आपल्या “नितंबाचा” आकार वाढू द्यायचा नसेल तर या गोष्टी करणे थांबवा.. खास महिलांनी जाणून घ्या.. कारण त्यांच्या
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला सुंदर, सडपातळ आणि फिट राहायचे असते. पण कधीकधी शरीराच्या काही भागात अतिरिक्त चरबी जमा होणे सामान्य आहे. पण सहसा, जर एखाद्या व्यक्तीचे वजन कमी होत असेल तर तो सर्व ठिकाणी वजन कमी करीत आहे. आपल्याला केवळ एका विशिष्ट ठिकाणी वजन कमी करण्याची आवश्यकता असल्यास काय करावे ?
अनेकांना या प्रश्नात रस आहे. तर चला पाहूया या विषयी सविस्तर माहिती.. आपले नितंब अधिकच मोठे असतील तर ते कसे कमी करावे ? हे इतके सोपे नाही कारण ते पहिल्या दृष्टीक्षेपात दिसते. प्रक्रियेसाठी आपल्याकडून खूप प्रयत्न आणि परिश्रम आवश्यक असतात. काही जणांच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे त्यांच्या शरीराचा काही ठराविक भागच वाढत असतो.
विशेषत: नितंबाचा भाग हा जास्त मोठा दिसू लागतो. याकडे दुर्लक्ष केले तर नितंब हे अधिक मोठे दिसू लागतात. तुमच्याही नितंबाचा आकार वाढू लागला असेल तर तुम्ही आहारातून काही पदार्थ आताच काढून टाकायला पाहिजेत. ज्यामुळे तुमच्या नितंबाचा आकार गरजेपेक्षा जास्त सुटणार नाही. चला तर जाणून घेवूया ते कोणते पदार्थ आहेत.
१) दुग्धजन्य पदार्थ :- दुधापासून बनवण्यात येणार दूध, दही, चीझ, लोणी हे पदार्थ जितके पौष्टिक असतात. तितकेच त्यांचे अति सेवन शरीरासाठी अपायकारक ठरत असते. दूध आणि दही यांचा परिणाम वजनावर तितकासा पडत नाही. पण चीझ, लोणी हे असे पदार्थ आहेत ज्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते.
त्यामुळे तुम्ही आहारात याचा समावेश कमीत कमी आणि योग्य पद्धतीने करा. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढणार नाही. २) ब्रेड, बिसिक्ट आणि बेकरीचे पदार्थ :- पाव हा हल्लीच्या खाद्यपदार्थांमधील अविभाज्य असा घटक आहे. पाव नसेल तर कोणताही पदार्थ चांगला लागत नाही. आता बोलायचे झाले तर आजकालच्या तरुणांचे सर्वात आवडते पदार्थ म्हणजे वडा पाव,
भजी पाव, पावभाजी, बर्गर, पिझ्झा या सगळ्यामध्ये पाव असतो. जो पाव पोटात जाऊन फुगतो. पावामुळे पचनशक्तीवर चुकीचा परिणाम होत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा साठा असतो. जो फॅटच्या रुपात शरीरात साचून राहतो. जर तुमचे काम सतत बसून असेल आणि तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल तर अशा पदार्थांच्या सेवनामुळे,
तुमच्या नितंबावरील फॅट वेगाने वाढते. ३) तेलकट पदार्थ :- सतत तेलकट पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. तुम्ही सतत तेलकट पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्या वजन वाढीसाठी ती कारणीभूत ठरु शकतात हे अजिबात विसरु नका. तेलकट पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. वडा, भजी किंवा सतत तर्रीवाले पदार्थ तुमच्या आहारात असतील तर,
तुम्हाला अगदी हमखास त्याचा त्रास होणार. वजनवाढीचा परिणाम तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या पायांवर म्हणजे मांडी आणि नितंबावर दिसून येतो. तेलकट पदार्थ हे जीभेला चमचमीत वाटत असेल तरी देखील त्याचा थेट परिणाम नितंबावर दिसून येतो. तुमचे नितंब यांसारख्या पदार्थांमुळे वाढू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला जाड व्हायचे नसेल तर तुम्ही तेलकट पदार्थ हे टाळायला हवेत.
हे पदार्थ जर तुम्ही आहारातून कमी केले तर तुमच्या शरीरात अतिरिक्त फॅट वाढणार नाही. शिवाय जर व्यायाम योग्य ठेवला तर तुमच्या नितंबाचा आकारही सुडौल दिसेल. तसेच आपल्याला शा-रीरिक हालचालीची गरज आहे. हो, व्यायाम हा आपल्या शरीराला आवश्यक आहे. म्हणून आपल्यासाठी थोडा वेळ काढून चालणे, सायकलिं’ग किंवा हलके फुलके व्यायाम आपण केलेच पाहिजे.
जर योग्य आहारासोबत व्यायामाची जोड असेल तर आपले आरोग्य निश्चित चांगले राहते.. टीप :- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.