Alphamarathi.com

Super Fast Marathi News
विवाहबाह्य सं’बंध का जुळून येतात ? का महिला लग्न होऊन देखील दुसऱ्या पुरुषाशी सं’बंध ठेवतात.. पहा

नमस्कार मित्रांनो..

एकदम अचानक टीव्ही वर गाणं सुरू होत, मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे.. मोकळ्या केसात माझ्या, तू स्वतःला गुंतवावे.. तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आलं आणि ती केसात हात फिरवत स्वत:ला आरश्यात न्याहाळू लागली. अलीकडे ती खूप खुश राहू लागली होती. तासन तास आरश्यात स्वतःला निरखत बसू लागली होती. टीव्हीला एखादं प्रेमगीत लागलं की, त्याच्या स्वरात हरवू लागली होती.

बाहेर पडलेल्या गुलाबी थंडीमध्ये त्याच्या आठवणीत हरवून जात होती. वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाहत होती, गाणाऱ्या कोकिळेसोबत सूर धरत होती आणि आपल्या एकटेपणाला त्याच्या सोबतच्या क्षणांत गुंफत होती. रात्री मोबाईल वाजला ती विचारात पडली एवढा रात्री कोणाचा फोन आला असेल ? तिने लाईट लावली आणि फोन कानाला लावला.. हॅपी बडे टू यु.. हॅपी बडे डिअर जानु.. हॅपी बडे टू यू..

हे ऐकून ती खूप खुश झाली आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं, ते दोघे खूप वेळ बोलत राहिले. शेवटी तो म्हणाला – बर ऐक पुढचे काही दिवस आपल बोलणं नाही होणार मी जिथे जाणार आहे. तिथे नेटवर्क नसेल आणि मला वेळही नसेल. सो काळजी घे बाय.. तिने फोन ठेवला आणि त्याच्या आठवणीत हरवून गेली. एक वर्ष झालं असेल तिचं लग्न होऊन. पण लग्नानंतर लगेच त्याला ड्युटीवर जावं लागलं.

पुण्यासारख्या ठिकाणी चांगला 2bhk फ्लॅट. पण राहणारी फक्त एकटी. लग्नानंतरचे काही दिवस त्याचा सहवास लाभलेली ऐन तारुण्यातील ती तरुणी शरीरात उठणाऱ्या भावनांच्या लहरींना त्याने दिलेल्या काही क्षणांनी कुठवर रोखू शकणार होती ? शेवटी तिने मन एका ठिकाणी गुंतवण्यासाठी जॉब करायचा निर्णय घेतला. निदान त्यामुळे तरी आपण कश्यात तरी गुंतून राहू, पण त्यातही तीच मन रमेना.

लग्न झाल्यावर तो गेला ते ६ महिन्यांनी परत आला. ती परत खुलली, खुश झाली पण ते ही काही दिवस. सुट्टी संपताच तो निघून गेला आणि ती परत एकटी पडली. तस तो रोज तिला कॉल करत असे. पण त्याने तिचं मन समाधान होत असे. नवीन लग्न झालेली ती, तिच्या इतरही काही गरजा होत्या आणि त्या सांगण्यासाठी तिच्या सोबत कोणीच नव्हते. दिवस भर कसातरी वेळ जात असे पण रात्र खायला येई.

रोजच अस सूरु होतं, तिचं एकटेपण वाढतच चाललं होत आणि तिला तो भेटला. फेसबुक वर त्या दोघांची भेट झाली. त्यानेच रिक्वेस्ट पाठवली. तिने ती accept केली. पुढे बोलणं सूरु झालं. एकमेकांविषयी जाणून घेणं सुरू झालं. मग फोन नंबरची देवाण-घेवाण झाली, दिवसभर ती फोन वर राहू लागली. हळू हळू ते या आभासी जगात जवळ येऊ लागले एकमेकांना आवडू लागले आणि नकळत ते एकमेकांत गुंतत गेले.

