Alphamarathi.com

Super Fast Marathi News
श्रीमंत असलेल्या बापाला मुलगा चुकीचा पत्ता देऊन अमेरिकेला गेला.. त्यानंतर बापाचे झालेले हाल पाहून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल.. एकदा पहाच

मित्रांनो, आपल्या आयुष्यात बऱ्याचवेळा अनेक संकटे ही येतच असतात आणि काही लोक तर त्या संकटांचा उगाच बाऊ करत असतात. परंतु आपल्या सभोवताली असे देखील काही लोक असतात. जे त्यांच्या वागणुकीमुळे सर्वांसमोर त्यांचा एक आदर्श ठेवत असतात. आणि आज आम्ही या लेखातून तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहोत. जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मी नेहमीप्रमाने एका मंदिराच्या बाहेर असलेल्या भिक्षेकरी यांना तपासत होतो. आणि हे सर्व भिक्षेकरी म्हणजेच रु’ग्ण हे त्या मंदिराच्या बाहेर बसणारे भिकारीच होते. पण त्यावेळी माझी नजर मात्र एका कोपऱ्याकडे गेली आणि त्या कोपऱ्यात एक म्हातारे बाबा बसले होते. दिसायला मात्र ते बाबा फार तेजस्वी होते. त्यांच्या चेहऱ्यावर फार वेगळे तेज सुद्धा होते,

आणि त्यांचा चेहरा खूप काही बोलत होता. त्यांच्या पाठीचा कणा सुद्धा एकदम ता’ठच होता. स्वच्छ कपडे घातलेले, शरीराने साधी राहणी, मी कितीतरी वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो होतो. पण ती व्यक्ती भिकारी नव्हती, नंतर कळले की, त्याच्या उजव्या गुडघ्याच्या घोट्यापासून त्यांना पाय न्हवता आणि कुबड्या त्यांच्या एका बाजूला ठेवलेल्या होत्या. कोणीतरी त्यांना काहीतरी देत ​​होते आणि ते घेत होते,

हे माझं त्यांच्याकडे सहज लक्ष गेल्यावर मला समजले. मी त्यांना बघत असताना तिथल्याच एकाने मला सांगितले की, डॉ’क्टर त्यांच्या इथे तुम्ही जाऊ नका. तो विचित्र माणूस वेडा आहे. पण माझी उत्सुकता मात्र थांबली नाही. त्यांनतर मी त्या व्यक्तीजवळ गेलो आणि हात पुढे केला मला आशा होती की, ते त्यांचा हात माझ्या हाताशी मिळवतील. पण त्यांनी मात्र हात पुढे केला नाही..

मी पुढे त्यांना विचारले की, बाबा काही प्रॉब्लेम आहे का ? मग ते कुबड्या घेऊन उभे राहिले आणि मला एक समस्या असल्याचे सांगितले. मला म्हणाले आय हॅव वन प्रॉब्लेम इन माय राईट आईज आय हॅव पेन, माझ्या उजव्या डोळ्यात दुखत आहे. त्यांचं इतकं इंग्रजी शिकून मला धक्काच बसला. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर, त्यांचे डोळे खूप कोरडे पडले होते. नीट बघितले तेव्हा मला लक्षात आले की,

त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे आणि मी बाबांना सांगितले की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे, तेव्हा ते म्हणाले ओ माय गॉड. मोतीबिंदू, १९९९ मध्ये माझा उपचार झाला होता. हा प्रकार काही मला समजत नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, बाबा ! मी आठवड्यातून दोन दिवस इथे येतो, पण तुम्ही मला अनेक दिवस इथे दिसत आहात. तुम्ही भिक्षेकरी अजिबात वाटत नाही.

याउलट तुम्ही चांगले शिकलेले वाटतात. माझं हे बोलणं ऐकून ते जोरात हसायला लागले, तेव्हा मी त्यांना विचारले, काय झाले बाबा? हसत का आहात तुम्ही. मी काही चुकीचे तर नाही ना बोललो.. मी तुम्हाला दुखावले असेल तर माफ करा. बाबा म्हणाले, तु या बद्दल माहित करून काय करणार आहेस? डॉ’क्टर म्हणाले, सांगा तरीपण. त्यांनतर ते मला म्हणाले की, चला आपण त्या कोपऱ्यात बसू नाहीतर,

हे सगळे माझ्यासोबत तुम्हाला पण वेडे समजतील. त्यानंतर एक चहाच्या टपरीच्या बाजूला जाऊन आम्ही दोघे बसलो आणि बाबांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले आय एम मेकॅनिकल इंजिनिअर. वरिष्ठ पदावर या कंपनी मध्ये कामावर होतो. माझ्या ज्युनियरला काम शिकवत असताना, माझा पाय मशीनमध्ये सापडला गेला आणि मी कायमचा अर्धांगवायू झाल्यावर कंपनीने सर्व काही खर्च दिला आणि मला थोडे जास्त पैसे देऊन घरी बसवलं. त्यानंतर अनेक कष्ट घेऊन मी एक कार्यशाळा काढली,

आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. माझ्या मोठ्या मुलाला पण चांगल शिकवून मेकॅनिकल इंजिनिअर केलं आणि तो कामातही चांगला होता. व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने आपल्या नावावर घर आणि कंपनी केली आणि नंतर ती विकली सुद्धा. मी त्याला थांबवले नाही. कारण त्याचा व्यवसाय वेगाने वाढावा. अशी माझी इच्छा होती पण तो नंतर अमेरिकेला गेला आणि आम्ही इथे अमेरिकन बाहुल्यांसारखे खेळत होतो. हसत ते बाबा सांगत होते आणि एखाद्या व्यक्तीचे हसणे एवढे तरुण असू शकते.

हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मी त्यांना विचारले, बाबा तुम्ही खूप शिकलात. तुम्ही कुठेही सहज काम करू शकता. तुम्हाला तर खूप अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही कंपनीतही अगदी सहज काम करू शकता. त्यावर ते पुढे म्हणाले, मी इथे एका कंपनी मधे काम करतो. आणि त्यांनतर पाच ते सात इथे येऊन बसतो. इथे लोक मला खायला देतात. पण जे खायला दिले जाते. ते मी स्वीकारत नाही पण तुम्ही मला काही पैसे दिले तर मी ते स्वीकारतो. माझ्या घरी माझी बायको पण आहे.

आणि तिला ल’कव्याचा त्रास आहे. मला चांगला सात हजार पगार सुद्धा मिळतो आणि त्या मध्ये मी खुश आहे. त्यांनतर पुढे ते म्हणाले कि, मी घरी गेल्यावर आम्हा तिघांसाठी जेवण बनवतो, आता डॉ’क्टरांना हे समजत नव्हते की, ते दोघे म्हणाले होते आणि आता तिसरा कोण आहे? पुढे ते सांगू लागले की, मी लहान असताना माझ्या मित्राच्या आईने माझ्यासाठी सर्व काही केले. परंतु काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राचे नि’धन झाले आणि त्याची ९२ वर्षांची आई अनाथ झाली.

त्यांनी माझ्यावर केलेले सर्व कार्य आणि त्यांची जाणीव ठेवून मी त्यांना माझ्या घरी आणले. आईला मधुमेह आणि उच्च र’क्तदाब आहे. मी आईचे महिन्याचे खर्च पूर्ण करण्यासाठी इथे या ठिकाणी बसतो. औ’षध एका ओळखीच्या मे’डिकल स्टोअरमधून घेतो आणि पाच ते सात वाजेपर्यंत इथे बसतो आणि जे काही पैसे मिळतात ते सगळे पैसे मी त्या मेडिकल वाल्याला नेऊन देतो. आता मला मात्र त्या बाबांचा अभिमान वाटत होता. स्वत: अ’पंग असताना ते स्वतः इतरांचा विचार करत होते.

स्वतःच्या मुलाचे दुःख बाजूला ठेवून ते दुसऱ्याच्या आईला जास्त जीव लावत होते. तेव्हा बाबांनी मला सांगितले की, ती दुसऱ्या कोणाची आई नाही, ती माझी आई आहे. कारण या आईने माझ्यासाठी खूप काही केले आहे, आता ते माझे कर्तव्य आहे. मी त्यांना विचारले की, पण तुम्ही इथे फक्त औ षधासाठी बसला आहात ? हे तुमच्या घरच्यांना कळलं तर? त्यावर ते मला म्हणाले की, त्या तर अंथरुणातून पण उठू शकणार नाहीत. त्या तर या कुशीवरून त्या कुशीवर पण नाही जाऊ शकत मग त्यांना कसे कळेल ?

मी घरी गेल्यावर त्यांच्यासाठी सगळ काही करतो. मी तुम्हाला चालणार असेल तर एक सांगू का डॉ क्टर? डॉ क्टर, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, असेच काम करत रहा. त्यावर मी त्यांना म्हणालो की, बाबा मला तुम्ही तुमचाच मुलगा समजा, आजीच्या आजा’रपणात जी काही औ’षधे लागतात. ती तुम्ही माझ्याकडुन घ्या आणि वाटले तर मला तुमचा नातू समजा. मला आधीच एक मुलगा सोडून गेला आहे आणि अशात जर तुम्ही मला जी’व लावाल आणि त्यांनतर जर तुम्ही पण मला सोडून गेलात.

तर मग माझ्यासाठी पुन्हा थाऱ्यावर येणं कठीण होऊन बसेल. मला स्वतःला सावरणं कठीण होईल, असे म्हणत त्या बाबांनी माझ्या हातावर टाळी दिली आणि त्यांच्या हाताचा तो गरम स्प र्श माझ्या हाताला जाणवला आणि मी त्यांचा हात तसाच पकडुन ठेवला आणि त्यांनी मात्र माझा निरोप घेतला. जरी बाबांनी मला एक नातू म्हणून स्वीकारलं नसेल. तरीदेखील त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या या नात्याला मनोमन आशीर्वाद दिला होता आणि हे नाते त्यांनी मनातून केव्हाच स्वीकारले होते.

मला आज या बाबांचे खूपच कौतुक वाटत होते कारण स्वतःवर कितीही बिकट परिस्थिती आलेली असताना देखील दुसऱ्यांचा विचार करणारे आणि त्यांच्यासाठी जगणारे फारच कमी बघायला मिळतात. जरी त्यांची फक्त पाठ माझ्याकडे होती तरीसुद्धा माझे हात त्यांना नमस्कार करण्यासाठी वळले होते. मित्रांनो वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.