सून माहेरी भावाला पैसे देत होती ही गोष्ट सासऱ्याला कळते.. व नंतर सून जे करते ते पाहून धक्काच बसेल.. पुढे पहा
नमस्कार मित्रांनो..
नाना, तुम्ही काय बोलताय? मेघाने ऐकलं तर वाईट वाटेल तिला. हे चुकतंय तुमचं. प्रदीप वडिलांना समजावून सांगत होता. का, मी घाबरतो का तिला ? मेघाच्या आईला ऑ’परेशनसाठी २ लाख रुपये तुम्ही दिले, हे चुकीचे नाही. त्यांनी त्याची सोय नको करायला. असं मुलीकडून घेणे शोभत का तिच्या माहेरच्यांना. आणि तू ही परवानगी दिलीस, नाना तावातवाने बोलत होते.
आणि मेघा बेडरूम मध्ये स्वतःला शांत करत होती. मेघा स्वतः इंजिनियर, M.E. झालेली, मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणारी, पण माहेरची परिस्थिती बेताची. भाऊ स्वतःच्या पायावर उभा होता पण अचानक आलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याएवढं त्याचं सेविंग नव्हतं. आईचं ऑ’परेशन अचानक समोर आल्यावर तिने आपणहून निम्मा खर्च उचलला.
त्यामुळे दादा वहिनीला हायसं वाटलं. तसं माहेरही स्वाभिमानी असल्याने त्यांनीही कधी मागितलं नव्हतं. वातावरण निवळल्यावर मेघा मनाशी काहीतरी ठरवून हॉलमध्ये आली. आई, नाना मला बोलायच आहे तुमच्याशी. मगाशी मी मुद्दाम बाहेर आले नाही. कारण शब्दाने शब्द वाढवायचा नव्हता. मागे एकदाही याच कारणावरून तुम्ही चिडचिड केली होती. त्यामुळे मी आता माझं मन मोकळ करणार आहे.
प्रदीपला मात्र टेन्शन आलं होतं. आता भांडण होणार की काय. माझे बाबा अत्यंत गरीब घराण्यातून वर आलेले पण आपल्यासारखं इतरांचं होऊ नये म्हणून त्यांनी खूप जणांना मदत केली. त्यामुळे ते गेले तेव्हा त्यांच्याकडे फार शिल्लक नव्हते. पण परोपकाराच्या पुण्याची सेवींग आणि गौरवाची प्रॉपर्टी होती जी आजही आहे. त्यांच्याकडे नसतानाही, ही मुलगी आहे,
दुसऱ्याचं धन होणार, असा विचार न करता त्यांनी मला शिकवलं मोठं केलं आणि आज माझ्या नावाचा दबदबा आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला कळेल असं बोलायचं तर पहिले म्हणजे त्यांनी माझ्यावर जो खर्च केला त्यापेक्षा मी त्यांना आता दिलेली रक्कम खूप कमी आहे. दुसरं असं, मी गेली बारा वर्षे नोकरी करते आहे. ॲवरेज पन्नास हजार पगार पकडला तर वर्षाला सहा लाख म्हणजे,
एकूण ७२ लाख कमावलेत. त्यातले माझ्यासाठी स्वतःसाठी खर्च केलेले म्हणजे दागिने कपडे क्वचितच एखादा सिनेमा व हॉटेलमध्ये जेवण हे वजा करिता कमीत कमी साठ लाख तर नक्कीच घरात दिलेत. शिवाय बाईसारखी राबण्याचे, स्वयंपाकाचे महिना ५००० वाचवले म्हटलं तर निदान सहा लाख असे एकूण ६६ लाख माझ्या शिक्षणावर ज्यांनी एक रुपया खर्च केला नाही त्यांच्यावर मी खर्च केले.
जर हा माझाच संसार असेल तर माहेरची ही माणसं माझीच आहेत, एवढे लक्षात ठेवा. मेघा ज्या शांतपणे गणित मांडत होती. नानांचा चेहरा पडत होता आणि प्रदीप ला हसू येत होतं. थांबा हा, अजून संपलं नाहीये. दोन प्रकारच्या मुली असतात. एक ज्या स्वावलंबी नसल्याने आयुष्यभर माहेरावर अवलंबून राहतात, बरेच वेळा स्वाभिमान गुंडाळून.
आणि दुसऱ्या ज्या स्वतः स्वावलंबी होऊन माहेरचा अभिमान होतात. मी दुसऱ्या प्रकारतील आहे हे सांगायला नकोच. पहिल्या प्रकारातील कोण आहे, हेही तुम्हाला माहित आहे. असं म्हणताच प्रदीप ला तर ठसकाच लागला आणि आई नानांचा चेहरा मुलीमुळे धाडकन उतरला. नाना तुम्हाला दुखावणे, हा हेतू नक्कीच नाही. फक्त तुम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगितलं.
एका घरात आपण गुण्यागोविंदाने राहतो, एकमेकांना सांभाळून घेतो, मग तसेच जर मी माझ्या माहेरी वागले तर का सलतं. मी शिक्षित नोकरदार असून जेवढे सासरसाठी करते त्याच्या एक शतांश जरी माहेरसाठी, ज्यांनी मला घडवले त्यांच्यासाठी करू शकले, तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. असं बोलू नये, पण पहिलं आणि शेवटचं ठासून सांगते मी,
गरजेला माझ्या माहेरच्या पाठीशी उभी राहणारच. स्वतःचा संसार उघड्यावर टाकून परमार्थ करणे एवढी मी महान नाही, ती अक्कल मलाही आहे. हे जर पटत नसेल तर माझ्या साठ लाखाचा हिशोब चुकता करा. उद्याच्या उद्या मी दादा कडून पैसे परत मागते. मेघाच्या अंगातील झाशीची राणी आज प्रदीप ने प्रथमच पाहिली होती.
मेघाच्या बोलण्याशी सहमत असल्याची पावती तो त्याच्या मौनातून देत होता. चक्क सासूबाई म्हणाल्या, खरंय पोरी तुझ. हे प्रत्येक लेकीन केलं पाहिजे. आम्ही चुकलो. पण आता नव्या पिढीने चूक सुधारावी. आलं लक्षात म्हणत, नाना त्यांच्या खोलीत गेले. हे सगळं बघणाऱ्या आर्याच्या डोळ्यात आई विषयी अभिमान आणि भविष्यातील आत्मविश्वासाची चमक दिसत होती.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.