आणि तिच्या ही नकळत तिचा एकटेपणा दूर होत गेला. ती त्याच्या आठवणीत राहू लागली. त्याला imagine करू लागली. स्वतःशी च हसू लागली, त्याच्या आठवणीत रमू लागली. तिला काहीच समजत नव्हतं नेमकं काय होतंय, काय चूक – काय बरोबर हे समजत नव्हतं, पण हा बदल मात्र तिला आवडू लागला होता. जसं जस ते बोलत गेले तस तसे एकमेकांत आजूनच गुरफटत गेले आणि ती पतीला विसरत चालली.

अर्थात यात तिची ही काही चूक नव्हतीच कारण तिचा एकटेपणा दूर करणार कोणी तरी तीला भेटलं होत. रात्रीचे सव्वा बारा वाजले तिच्या नवऱ्याने फोन ठेवला आणि त्याचा फोन आला. ती त्याच्याशी बोलत राहिली आणि बोलता बोलता तिला कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही. ती खुश होती, त्याच्याशी बोलत होती आणि तिच्या शरीरानेही व्यक्त व्हायला सुरवात केली. त्याची आठवण तिला स्वस्थ बसू देईना.

तोही काहीसा असंच अनुभवत होता. आणि एक दिवस जे होणार होत तेच झालं. त्याचा फोन आला आणि त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. ती पहिल्यांदा कचरली. तिने पटकन फोन ठेऊन दिला. तिचं अंग शहारल, छातीत धड-धड होत होती आणि तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. रत्रभर तिला झोप येत नव्हती. सकाळी उशिरा उठून ती चहा घेता-घेता विचार करू लागली.

तिने त्याला फोन लावला आणि म्हणाली मी तयार आहे.. मग तिच्या घरीच भेटायचं ठरलं. सकाळीच ती लवकर उठली मस्त फ्रेश झाली, आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. कांदा का’पत असतानाच दाराची बेल वाजली. ती खुश झाली. तिला वाटलंच होतं की तोच आला असणार. ती दार उघडणार तेव्हड्यात फोन वाजला. तिने फोन उचलला. तिकडून आवाज आला जय हिंद मॅडम..

श-त्रूशी लढतानाना तुमच्या पतीला वीर म’रण आलं. तिला काय होतंय समजेना. डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं, गेल्या पाच दिवसात त्याचा फोन न आल्याने ती जणू त्याला विसरूनच गेली होती, ती भानावर आली तीला स्वतःचीच लाज वाटू लागली होती, स्वतःचा राग येत होता, पती तिकडे सिमेवर देश सेवा करत असताना आपण असा विचार करवा..? तिला काही सुचत नव्हतं,

दारात बेल वाजत होती आणि डोक्यात मोठयाने घणाचे घाव पडल्यासारखं वाटत होतं डोकं सुन्न झाल होत, काय होतंय समजत नव्हतं. फक्त तिला एकच विचार येत होता की आपण चुकलो, आपण पाप केलं, आपलं लग्न झालं असून सुद्धा आपण पर पुरुषाचा विचार केला. डोळ्यातून पाणी वाहत होत, हातात कांदा का’पण्यासाठी जो चा’कु घेतला होता, तिने सपकन तो चा’कु स्वतःच्या पोटात खु’प-सून घेतला. खाली कोसळली. दाराची बेलही वाजन बंद झालं. सगळं कसं शांत झाल होत.

फरशीवर र’क्त पसरलं होत आणि डोळ्यात अश्रू होते.. टीव्ही वर तेच गाणं सुरू होतं, मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे.. आता यातलं काय योग्य काय अयोग्य तुम्ही ठरवा देशाच्या रक्षणासाठी आपली पत्नी सोडून सिमेवर लढणारा आणि प्राण गमवणारा तिचा पती योग्य..? का पतीपासून दूर राहून एकटे पणाची लढाई स्वतःशीच लढणारी, स्वतःच्या भवनांना वाट करून देण्यासाठी दुसऱ्या पुरुषाशी तिचं मैत्री करणं योग्य..?

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.