शूर्पणखा पुढे जावून भगवान श्रीकृष्णाची पत्नी कशी झाली..? असे तिने काय केले होते ज्यामुळे तिने शेवटी कृष्णासोबत..
नमस्कार मित्रांनो,
जन्मापासूनच शूर्पणखाच्या प्रतिमेला तिच्या राक्षसी वर्तनामुळे आणि निर्दयपणे क त्त ल केल्यामुळे नेहमीच तिरस्काराने पाहिले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की रावणाची बहीण भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी कशी बनली होती. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की, करोडो जन्मांची तपश्चर्या करूनही ऋषीमुनींनाही भगवंताचे दर्शन होत नाही.
पण शूर्पणखाने भगवंताच्या दर्शनासोबतच त्याच्याशी बोलणेही झाले होते. मात्र असे कोणते पुण्य केले होते की, ज्यामुळे तिचे भगवान श्रीकृष्णशी विवाह झाला होता. चला तर मग जाणून घेऊया शूर्पणखाच्या मागील जन्माची कहाणी. पूर्वजन्मात शूर्पणखा ही इंद्राच्या दरबारात नयनतारा नावाची अप्सरा होती, ती इतकी सुंदर होती की तिची तुलना उर्वशी, रंभा, मेनका या अप्सराबरोबर होत होती.
एकदा इंद्राच्या दरबारात अप्सरांचे नृत्य चालू असतांना नयनताराने इंद्रदेवांना आपल्या नजरेने घायाळ केलं हे पाहून इंद्र व्याकुळ झाले आणि तिच्यावर प्रसन्न झाले. तेव्हापासून नयनतारा इंद्राची प्रेयसी बनली. त्यावेळी वज्र नावाचा ऋषी पृथ्वीवर घोर तपश्चर्या करत होते, तेव्हा नयनताराला इंद्राने ऋषींच्या तपश्चर्येला बाधा आणण्यासाठी पृथ्वीवर पाठवले, पण वज्र ऋषींची तपश्चर्या भं ग केले मात्र ऋषींनी तिला पुढील जन्मी राक्षसी बनण्याचा शाप दिला.
मग तिने ऋषींची क्षमा मागितल्यावर वज्र ऋषींनी तिला सांगितले की, राक्षसाच्या जन्मात तुला परमेश्वराचे दर्शन होईल. मग त्या अप्सराने श-रीराचा त्याग करून राक्षसी जन्मात जन्म घेतला. तेव्हा तिने दृढ निश्चय केला की, तिला परमेश्वराचे दर्शन झाल्यावर ती त्यांन पती म्हणून प्राप्त करेल. मग ती नयनतारासारखेच मोहक रूप धारण करून सुर्पणखा श्रीराम प्रभूंकडे गेली, पण तिच्याकडून चूक झाली ती म्हणजे, परब्रह्म प्रभू श्री रामाला पतीरूपात मिळावे अशी इच्छा व्यक्त केली.
कारण तिला माहिती नव्हते की, परमात्मा प्राप्त करण्यासाठी एक प्रक्रिया असते. भक्ती किंवा वैराग्य यांच्या मदतीनेच परब्रह्म प्राप्त होऊ शकते. शूर्पणखा भक्तिरूपा सीता माता आणि वैराग्यातील श्री लक्ष्मणजी यांच्याकडे न जाता थेट श्री रामाकडे गेली. ही तिची सर्वात मोठी चूक होती. तिला श्रीरामाची पत्नी बनून त्यांच्याशी विवाह करायचा होता. मात्र त्यावेळी तिच्या अहंकार आला होता आणि तीला वाटत होते की, संपूर्ण जगात माझ्यासारखी स्त्री नाही.
मात्र, अहंकारी माणसाला भगवंत मिळणे अजिबात शक्य नाही, त्यामुळे शूर्पणखाला योग्य ज्ञान मिळावे म्हणून लक्ष्मणाकडे एकांताच्या रूपात पाठवले होते, जेणेकरून त्याला परमेश्वराच्या भेटीची योग्य प्रक्रिया कळू शकेल. मग परत लक्ष्मणाने तिला प्रभू श्रीराम कडे पाठवले. मात्र त्यावेळी श्री रामानी तिला माता सीताकडे पाठविले, मात्र तिथे शूर्पणखाने माता सीतेला खाण्याचा प्रयत्न केला,
मग त्यावेळी लक्ष्मणजींनी रागाच्या भरात त्यांचे नाक कापले. तेव्हा शूर्पणखाचे ज्ञानाचे डोळे उघडले आणि ती देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्याची सहाय्यक बनली. तसेच रावण, कुंभकरण, मेघनाथ इत्यादी दुष्ट आ-त्म्यांना देवाच्या हातून मा-रून तिने भगवान शंकराचे ध्यान करण्यास सुरुवात केली.
मग 10,000 वर्षांनंतर भगवान शिवांनी शुर्पणखाला दर्शन दिले आणि तिला वरदान दिले की, जेव्हा द्वापर युगात श्री राम कृष्ण अवतारात जन्म घेतील, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण तू कुब्जाच्या रूपात असताना तुला पती सुख देतील. मग श्रीकृष्ण तुझी कुबड दुरुस्त करतील आणि नयनतारा अप्सरेचे तेच सुंदर रूप देतील आणि तेच झाले. शेवटी शूर्पणखालाही अप्सरेचे मोहक रूप प्राप्त झाले आणि तीही भगवंताची सोबती झाली. मग वरदानानुसार भगवान श्रीकृष्ण धरतीवर जन्माला आले आणि भगवान भोळेनाथच्या वरदानानुसार भगवान श्रीकृष्णाचे सूर्पनखाशी लग्न झाले.