मुले वडिलांना सोडून परदेशी निघून गेली अन्, त्यांच्या आयुष्यात एक स्त्री आली अन् पुढे जे घडले.. पाहून तुम्हीही..
नमस्कार मित्रांनो..
दरवाज्याची बेल वाजली आणि तिने दार उघडले. तो धापा टाकत आत आला. तिने पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला आणि इशाऱ्यानेच चहा पिणार का असे विचारले त्याने देखील हो म्हटले. आत्ताच आ’जारपणातून उठलेल्या त्याचा चेहरा आज खुलून दिसत होता. तिने आश्चर्यचकित होऊन विचारले की, आज येवढं खुश का दिसताय ?
त्यांनी सांगितले की पटकन आवर आपल्याला बाहेर जायचे आहे. किशोरीच्या कार्यक्रमाचे दोन तिकीट आणली आहेत. दोघेही झटपट आवरून निघाले असता नेहमी प्रमाणे तिची पावले बस स्टॉप कडे वळली तेवढ्यातच त्याने टॅक्सी असा आवाज दिला आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. दोघेही टॅक्सी मध्ये बसले,
आज तिला तो वेगळा भासत होता. मनात विचारांचे काहूर माजले होते तेवढ्यात टॅक्सी थेटर च्या बाहेर येऊन थांबली. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन पुढे जाण्यास सांगितले. तिकिटे घेऊन ती थेटर कडे गेली आणि समोर उभ्या असलेल्या स्वयंसेवकाकडे तिने ती तिकिटे दिली. जरा तिकडे बघतेस असे म्हणत त्याने तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळला.
अपूर्वाई ने मोहरलेल्या तिच्या श्वासात मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला. दोघेही कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागले.तबलजी ने तबला ठीक केला, तानपुऱ्या वरील मुलीने ताराना ताण दिला, सनईचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंच्यावर आल्या. सर्व वातावरण मंत्र मुग्ध झालं होतं. इतक्यातच त्याने तिचा हात हातात घेतला,
ती गाण ऐकायचं विसरली आणि भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी कॅन्सर च्या शेवटच्या स्टेजला झुंज देत असताना तो आयुष्यात आला. घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं त्यावेळी त्याने आपल्याला आधार दिला, वर्षभर सेवा केली, म’रण लंबावल. सहवास वाढत गेला तशी ओढ वाढू लागली. एके दिवशी ते दोघे चहा पिण्यासाठी गेले असता,
तिथे त्याने तिला लग्नासाठी विचारले. त्याने स्वतः विषयी सांगितले की, त्यांची दोन मुले अमेरिकेत आहेत, त्यांना बापाची गरज नाही. नातवंडा साठी सुद्धा आजोबा अनोळखी, पत्नी दहा वर्षांपूर्वी निधन पावली. घरी एकटाच राहतो आणि कॅन्सर ग्रस्त रु-ग्णांची सेवा करतो. आता आधाराची गरज आहे. हे सर्व ऐकून ती त्याला नाही म्हणुच शकली नाही.
सहजीवन सुरू झालं, सुखाचे दिवस आलेत असे वाटत असताना त्यालाही ब्रेन टुमर असल्याचे समजले आणि आशेच्या पालाविने नव्याने फुललेल्या झाडाला वाळवी लागली. गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगात शेवटच्या दिवसाची वाट बघत असताना अचानक टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचार मालिका खंडित झाली.
कार्यक्रम संपताच दोघे बाहेर आले, त्यांच्या आवडीच्या हॉटेल मध्ये जेवले आणि चालत चालत नदी काठी आले. नेहमी प्रमाणे बऱ्याच जोड्या बसलेल्या. दोघे एका जागी बसले, बराच वेळ कोणीच बोलले नाही. तिने मौनाला बोलत केले आणि विचारले की, स्वारी आज खुशीत आहे, काय झालंय नक्की? दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही, नदीकडे पाहत राहिला. तो काहीच उत्तर देत नाही हे समजल्यावर ती तिथून निघूयात असे म्हणत उठली असता, त्याने शर्ट मधून एक गुलाब आणि एक पाकीट काढले आणि म्हणाला happy valentine’s day.. आता मात्र त्याच्या वागण्याचा अर्थ तिला उमगला, तिचे डोळे भरून आले. बराच वेळ रडल्या नंतर तिने ते पाकीट उघडून पाहिले तर त्यात लंडन ची तिकिटे होती.
तो म्हणाला की, पुढच्या आठवड्यात आपण लंडन ला जात आहोत, दोघांवरही श-स्त्रक्रिया करायची आहे. कॅन्सरचा शेवटचा टप्पा आला म्हणून काय झालं जाता जाता एक डाव खेळून बघुयात. नंतर ते दोघे कितीतरी वेळ त्यांच्या भविष्यावरती बोलत राहिली. जीवन सुंदर आहे ते जागून घेऊयात देव आहेच बाकीचं बघायला.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.