुलगी यांचा समान हक्क मिळतो. १) वडिलोपार्जित संपत्ती :- संपत्ती दोन प्रकारची असते एक म्हणजे स्वतः कमावलेली आणि दुसरी म्हणजे वडिलोपार्जित.
वडिलोपार्जित मालमत्तामध्ये पूर्वजांपासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो. आशा संपत्तीवर २००५ आधी फक्त मुलाचा जन्मसिद्ध हक्क होता. पण २००५ च्या का’यद्यामधील दुरुस्तीनंतर मुलीचाही तितकाच अधिकार त्या संपत्ती वर आहे आणि वडील त्यांच्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी करू शकत नाहीत.
आता का’यद्यानुसार मुलीला जन्मतःच वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो. २) वडिलांची स्वयंरोजगारीत मालमत्ता :- वडिलांच्या स्वयंरोजगारीत मालमत्तेवर मुलीचा हक्क कमकुवत असतो. वडिलांनी जमीन स्वतः खरेदी केली असेल, घर बांधले असेल तर अशी संपत्ती त्यांना कोणाला द्यायची असेल त्यांना ते देऊ शकतात हा वडिलांचा का’यदेशीर हक्क असतो.
म्हणजेच जर वडिलांनी स्वतःच्या मालमत्तेत मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यामध्ये मुलगी काहीच करू शकत नाही. मृत्युपत्र न लिहिताच वडिलांचा मृत्यू झाला असेल तर वडिलांच्या स्वयंरोजगारीत संपतीमध्ये मुलीला हक्क मिळू शकतो का ? – मृत्युपत्र लिहिण्या आधीच वडिलांचा मृत्यू झाला असेल तर सर्व का’यदेशीर वारसांना त्यांच्या मालमतेमध्ये समान हक्क असतो.
म्हणजेच मुलींचाही मुलांइतकाच त्यामध्ये अधिकार असतो. पण जर वडिलांनी मृत्यूपत्र लिहिले असेल आणि आपल्या संपत्तीतील वाटा मुलीला देण्यास नकार केला असेल तर अशावेळी मुलगी काहीच करू शकत नाही. मुलीचे लग्न झाले असल्यास तिचा माहेरच्या संपत्तीवरील हक्क संपतो का ? – २००५ पूर्वी मुलीला कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानले जात होते,
पण २००५ च्या तरतुदीनंतर हा का’यदा बदलण्यात आला त्यामुळे मुलगी जरी विवाहित असेल तरी तिचा वडिलांच्या संपत्तीमधील हक्क संपत नाही. मुलीचा ज’न्म २००५ पूर्वी झाला असेल आणि त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर :- हिं’दू उत्तराधिकार का’यद्यानुसार असे म्हणले आहे की मुलीचा जन्म ९ सप्टेंबर २००५ या तारखेच्या आधी किंवा नंतर झाला असेल तरीही काही फरक पडत नाही,
मुलीचा व मुलांचा समान अधिकार असेल. वडील जि’वंत असतील तर मुलगी त्यांच्या संपत्तीमध्ये आपला वाटा मिळवू शकते. पण वडिलांचा मृत्यू हा का’यदा लागू होण्याआधी झाला असेल तर अशा मुलींचा संपत्तीवर काही हक्क राहत नाही आणि वडिलांनी स्वतः मिळवलेल्या संपत्तीचे त्यांच्या इच्छेनुसार विभागणी केली जाते. पत्नी आणि मुलीच्या संमती शिवाय वडील मुलाला संपत्ती देऊ शकतात का ? :-
वडिल स्वतः मिळवलेली संपत्ती आपल्या मुलाला देऊ शकतात किंवा त्याच्या नावावर करू शकतात पण जर बायकोला सोडलेले असेल तर अशावेळी मात्र ती याला अडवू शकते आणि पोटगीची मागणी करू शकते तसेच मुलगीही या निर्णयाला का’यदेशीर आव्हान करू शकते. वडिलांच्या जागेवर मुलांबरोबरच मुलीलाही नोकरीचा अधिकार असतो का ? :-
नोकरीवर असतानाच वडिलांचा मृत्यू झाला असल्यास कोणत्याही कंपनीमध्ये अनुकंपा तत्वावर मुलांप्रमाणेच मुलींचाही नोकरीवर हक्क आहे. मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्यावर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही. पतीबद्दलचे हक्क :- लग्नानंतर पतीच्या संपत्तीत पत्नीला का’यदेशीर हक्क नाही. मात्र पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नी पोटगीचा मागणी करू शकते.
नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा पत्नीला अधिकार आहे का ? :- पत्नीला आपल्या नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जेव्हा बायको पोटगी घेणार असते तेव्हा ही माहिती पतीला द्यावी लागते. पत्नी ही माहिती का’यद्याअंतर्गत ही मागू शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉलो करा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.